मत
राजयोग - १३
विजयगढचा किल्ला एका महाकाय डोंगरावर आहे. जंगल किल्ल्याच्या जवळपास जाऊन संपतं. अजस्त्र कातळातला, निळ्या आकाशाला खिजवत उभा असलेला तो किल्ला रघुपतीला जंगलातून बाहेर पडल्या पडल्या समोर दिसला. जंगल झाडावेलींनी पूर्णपणे झाकलेलं तर किल्ला चारीबाजूंनी अभेद्य दगडांनी वेढलेला होता. जंगल सावध तर किल्ला जागरूक. जंगल वाघाप्रमाणे पाय जवळ घेऊन दिमाखात बसलेलं तर किल्ला सिंहाप्रमाणे आयाळ फुलवून मान तिरकी करून उभा! जंगल जमिनीला कान लावून प्रत्येक बारीकसारीक आवाज टिपतंय तर किल्ला जणू नजर रोखून क्षितीजाच्या पार पहातोय.
अ का पेला - A cappella
अ का पेला - A cappella
हे नाव तसे जुनेच म्हणजे १५ व्या शतका पासून अस्तित्वात आहे. इटालियन भाषेतील हे नाव म्हणजे प्रार्थनेचे गाणे कुठल्याही वाद्याशिवाय एकटयाने किंवा समूहाने म्हणायचे असते. तसेही आपल्या संस्कृती मध्ये प्रार्थनेचे पाठ कुठल्याही वाद्याशिवाय म्हणले जातात.
आंतरजालावरचा वावर अधिक सुलभ, आनंददायी व उत्पादक बनवणार्या उप-प्रणाल्या (एक्सटेन्शन्स व अॅप्स)
आजच्या जीवनावश्यक गोष्टींची यादी केली तर त्यात आंतरजालाची निवड नक्कीच होईल, असे म्हणतात. यातला विनोदाचा भाग सोडला तरी आंतरजालाने आपल्या जीवनात फार महत्वाचे स्थान बनवले आहे आणि त्याच्याशिवाय जगण्याची कल्पना आपल्याला सहन होणार नाही, यात संशय नाही. खानपानच्या वेळांमध्ये तीन-चार तासांचा अवधी आपण सहजपणे पेलतो पण "तेवढा सलग वेळ डेस्कटॉप-लॅपटॉप-टॅब-मोबाईल इत्यादीमध्ये तोंड न खुपसता घालवल्याला किती दिवस झाले? " या प्रश्नाचे उत्तर सहजा-सहजी देता येणार नाही, नाही का?!
माझे नेहरवायण १
* लेखाची लांबी अधिक असल्याने, ठळक मुद्द्यांच्या द्रूत वाचनासाठी अधोरेखीत करण्याचा प्रयत्न केला आहे. अर्थात प्रतिसाद देण्यापुर्वी पूर्ण लेख वाचणे अभिप्रेत असावे. __/\__
एकाच माळेचे मणी
विकेंडला बऱ्यापैकी युट्युबवर व्हीडिओ पाहत असते, मग जे काही ब्राउज लिस्ट मध्ये येईल ते पाहत असते, बऱ्यापैकी माहिती मिळते, नवीन काहीतरी सापडते.
पाच वर्षे झाली घरी टीव्ही नसल्याने करमणूक म्हणून पुस्तके आणि नेट वरच्या माहितीचा आधार मिळतो . तर सांगण्याचा मुद्दा असा कि, पाहता पाहता एका बाईंचा व्हीडिओ पहिला, त्या खूप जोरजोराने माईक समोर ओरडत होत्या. समोर अपार जनसमुदाय ऐकत होता . कोणी बाई इतक्या लोकांसमोर बोलत असल्या कि माझा उत्साहाला उधान येते त्यामुळे मग पुढे ऐकत राहिले.
फापटमुक्त तर्कसुसंगत रामायण , चर्चा भाग -१
* लेखात मांडलेले काही विचार तर्कसुसंगत असले, आणि लेखनाचा उद्धेश चांगला असला तरीही गैरसमज करून घेण्यास वेळा लागत नाही, त्यामुळे दोन्ही टोकांच्या व्यक्तींना काही मांडणी अवघड जाऊ शकतात. ज्यांच्या भावना वगैरे दुखावणारा नाहीत, आणि विचाराला विचाराने प्रतिवादावर विश्वास असेल अशांनीच पुढे वाचण्याचा विचार करावा इतरांनी टळावे हि नम्र विनंती . .
* ज्यांना लेखाची लांबी खुपते त्यांच्यासाठी माझा लेखनाचा उद्देश संक्षेपाने शेवटच्या परिचछेदात दिला आहेच .
आधुनिक दृष्टिकोनातून रामायण
'खरे सुपरमॅन - आमचे आप्पा' या लेखात ज्या आप्पांचा (माझ्या सासर्यांचा) उल्लेख आहे त्यांनी गेल्या महिन्यात ASCOP साठी एक लेख लिहिला होता. 'आधुनिक दृष्टिकोनातून रामायण'. तो मी इथे पोस्ट करीत आहे. पण त्या आधी थोडी प्रस्तावना.
आप्पा आता सत्त्याण्णव वर्षांचे झाले आहेत पण तोच उत्साह आणि स्पष्ट विचारशक्ती तशीच कायम आहे.
COPYRIGHTS बद्दल माहिती हवीये.
जर आपल्याला कोणत्याही पुस्तकाचा अनुवाद करायचा असेल किंवा एखादा video अनुवादित करायचा असेल तर त्याचे COPYRIGHTS कोणाकडे आहेत हे कसे शोधावे व त्याचा अनुवाद करण्याची परवानगी कशी घ्यावी, तसेच एखाद्या पुस्तकावरून किंवा कथेवरून जर videos बनवायचे असेल तर काय काय कायदेशीर बाबी बघाव्यात व त्याचे हक्क कसे घ्यावेत या बद्दल कृपया माहिती द्यावी.
अभ्यासक्रम आणि कॉलेज माहिती बाबत
माझा एक भाऊ १२ वी पास झालेला आहे. चित्रकला फाउंडेशन वर्ग पूर्ण व ग्राफिकचा एक पायाभूत खाजगी कोर्स केलेला आहे. त्याला ऍनिमेशन साठी खालील कॉलेजात प्रवेश घ्यायचा आहे. प्राथमिक चाचणी उत्तीर्ण झालेला आहे. पण आम्हाला या क्षेत्रातील काहीच माहिती नाही, तसेच या कॉलेज विषयीसुद्धा काही नाही. या कॉलेज मध्ये भारतातून २४० विद्यार्थी घेतात हे समजले आहे. भविष्यात येथे शिक्षण उपयुक्त असेल का? आणि याशिवाय आपणास यावर काही माहिती देता आली तर आपला आभारी असेन. आपणापैकी कोणास या क्षेत्रातील भावी उत्तम आणि उपयुक्त शिक्षणाची माहिती असेल तर जरुर द्या.