मत

आधुनिक दृष्टिकोनातून रामायण

स्वीट टॉकरीणबाई's picture
स्वीट टॉकरीणबाई in जनातलं, मनातलं
23 Mar 2018 - 3:20 pm

'खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात ज्या आप्पांचा (माझ्या सासर्यांचा) उल्लेख आहे त्यांनी गेल्या महिन्यात ASCOP साठी एक लेख लिहिला होता. 'आधुनिक दृष्टिकोनातून रामायण'. तो मी इथे पोस्ट करीत आहे. पण त्या आधी थोडी प्रस्तावना.

आप्पा आता सत्त्याण्णव वर्षांचे झाले आहेत पण तोच उत्साह आणि स्पष्ट विचारशक्ती तशीच कायम आहे.

कथाविचारलेखमत

COPYRIGHTS बद्दल माहिती हवीये.

किरण नाथ's picture
किरण नाथ in जनातलं, मनातलं
21 Mar 2018 - 1:09 pm

जर आपल्याला कोणत्याही पुस्तकाचा अनुवाद करायचा असेल किंवा एखादा video अनुवादित करायचा असेल तर त्याचे COPYRIGHTS कोणाकडे आहेत हे कसे शोधावे व त्याचा अनुवाद करण्याची परवानगी कशी घ्यावी, तसेच एखाद्या पुस्तकावरून किंवा कथेवरून जर videos बनवायचे असेल तर काय काय कायदेशीर बाबी बघाव्यात व त्याचे हक्क कसे घ्यावेत या बद्दल कृपया माहिती द्यावी.

साहित्यिकमत

अभ्यासक्रम आणि कॉलेज माहिती बाबत

जानु's picture
जानु in जनातलं, मनातलं
3 Mar 2018 - 9:23 pm

माझा एक भाऊ १२ वी पास झालेला आहे. चित्रकला फाउंडेशन वर्ग पूर्ण व ग्राफिकचा एक पायाभूत खाजगी कोर्स केलेला आहे. त्याला ऍनिमेशन साठी खालील कॉलेजात प्रवेश घ्यायचा आहे. प्राथमिक चाचणी उत्तीर्ण झालेला आहे. पण आम्हाला या क्षेत्रातील काहीच माहिती नाही, तसेच या कॉलेज विषयीसुद्धा काही नाही. या कॉलेज मध्ये भारतातून २४० विद्यार्थी घेतात हे समजले आहे. भविष्यात येथे शिक्षण उपयुक्त असेल का? आणि याशिवाय आपणास यावर काही माहिती देता आली तर आपला आभारी असेन. आपणापैकी कोणास या क्षेत्रातील भावी उत्तम आणि उपयुक्त शिक्षणाची माहिती असेल तर जरुर द्या.

शिक्षणमत

बाप रे बाप..

ss_sameer's picture
ss_sameer in जनातलं, मनातलं
12 Feb 2018 - 2:37 pm

मला शाळेत एकदा विचारलेले, तुला तुझ्या वडीलांबद्दल काय वाटते? मी सांगितले, "भीती!"

विचारणारा काही क्षण गोंधळून गेला. सारा वर्ग विचारणाऱ्या शिक्षकाच्या चेहऱ्याकडे पाहून फिदीफिदी हसत होता. गोंधळ इतका वाढला की पुछो मत. त्यानंतर बसण्याच्या जागेवर फुटलेल्या फटाक्यांमुळे माझे बसायचे हाल झाले.

हे त्या काळचे उत्तर आहे. सध्या असे कोणी उत्तर दिले तर अमेरिकेत जसा नाईन वन वन ला फोन करतात तसाच पोलिसांना फोन करून वडिलांची(च) चौकशी करायला घेतील.

विनोदसाहित्यिकव्यक्तिचित्रणप्रकटनविचारमत

पुस्तक परीक्षण: "असा होता सिकंदर"

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
1 Feb 2018 - 6:52 pm

पुस्तक परीक्षण: "असा होता सिकंदर"
लेखिका: इंद्रायणी सावकार
रिया पब्लिकेशन
अजब डीस्ट्रीब्युटर्स

सूचना:

अलेक्झांडर = सिकंदर
पोरस = पुरू = पुरुषोत्तम = पौरव देशाचा राजा
चाणक्य = कौटिल्य = विष्णुगुप्त

परीक्षण:

नुकतेच "असा होता सिकंदर" हे पुस्तक मी वाचून पूर्ण केले.
लेखिका "इंद्रायणी सावकार" यांची "लेखनशैली" काय वर्णावी? एकदम अद्भुत अशी शैली!

इतिहासवाङ्मयसाहित्यिकसमीक्षाअनुभवमतशिफारस

कोहली आणि भारतीय मानसिकता

रुस्तुम's picture
रुस्तुम in जनातलं, मनातलं
31 Dec 2017 - 8:17 pm

थोडा है थोडे की जरुरत है
जिंदगी फिर भी यहां खूबसूरत है

क्रीडाप्रकटनविचारमत

हुच्चभ्रू एलिट शिरेल्स

चामुंडराय's picture
चामुंडराय in जनातलं, मनातलं
30 Dec 2017 - 7:17 am

एवढ्यात कुठली TV/वेब सीरिअल पाहिलीत/ पाहत आहात? हा धागा वाचला आणि मला तो न्यून कि काय म्हणतात तो गंड आला ना राव !!

बघणं तर सोडाच वो, कितीयेक शिरेलची नाव बी ऐकलेली न्हाईत.

मुक्तकविडंबनजीवनमानप्रतिसादमतविरंगुळा

मराठी शाळांतील घटती पटसंख्या

ss_sameer's picture
ss_sameer in जनातलं, मनातलं
6 Dec 2017 - 8:25 pm

मराठी शाळांतील घटती पटसंख्या हा कोण्या चर्चेचा विषय होऊ शकतो असे आम्हास बिलकुल वाटत नाही. किंबहुना त्यात चर्चा करण्यासारखे काय आहे असाच विचार आमच्या मनात येतो.

तसे पाहता मराठी ही फार प्राचीन भाषा आहे. कित्येक मराठी भाषाकोविदांप्रमाणे संस्कृत पश्चात जी भाषा जन्मास आली ती मराठीच. यापेक्षा पुढे जाऊन काही (अतिरेकी) मराठी प्रेमी मराठी ही अश्मयुगीन कालखंडापासून असल्याचे पुरावे देखील सादर करू शकतील. (सध्या तर या अशाच अतिरेक्यांचे पेव फुटलेले दिसते. कालांतराने ही मंडळी मंडळांतून फुटतात किंवा यांना कोणीतरी हातापायाने फोडते ती गोष्ट वेगळी). असो....

हे ठिकाणसंस्कृतीसमाजजीवनमानविचारप्रतिक्रियालेखमत

रुद्रम

तिमा's picture
तिमा in जनातलं, मनातलं
18 Nov 2017 - 3:13 am

श्वेतांबरा ही मराठीतली पहिली सिरियल आठवते. ती बघताना त्यांत अनेक त्रुटी असूनही ती उत्सुकतेने शेवटपर्यंत बघितली. फक्त, त्याचा शेवट झाल्यावर, शेवटच्या भागात जो,'अहो रुपम अहो ध्वनिम' चा कार्यक्रम झाला तो हास्यास्पद होता. पुढे फक्त दूरदर्शनची सद्दी होती तोपर्यंत अनेक चांगल्या-बर्‍या मालिका बघितल्या. नंतर प्रायव्हेट चॅनेल आले आणि काही बर्‍यापैकी सिरियल बघायला मिळाल्या. शेवटची सिरियल बघितल्याची आठवते ती 'या गोजिरवाण्या घरांत'! पण ती फारच पाणी घालून वाढवायला लागल्यावर बघणे बंद केले. त्यानंतर कुठलीही मराठी किंवा हिंदी सिरियल बघायची नाही हे ठरवून टाकले. तो नियम अगदी यावर्षीपर्यंत कटाक्षाने पाळला.

कलाचित्रपटप्रतिक्रियाआस्वादमतविरंगुळा

बळी [शतशब्दकथा]

निओ's picture
निओ in जनातलं, मनातलं
8 Oct 2017 - 8:50 am

रणरणतं ऊन, तापलेला रस्ता. सामसूम सोसायटी. हा रस्त्याच्या कडेने चाललेला....उपाशीपोटी. काहीतरी खायला मिळेल या आशेवर.

समोर एक मुलगी त्याच्याकडेच पाहत राहिलेली. हा बावरला. भलतीकडे आल्यासारखे वाटले. जवळच्या झाडाच्या आडोशाला गेला. कानोसा घेऊ लागला. अजून माणसं जमली. सारे रोखून त्याच्याकडे पाहत होते. कुजबुजत होते. हा घाबरला, अंग चोरू लागला.
..................................

कथासमाजजीवनमानप्रकटनविचारलेखबातमीअनुभवमत