अशीही एक गोष्ट

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
3 Aug 2018 - 11:04 am

अशीही एक गोष्ट

कॅटीने रोहनकडे वळून बघितले आणि हसली.

"Hey! I really mean it. I really love you." त्याने आर्जवी स्वरात तिला सांगितले.

"Please Ron! It's over. Don't come after me." तिने त्याच्याकडे पाठ करताना म्हंटले; एक सिगरेट पेटवली आणि आपली बॅग घेऊन निघून गेली.

रोहन तिच्या त्या मागे परत वळूनही न बघता तडातडा जाण्याकडे अवाक् होऊन बघत बसला. आणि का कोण जाणे त्याला मिताली आठवली.

****

मिताली आणि रोहन एकाच शाळेत आणि मग पुढे बारावी पर्यंत एकाच कॉलेजमध्ये. त्यामुळे जाणे-येणे एकत्र. पक्की दोस्ती दोघांची. मिताली प्रचंड बडबडी. रोहन मात्र तसा कमी बोलणारा. रोहनला मोजकेच मित्र होते आणि ते ही सगळे एकदम करियर ओरियेंटेड! त्यांच्याबरोबर राहून रोहन देखील सतत पुढे काय शिकायचं आणि कसं शिकायचं याचा विचार करत असे आणि तेवढंच बोलत असे.

बारावीनंतर मितालीने पॅरामेडिकल विषय घेतले आणि रोहनने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. दोघांचे रस्ते वेगळे झाले. आता त्यांचं भेटणं अगदीच होईनास झालं. मितालीच अधून-मधून मुद्दाम रोहनला भेटायला घरी यायची. पण ती आली म्हणून रोहन हातातली कामं सोडून कधी तिच्याबरोबर बसला नाही. शिक्षण होत होते. मिताली ग्रॅज्युएट झाली आणि रोहन इंजिनिअर.

रिझल्टच्या दुसऱ्याच दिवशी रोहनच्या वडिलांनी त्याला विचारलं,"मग आता आपल्या ऑफिसमध्ये कधीपासून येणार आहेस?"

त्यांनी हा प्रश्न विचारला आणि रोहनने घरात मोठा बॉम्ब फोडला. "बाबा, आई.... आजी....
मी लंडनला जाणार आहे. मला अजून शिकायचे आहे. मी फक्त बावीस वर्षांचा आहे. मला अजून शिकायचं आहे. मुख्य म्हणजे इतक्या लवकर बाबांबरोबर कामाला लागलो तर मग मी माझं आयुष्य कधी जगायचं?"

त्याच्या या निर्णयाने घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं. मात्र त्यावर कोणीही काहीही बोललं नाही. "बर! शिक हवा तेवढा." अस म्हणून वडिलांनी विषय संपवला.

दुसऱ्या दिवसापासून रोहनची धावपळ सुरू झाली. लंडनच्या सर्वात चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये मॅनेजमेंट कोर्ससाठी त्याने स्कॉलरशिप मिळवली आणि जाण्याची तयारी सुरू केली.

एकदिवस संध्याकाळी त्याची आई त्याच्या खोलीत आली आणि म्हणाली,"रोहन, मला तुझ्याशी बोलायचं आहे. मोकळा आहेस का?"

आई हे असं का विचारते आहे ते रोहनच्या लक्षात येईना. त्याने हातातले काम बाजूला ठेवले आणि आईचा हात धरून तिला पलंगावर बसवले आणि म्हणाला,"आई, मला माहित आहे की माझ्या जाण्याच्या निर्णयाने तुम्ही फारसे खुश नाही आहात. माझ्याशी कोणी धड बोलतही नाही आहे. पण आई, मला खरच अजून शिकावस वाटत आहे. इतक्या लवकर बाबांच्या व्यवसायात मला नाही पडायचं."

त्यावर हसून अशी म्हणाली,"रोहन, आमचं तुझ्या अजून शिकण्याबद्दल काहीच हरकत नाही. मला तुला दुसरंच काहीतरी विचारायच आहे."

तिच्या शेजारी बसत रोहन म्हणाला, "आई, असं फॉर्मल नको बोलुस. विचार न तुला काय विचारायचं आहे ते."

आईने रोहनच्या थेट डोळ्यात बघत त्याला विचारले,"रोहन, तुझा मितालीच्या बाबतीत काय विचार आहे? तू जाण्या अगोदर असपन साखरपुडा करून घ्यायचा आहे की लग्नच उरकून टाकायचं आहे? म्हणजे ती देखील येईल तुझ्याबरोबर लंडनला."

आईच्या त्या प्रश्नाने रोहन चक्रावूनच गेला. हे अचानक मितालीच काय आहे? आपण तर असा विचारही केलेला नाही. मग आईला असं का वाटावं?

त्याने आईकडे गोंधळून बघत विचारलं,"आई, हे साखरपुडा-लग्न काय बोलते आहेस?"

आता गोंधळून जायची पाळी आईची होती. तिने प्रश्नार्थक नजरेने रोहनकडे बघितले आणि म्हणाली,"अरे रोहन; तुझं आणि मितालीच एकमेकांवर प्रेम आहे न? नाहीतर ती तुझ्या खोलीत येऊन तासंतास का बसायची? तुम्ही इतक्या काय गप्पा मारायचात? अरे, तुम्ही दोघे लहानपणापासून एकत्र आहात; बारावीनंतर दोघांच्या वाटा वेगळ्या झाल्या तरी तुमचं भेटणं तसंच राहिलं. तुला कोणी नवीन मैत्रीण नाही; ती हक्काने आपल्या घरी येते... काय समजावा आम्ही याचा अर्थ?"

"आई, याचा अर्थ इतकाच की आमची चांगली मैत्री आहे." रोहन थोडा वैतागून म्हणाला. नेमकं त्याचवेळी मिताली त्याच्या खोलीच्या दारात येऊन उभी राहिली होती. तिला पाहून रोहनची आई पलंगावरून उठली आणि खोलीबाहेर गेली. जाताना तिने मितालीच्या खांद्यावर थोपटल्यासारखे केले.

आई बाहेर जाताच मिताली खोलीत शिरली आणि रोहनच्या पुढ्यात उभी राहिली. "रोहन, माझं तुझ्यावर प्रेम आहे. मला इतके दिवस वाटत होतं की तुझ्याही मनात माझ्याबद्दल अशाच भावना आहेत."

मितालीच्या या अचानक स्पष्ट बोलण्याने रोहन गडबडला. मात्र तिच्या समोर उभा राहात तो म्हणाला,"मिताली, तू माझी एकदम खास मैत्रीण आहेस. मात्र सध्या तरी माझ्या मनात पुढच्या शिक्षणाव्यरीरिक्त दुसरा कोणताही विचार नाही."

त्याच्या डोळ्यात डोळे घालून मिताली क्षणभर उभी राहिली आणि मग शांतपणे म्हणाली,"रोहन, I understand. काहीच हरकत नाही. तू जा लंडनला शिकण्यासाठी. मला देखील अजून दोन वर्षे पुढचं शिक्षण घ्यायला लागतीलच. मात्र मला एका प्रश्नच उत्तर दे. कधीतरी तर तू नक्कीच लग्नाचा विचार करशील ना? त्यावेळी किमान तुझ्या मनातल्या माझ्याबद्दलच्या भावना मला सांगशील का?"

तिच्या बोलण्याने का कोणास ठाऊक पण रोहनला सुटल्यासारखे वाटले. तिच्याकडे बघत तो म्हणाला,"नक्की मिताली. लंडनचं शिक्षण संपवून मी परत येण्याचा विचार करतो आहे. एकदा शिक्षण संपलं की मला देखील छान लग्न करून संसार करायचा आहे. त्यामुळे आपल्यात काहीतरी घडू देखील शकतं हं."

त्याचं उत्तर ऐकून मिताली मनापासून हसली.

रोहन लंडनला गेला आणि त्याचं शिक्षण सुरू झालं. नवीन शहर, नवे मित्र, नवं आयुष्य! रोहन जणूकाही मगच सगळं सोडून आला होता. परदेशातल आयुष्य तो तिथल्याच पद्धतीने जगू लागला होता. पाहाता पाहाता दोन वर्ष सरली आणि रोहनचं शिक्षण संपलं. मात्र कॅम्पस इंटरव्युमध्ये रोहनला लंडनमधील एका खूप चांगल्या कंपनीकडून उत्तम ऑफर आली. पुढचा-मागचा विचार न करता त्याने ती स्वीकारली. घरी कळवून टाकले की अजून एक वर्ष अनुभव घेण्यासाठी तो लंडनलाच राहणार आहे.

त्याच्या आईने त्याला फोनवरून आठवण करून दिली की त्याने तिला शब्द दिला होता की तो शिक्षण संपताच परत येईल. रोहनने आईला समजावले की या नोकरीच्या अनुभवाचा उपयोग त्याला पुढे व्यवसायात खूप होईल. त्याच्या त्या बोलण्याने आई निरुत्तर झाली.

रोहनची नोकरी सुरू झाली. बघता बघता दिवस... महिनेच काय पण फोन वर्षे देखील उलटून गेली. सुरवातीला एकदा रोहनचे आई-वडील दोघांनी आणि मग एक-दोन वेळा आईने त्याला परत येण्याबद्दल विचारले. मात्र "मी अजून काहीही ठरवलेले नाही;" असे उत्तर देऊन रोहनने विषय संपवला.

असेच दिवस जात होते आणि रोहनच्या ऑफिसमध्ये एक मुलगी जॉईन झाली. तिचं नाव कॅटी होते. रोहनची आणि कॅटीची दोस्ती फारच पटकन झाली. दोस्तीचं प्रेमात रूपांतर कधी झालं दोघांच्याही लक्षात आलं नाही. कॅटी तशी एकटीच राहात असल्याने ती दोन-तीन महिन्यातच रोहनच्या अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली.

आता दोघांच्या रिलेशनशिपला सहा महिने हकुन गेले होते. एका शनिवारी संध्याकाळी रोहनने फिरंगीपद्धतीने कॅटीला लग्नाची मागणी घातली., भर रस्त्यात एका गुडघ्यावर बसत त्याने तिला अंगठी दिली. कॅटीने देखील ती अंगाठी स्वीकारत लग्नाला होकार दिला.

रोहनने लगेच आई-वडिलांना त्याच्या लग्नाची बातमी दिली. ते दोघे देखील त्याला आणि कॅटीला आशीर्वाद द्यायला लंडनला आले. मात्र लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी ते परत जायला निघाले. रोहनची इच्छा होती की त्यांनी अजून काही दिवस राहावं. पण वडिलांनी त्याला सांगितलं,"रोहन, तुला मध्ये कळवलं होत ते आठवत का? अरे, तुझ्या आजीची तब्बेत अलीकडे ठीक नसते. त्यामुळे आम्ही लगेच परत गेलेलंच बरं. त्यात तुझं नवीन लग्न झालं आहे. उगाच आमची अडचण नको."

यावर रोहन काहीच बोलला नाही. लग्न सोहळा असा काही नव्हताच. कॅटीच्या इच्छेप्रमाणे चर्चमध्ये लग्न झाले आणि दुसऱ्याच दिवशी रोहनचे आई-वडील भारतात परतले.

रोहन त्याच्या आयुष्यावर भलताच खुश होता. तो आणि कॅटी एकत्र ऑफिसमध्ये जायला बाहेर पडत आणि एकत्र येत. आता अनेक वर्षे परदेशात राहिल्यामुळे रोहनने तिथली जीवनपद्धत स्वीकारली होती. सगळं सुरळीत चाललं होतं. अशीच तीन वर्षे उलटली आणि एका सकाळी कॅटीने रोहनला गोड बातमी दिली. ती आई होणार होती आणि रोहन वडील! रोहनचा आनंद गगनात मावत नव्हता. त्याने त्याच्या आईला लगेच फोन करून कळवले आणि कॅटीच्या बाळंतपणासाठी येण्याचा आग्रह केला. आईने देखील लगेच होकार दिला. कॅटी शेवटच्या महिन्यापर्यंत ऑफिसला जाणार होती; त्यामुळे रोहनने आईला नवव्या महिन्यातच यायला सांगितले.

रोहनच्या इच्छेप्रमाणे त्याची आई कॅटीला नववा महिना लागल्यावर आठ दिवसांनी आली. रोहनचे वडील देखील तिच्याबरोबर आले होते. अजून 3 आठवडे वेळ होता आणि कोणताही त्रास होत नव्हता त्यामुळे कॅटी अजूनही ऑफिसला जात होती.

दुसऱ्या दिवशी रोहनच्या आईने कॅटीला सांगितले की आता काहीच दिवस उरले आहेत त्यामुळे जास्त दमणे योग्य नाही. जर कॅटी घरी राहिली तर तिच्या आवडीचे पदार्थ करून तिला खायला घालायची रोहनच्या आईची इच्छा होती. मात्र कॅटीला हे अजिबात मान्य नव्हते. तिने रोहनला स्पष्ट शब्दात सांगितले,"माझे बाळंतपण हा माझा वयक्तिक प्रश्न आहे. तुझी इच्छा म्हणून तु तुझ्या आई-वडिलांना बोलावले आहेस. त्यामुळे त्यांच्या इच्छा आणि अपेक्षा तू पूर्ण कर. ती माझी जवाबदारी नाही. फारतर डिलिव्हरी नंतर मी परत कामाला जायला लागेन तेव्हा बाळाला सांभाळायला तुझी आई राहिली तर चालेल. मात्र तिने हे विसरू नये की ती माझ्या घरात राहाते आहे. त्यामुळे या घरातल्या नियमांप्रमाणे तिला राहावे लागेल. मात्र बाळ जन्मले की तुझ्या वडिलांनी परत गेले पाहिजे. बाळ असताना घरात इतकी माणसं असलेली मला चालणार नाही."

कॅटीच्या बोलण्याने रोहन एकदम स्थब्द झाला. ती असं काही सांगेल असं त्याला कधीच वाटले नव्हते. वडिलांना एकट्याला परत जायला सांगणे त्याच्या जीवावर आले होते. त्यामुळे डिलिव्हरी नंतर बघू; असा विचार करून तो गप्प बसला.

यथावकाश कॅटी बाळंत झाली आणि तिला एक गोंडस मुलगी झाली. बाळ आणि बाळंतीण अगदी व्यवस्थित होते. कॅटीला हॉस्पिटलमधील तिच्या रूममध्ये आणल्यानंतर रोहन आणि त्याचे आई-वडील घरी परतले. अजूनही रोहनच्या मनातली द्विधा मनस्थिती संपलेली नव्हती. आपण केवळ आपल्या वडिलांना परत जाण्यासाठी कसं सांगायचं; याचा विचार करत तो सोफ्यावर बसला होता.

त्याचवेळी त्याचे वडील त्याच्याशी बोलण्यासाठी आले. रोहनच्या लक्षात आले की बाहेर येताना त्यांनी त्यांची सुटकेस देखील आणली आहे. एकीकडे त्याला खूप आश्चर्य वाटले आणि त्याचवेळी मनात खोल कुठेतरी सुटल्यासारखे देखील वाटले. चेहेऱ्यावर आश्चर्याचे भाव आणत त्याने वडिलांना विचारले,"अरे बाबा, असे अचानक कुठे निघालात तुम्ही?"

त्यावर त्याच्याजवळ येऊन त्याच्या खांद्यावर थोपटत त्याचे वडील म्हणाले,"रोहन, मी आणि तुझ्या आईने भारत तर बराच बघितला आहे. पण संसार-व्यवसाय यामुळे भारताबाहेर कधी फिरता नाही आले. आता मात्र असे नाही. मी गेल्याच वर्षी माझा व्यवसाय विकून टाकला. खूपच चांगली किंमत मिळाली आहे. घर तर आहेच. आमचा दोघांचा असा खर्च फार नाही. त्यामुळे मनात युरोप बघायची खूप इच्छा होती; ती आता मी पूर्ण करणार आहे."

वडिलांच्या बोलण्याने रोहन गोंधळून गेला. "पण बाबा, तुम्ही असे अचानक एकटेच कसे फिरणार आहात?" त्याने विचारले.

त्यावर हसत त्याचे वडील म्हणाले,"अरे एकटा कुठे? मी आणि तुझी आई दोघेही बघणार आहोत युरोप. अरे, तिनेदेखील खूप केलंय आयुष्यभर. आपल्याकडे नातेवाईक किती यायचे तुला आठवतं का? तिने कधीच तक्रार केली नाही... उलट सगळ्यांना जोडून घेतलं. पण माझं मात्र तिच्याकडे खूपच दुर्लक्ष झालं. आता कोणतीच जवाबदारी नाही.... बांधिलकी नाही. त्यामुळे आम्ही मोकळेपणी फिरणार आहोत. मी एका टूर कंपनीकडून सगळं बुकिंग करून घेतलं आहे. त्यामुळे तू आमची काळजी करू नकोस."

आई देखील वडिलांबरोबर जाणार हे ऐकून मात्र रोहन गडबडला. बाहेर येणाऱ्या आईकडे जाऊन तिचा हात हातात घेऊन तो म्हणाला,"आई, अग कॅटी नुकतीच बाळंतीण झाली आहे. तिला हे सगळंच नवीन आहे. त्यावेळी तिला तुझ्या मदतीची गरज आहे ग. असं अचानक नको जाऊस तू."

रोहनच्या हातावर थोपटत आई म्हणाली,"रोहन, अरे इथली टेक्नॉलॉजी इतकी पुढारलेली आहे की तिला माझी गरजच लागणार नाही."

"अग, तरीपण.... घरच्या मोठ्या बाईचं असणं किती महत्वाचं असतं. आता हे सगळं मी काय सांगू तुला?" रोहन काकुळतीला येऊन म्हणाला.

त्यावर त्याच्या हातातून आपला हात सोडवून घेत आणि मंद हसत आई म्हणाली,"अरे, लंडनच्या घरात मोठ्या बाईच्या असण्याने किंवा नसण्याने फार फरक नाही पडणार. पण जर आता मी ह्यांच्या बरोबर नाही राहिले न तर कदाचित् आम्ही एकत्र बघितलेली स्वप्न कधीच पूर्ण होणार नाहीत; आणि रोहन, स्वप्न बघणं आणि पूर्ण करण हे तुझ्यातकं चांगलं कोणाला समजणार? नाही का?"

रोहन एकदम स्थब्द झाला. "आई, मला असं का वाटत आहे की तू मला ऐकवून दाखवते आहेस?" रोहनने दुखावलेल्या आवाजात आईला विचारले.

"रोहन तुला असं का वाटतय? तू असं काही केलं आहेस का की मी तुला ऐकवून दाखवावं? बर, ते जाऊ दे. आम्ही निघतो आहोत. आम्हाला सोडायला तू येणार आहेस का?" रोहनच्या आईने त्याला विचारले. त्यावर रोहनने काही म्हणायच्या आत त्याचे वडीलच उत्तरले,"अग, तो हॉस्पिटलमधून दमून आला आहे. त्याला कुठे सोडायला सांगते आहेस? मी गाडी बुक केली आहे. येईलच ती एवढ्यात. तुझं सगळ आटपल आहे न?" त्यावर त्यांच्याकडे हसत बघत रोहनची आई म्हणाली,"होय. कधीचच सगळी बांधाबांध करून ठेवली होती. त्यातूनही काही विसरलेच तर नवीन विकत घेऊ. काय?" त्यावर मनापासून हसत रोहनच्या वडिलांनी त्यांची सुटकेस उचलली.

असेच दिवस जात होते. रोहनची मुलगी ऍना तीन वर्षांची झाली होती. तिला तिच्या आई पेक्षा तिच्या वडिलांचाच जास्त लळा होता. ती सतत रोहनच्या पुढे मागे असायची. रोहन आणि कॅटी ऑफिसला जाताना ऍनाला एका day care senter मध्ये सोडून जायचे. संध्याकाळी रोहन तिला घेऊन घरी यायचा. ऍनाच्या जन्मानंतर रोहन घरी जास्त थांबायला लागला होता. मात्र कॅटीच्या दिनक्रमात फारसा बदल झालेला नव्हता. कॅटीला दर शनिवार-रविवार कुठे ना कुठे जायचे असायचे. अशावेळी कधी ऍनाला घेऊन तर कधी न घेता जायला तिची हरकत नसायची. तिच्या मते day care senter मध्ये ऍना मजेत राहू शकत होती. मात्र रोहनला वाटायचे की एरवी सोमवार ते शुक्रवार आपण खूपच कमी वेळ ऍनाला देतो. मग किमान शनिवार-रविवार आपण तिच्याबरोबर राहाणे आवश्यक आहे.

याविषयावरून अलीकडे कॅटी आणि रोहनमध्ये वाद व्हायला लागले होते. हळूहळू रोहन बाहेर जाण्याचे टाळायला लागला. कॅटी मात्र तिच्या मित्र-मैत्रिणींबरोबरचे कार्यक्रम अजिबात रद्द करायला तयार नसायची. असच वर्ष उलटलं आणि एका शनिवारी संध्याकाळी कॅटी घरीच थांबली. आज रोहनने ऍनाला बागेत न्यायचे ठरवले होते. त्यामुळे तो त्याची आणि ऍनाची तयारी करण्यात मग्न होता. संध्याकाळ झाली तरी कॅटीला घरात बघून त्याला थोडे आश्चर्य वाटले. त्याने तिच्या जवळ जात तिला विचारले,"Sweetheart, is everything fine with you? Are you not well or sothing?"

त्यावर त्याच्याकडे बघत कॅटी म्हणाली,"Ron, I want to tell you something."

धास्तावून रोहनने विचारले,"What is it dear? Why are you sounding so serious? Am getting worried now. Please tell me is everything fine with you?"

"Don't be so dramatic Ron. Everything is fine with me. Its just that, am really board staying with you. You have changed a lot. You are no more that Ron whome is use to love. You are now only Anni's father. I can't see my husband in you. And so don't wnat to stay with you. I have found someone else in my life. Who really loves me." कॅटीने शांतपणे तिच्या मनातले रोहनला सांगितले. तिचा तो शांतपणा बघून आणि तिचे बोलणे एकून रोहनला त्याच्या कानावर विश्वासच बसेनासा झाला. तो पूर्ण हबकून घेला. त्याने कॅटीचा हात हातात घेतला आणि तिच्या डोळ्यात बघत म्हणाला,"Sweetheart, what are you talking? We have a baby now. its nearly six years that we are together and now suddenly you are saying that you don't want to be in this marrage..... I am totally confused dear. Don't say that. If there's anything that you want me to change.... I will try and change. But don't leave me and Anaa like this........"

कॅटीच्या मते तिने तिला जे सांगायचे होते ते सांगितले होते. त्यामुळे आता यात अजून काही बोलण्यासारखे किंवा चर्चा करण्यासारखे उरले नव्हते. त्यामुळे तिने तिचे सगळे सामान आवरले आणि घराचा दरवाजा उघडून ती बाहेर पडली.

तिला असे जाताना बघून का कोण जाणे पण रोहन म्हणाला,"Caty I'll wait for you. Some day you will reaslise that me and Anaa love you the most. Am sure then you will come back to me..... I'll wait for that day......................."

.................................................कॅटीने रोहनकडे वळून बघितले आणि हसली.

"Hey! I really mean it. I really love you." त्याने आर्जवी स्वरात तिला सांगितले.

"Please Ron! It's over. Don't come after me." तिने त्याच्याकडे पाठ करताना म्हंटले; एक सिगरेट पेटवली आणि आपली बॅग घेऊन निघून गेली.

रोहन तिच्या त्या मागे परत वळूनही न बघता तडातडा जाण्याकडे अवाक् होऊन बघत बसला. आणि का कोण जाणे त्याला मिताली आठवली.
****
ऍना रोहनचा हात धरून उभी होती. काय चालू आहे हे तिला अजिबात कळले नव्हते. तिची आई अशी नेहेमीच निघून जात असे आणि तिचे वडील तिच्या बरोबर असत. त्यामुळे बॅग घेऊन दूर जाणाऱ्या आईला बघून तिला अजिबात रडायला येत नव्हते. उलट आपले वडील आपल्याला बाहेर घेऊन जाणार आहेत या आनंदात ती होती. त्या लहानग्या बाळाला रोहनच्या मनस्थीतीची अजिबात कल्पना नव्हती. रोहनने स्वतःला सावरले आणि लहानग्या ऍना ला वाईट वाटू नये म्हणून तिला घेऊन तो बाहेर पडला. बगिचामध्ये खेळून ऍना खूपच दमली. घरी आल्यावर जेमतेम दूध प्यायली आणि तिथेच सोफ्यावर झोपून गेली. ऍना झोपली आणि रोहनच्या मनातल्या विचार चक्राने वेग घेतला. आज रोहन खरच मनातून हलला होता... त्यामुळे आजवर जगलेल्या आयुष्याचा विचार त्याच्या मनात येत होता.

आपण खूपच चुकत गेलो... फक्त स्वतःचा विचार करत राहिलो..... या जाणिवेने तो अजूनच अस्वस्थ झाला. त्याने फोन उचलला आणि घरी आईला फोन लावला. रोहनचा आवाज एकून आई एकदम गडबडून गेली. काळजीच्या स्वरात तिने विचारले,"रोहन, काय झालं बाळा? तू ठीक आहेस ना? ऍना आणि कॅटी कशा आहेत?" आईचा काळजी भरलेला आवाज एकून रोहनच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. मात्र आवाजावर ताबा ठेवत तो म्हणाला,"अग, सगळ ठीक आहे. आज शनिवार न! ऍनाला फिरायला नेलं होत. ती घरी येईपर्यंत दमली आणि लगेच झोपली. सगळच लवकर आटपल होत आणि सहज तुझी आठवण झाली म्हणून फोन केला."

रोहनला आईने सुटकेचा स्वास सोडलेला ऐकू आला. शांतावलेल्या आवाजात त्याची आई म्हाणाली,"अरे तू असा कधी फोन करत नाहीस ना... म्हणून एकदम काळजी वाटली. पण बर वाटलं एकून की तुला माझी आठवण पण येते. बर ते जाऊ दे! कसा आहेस तू? काही नवीन आहे की नाही सांगण्यासारखं?" त्यावर रोहन म्हणाला,"आई, काही नवीन असेल तरच फोन करायचा का मी?" रोहनला आई हसल्याचा आवाज आला आणि ती म्हणाली,"रोहन, तू सहज म्हणून कधीच फोन करत नाहीस. काही सांगायचं असलं की फक्त तू फोन करतोस. ते ही अगोदर मेसेज करतोस की इतक्या वाजता तू फोन करशील आणि तसाच तुझा फोन येतो. त्यामुळे हे असं तू अचानक आणि ते ही सहज फोन केला आहेस यावर विश्वासच बसत नाही. बर, ते जाऊ दे. बर झालं तू फोन केलास ते. मी विचारच करत होते तुला मेसेज करून फोन करू का विचारायचा. तुला एक बातमी द्यायची होती."

आईने विषय बदलला तशी रोहनला बरे वाटले. त्याने आईला मऊ आवाजात आणि उत्सुकतेने विचारले,"काय बातमी आहे ग?"

रोहनची आई उत्साहाने सांगू लागली,"अरे आमची मिताली ती देखील कालच लंडनला आली आहे. तिचा दोन दिवसांचा सेमिनार होता. पण रहाणार नाही फार. उद्याच निघणार बघ ती परत यायला. सोमवारी बाबांच्या काही टेस्ट करून घ्यायच्या आहेत ना. तर ती म्हणाली मी येते मगच जाऊ. तुला तिचा मोबाईल नंबर पाठवते. वेळ मिळाला तर तिला फोन करशील का? बर वाटेल तिला."

आईचं बोलण एकून रोहन म्हणाला,"आई, बाबांना बर नाही आहे का? आणि मिताली का आणि कशी काय येईल तुमच्या बरोबर?" त्यावर रोहनच्या आईने त्याला सांगितले,"अरे रोहन, मितालीच आमची सगळी काळजी घेते. शेजारीच राहाते ना ती. त्यामुळे सगळ तीच बघते." रोहनला ते एकून आश्चर्य वाटले. "मिताली अजूनही आपल्या शेजारच्या घरातच राहते? ओह!" अस म्हणून तो गप झाला. मग विषय बदलत म्हणला,"अग आई, मी आजच मितालीचा विचार करत होतो आणि तू सांगते आहेस ती इथेच लंडनमध्ये आहे; हा कोणता योगायोग तर नाही ना?" त्याच्या बोलण्यावर हसत त्याची आई म्हाणाली,"रोहन, आज खरच सगळच नकळणारं बोलतो आहेस तू. अरे योगायोग.... आपल्या आयुष्यातल्या माणसांचा विचार करण.... अस सगळ तुझ्या तोंडून ऐकायची सवय नाही रे मला." आईच्या त्या बोलण्याने रोहन दुखावला गेला. मात्र तो त्यावर काहीच बोलला नाही. क्षणभर थांबून त्याची आई म्हाणाली,"तुला मितालीचा नंबर मेसेज करते ह. जमलं तर बोलून घे. चल, ठेवते मी फोन. इथे जवळ जवळ बारा वाजत आले आहेत. आमची झोपायची वेळ झाली आहे. मी समजू शकते; तुला तर भारतीय वेळ लक्षात ठेवण्याची सवयच राहिली नसेल न? चल, गुड नाईट."

आईच्या वाक्-बाणांनी दुखावला गेलेल्या रोहनने फोन ठेवला. काही क्षणातच त्याचा फोन वाजला. त्याने बघितले तर आईने मितालीचा मोबाईल नंबर रोहनला पाठवला होता. रोहन कितीतरी वेळ फोनकडे बघत बसला होता. मितालीला फोन करावा की नाही हा निर्णय तो घेऊ शकत नव्हता. शेवटी अंघोळ करून मग ठरवू तिला फोन करायचा की नाही असा विचार करून रोहन अंघोळीला गेला. तो बाहेर आला तर त्याच्या फोनवर मितालीचा फोन येऊन गेला होता. तिचा मिसकॉल बघून रोहनच्या काळजाचा ठोकाच चुकला. त्याने फोन उचलला आणि लगेच मितालीला फोन लावला. रिंग वाजत असताना त्याला त्याच्याच हृदयाचे थोडे ऐकायला येत होते. पलीकडून फोन उचललेला रोहनच्या लक्षात आला आणि त्याने श्वास रोखून ठेवला.

त्याला मितालीचा तोच जुना हसरा आवाज ऐकू आला. "रोहन? अरे काकुंचा फोन होता की तू त्यांना आज अचानक फोन करून माझ्याबद्दल विचारलेस. त्यांनी मला सांगितले की त्यांनी तुला माझा नंबर दिला आहे. पण मला खात्री आहे तू काही आपणहून फोन करणार नाहीस. म्हणून मग मीच तुला फोन केला." रोहनच्या मनात आलं मितालीच बोलण अजूनही तसच खळाळत्या झऱ्यासारखं आहे. पूर्वी देखील तीच आपणहून येऊन बोलायची....

त्याच्या मनातले विचार थांबत नव्हते. परत त्याला मितालीचा आवाज ऐकू आला. "अरे रोहन? आहेस की फोन ठेवलास? बोल की! गप बसायला फोन अटेंड केला आहेस का? हा माझा भारतातला नंबर आहे बाबा. त्यामुळे मला रोमिंग चार्जेस पडतात. तुझी शांतता ऐकायला नाही मी फोन केला." इतकं बोलून मिताली खळखळून हसली.

आपण अजूनही काहीच बोललेलो नाही हे लक्षात येऊन रोहन ओशाळला आणि म्हणाला,"कशी आहेस मिताली? अचानक लंडनला कशी काय? कसला सेमिनार आहे तुझा?"

"अरे अचानक नाही... आता तिसऱ्यांदा येते आहे गेल्या दोन वर्षात. मी प्रोफेसर झाले आहे बाबा. एका विषयावर लेक्चर द्यायला आले होते. बर, ते जाऊ दे. मी उद्या दुपारच्या विमानाने परत जाते आहे. त्यागोदर तुला भेटता येणार आहे की आपण फोनवरच बोलायचं आहे?" मितालीने त्याला स्पष्ट प्रश्न केला. त्यावर रोहन तिला म्हणाला,"मिताली मला खरच भेटायला आवडलं असत. पण कॅटी नाही आहे आणि ऍना झोपली आहे. शनिवारी संध्याकाळी अचानक बेबी सीटर नाही मिळणार." त्यावर हसत मोकळेपणी मिताली म्हणाली,"अरे काहीच हरकत नाही. भेटायची इच्छा असणे महत्वाचे. बाकी सगळे जमवता येते. तुला नाही जमत तर मी येते तुझ्या घरी. पत्ता मला मेसेज कर." त्यावर आनंदून रोहन "ठीक आहे;" म्हणाला आणि त्याने लगेच मितालीला त्याचा पत्ता मेसेज केला.

रोहनला खरच अगदी मनापासून मितालीला भेटायचं होत. त्याने आजवर केलेल्या सगळ्या चुकांची माफी मागायची होती. त्यामुळे तो अधीर मनाने मितालीची वाट बघत होता. त्याने ऍनाला हलकेच उचलून तिच्या पलंगावर नेऊन ठेवले. तसे घर आवरलेलेचे होते. तरी देखील परत एकदा सगळे निट जागेवर आहे की नाही ते बघितले. पहाता पहाता दोन तास होऊन घेले. अजूनही मिताली आली नव्हती. शेवटी त्याने तिला फोन लावला आणि तिने फोन उचलताच विचारले,"अग, येते आहेस ना? मी वाट बघतो आहे. कुठे अडकलीस की पत्ता शोधायला अडचण आली?" त्यावर हसत हसत मिताली म्हणाली,"अरे काही तासांची वाट बघायला लागली तर तू इतका अस्वस्थ झालास. इतरांना तर तू आयुष्यभर वाट बघायला लावली आहेस.... त्याचा कधी विचार केला आहेस का?" तिच्या त्या बोलण्याने रोहन एकदम गप झाला. तशी अजूनच जोरात हसत मिताली म्हणाली,"चल दार उघड. 'तुझ्या वाट बघतो आहे;' या फोनची वाट बघत गेला अर्धा तास तुझ्या घराबाहेर थांबले आहे."

तिच्या त्या बोलण्याने मात्र रोहन अगदीच गळून गेला. आज तो कॅटीच्या अचानक जाण्याने मनातून दुखावलेला होता; त्याला त्याच्या आजवरच्या वागण्याचा पश्चात्ताप झाला होता. त्याला मनापासून मितालीची माफी मागायची होती. मात्र ती फोनवर बोलताना त्याला जे टँट्स मारत होती त्यामुळे तो खूपच घायाळ झाला होता. तो मुकाटपणे उठला आणि दार उघडले. त्याच्या समोर मिटली उभी होती. अंगाने थोडी भरली होती. पण छान दिसत होती. तिला चक्क चष्मा लागला होता आणि तिने साडी नेसली होती. रोहनने दार उघडताच तिने त्याला शेकहॅन्ड केले आणि ती हसत हसत त्याच्या घरात शिरली.

रोहनने दार बंद केले आणि तो देखील मागे वळला. मिताली त्याचं घर कौतुकाने बघत होती. "रोहन, सुंदर सजवलं आहेस ह घर. तुझी आवड की कॅटीची?" मितालीने अगदी मनापासून दाद दिली. त्यावर रोहनने शांतपणे उत्तर दिले. "दोघांची. तिला जे आवडत ते ती आणते आणि मला जे आवडत ते मी."

"अरे वा! म्हणजे तू इथली फ्री आणि ओपन संस्कृती चांगलीच आत्मसाद केली आहेस म्हणायचं. चांगलं आहे तुझ्यासाठी. बर तुझी लेक कुठे आहे? झोपली आहे म्हणाला होतास न? तिला लांबूनच बघितलं तर चालेल का?" मितालीने विचारले. त्यावर तिला ऍनाच्या बेडरूमच्या दिशेने नेत रोहन म्हणाला,"अग तिची झोप शांत आहे. काहीच हरकत नाही. ये न. तिची बेडरूम इथे आहे."

रोहन आणि मिटली दोघेही हलक्याच पावलांनी ऍनाच्या बेडरूममध्ये गेले. ऍना शांत झोपली होती. तिला बघून मितालीच्या चेहेऱ्यावर एक प्रेमळ हसू उमटलं. तिने हळूच पर्समध्ये हात घालून एक छानसं टेडी बेर बाहेर काढलं आणि ऍनाच्या शेजारी ठेवलं. मग दोघेही बाहेर आले आणि सोफ्यावर बसले.

रोहनला कळेना काही वेळापूर्वी आपल्याला मितालीला भेटायची घाई झाली होती आणि आता ती समोर बसली आहे पण तिच्याशी काय बोलावं ते का सुचत नाही. मिताली देखील तिच्या विचारात गढलेली होती. काही क्षण असेच शांततेत गेले. रोहनने एकदम मितालीला विचारले,"कॉफी घेणार का मिताली?" त्याच्या प्रश्नाने मिताली तंद्रीतून जागी झाली आणि प्रसन्न चेहेऱ्याने म्हणाली,"हो! नक्की घेणार. संपूर्ण दिवस सेमिनारमध्ये बोलून आणि गप्पा मारून कंटाळा आला आहे. मस्त स्ट्रॉंग कॉफी कर."

तिने हो म्हणताच रोहन कॉफी करायला उठला. त्याच्याबरोबर उठत मिताली म्हणाली,"चल, मी पण येते आत. म्हणजे आपल्या गप्पा होतील. नाहीतर तू कॉफी घेऊन येईपर्यंत मी एकटी बसले तर मला झोप येईल."

दोघेही आत आले आणि रोहन कॉफी करायला लागला. मिताली ओट्याला टाकून उभी होती. ती त्याच्या हालचाली निरखत होती. काही क्षण शांततेत गेले आणि मिताली म्हणाली,"रोहन, काय झालं आहे? तू इतका अस्वस्थ का आहेस?" तिच्या प्रश्नाने रोहन थोडासा गडबडला. पण तसे न दाखवता तो म्हणाला,"मी अस्वस्थ वगैरे काही नाही ग. आज आईशी बोलायला फोन केला होता. त्यावेळी तुझा विषय निघाला. आई म्हणाली तू इथेच आहेस; आणि तिने तुझा नंबर दिला. मी तुला फोन करणारच होतो. पण त्यागोदर तुझाच फोन आला."

त्याच्या बोलण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करत मिताली म्हाणाली,"रोहन, जर तुला काही सांगायचे नसेल तर माझा आग्रह नाही. मात्र तू असा अचानक न कळवता-न ठरवता आईला फोन करणार नाहीस. समजा केलासच तर माझ्याबद्दल विचारण्याचा काही प्रश्नच येत नाही. त्यामुळे नक्की काहीतरी झाले आहे.... असा माझा कयास आहे. बाकी तुझी मर्जी." मिताली शांत आणि स्पष्ट आवाजात म्हणाली.

तिचे बोलणे एकून मात्र रोहनचा धीर सुटला आणि डोळ्यात पाणी उभे राहिले. त्याच्या डोळ्यात पाणी बघून मिताली पुढे झाली आणि तिने त्याच्या खांद्याला थोपटले. तिच्या प्रेमळ स्पर्शाने तर रोहनचा बांधच फुटला आणि तो हमसून हमसून रडू लागला. मितालीने त्याला प्यायला पाणी दिले आणि त्याचा हात धरून त्याला बाहेर सोफ्यावर बसायला घेऊन आली. बराच वेळ रोहन स्फुंदून स्फुंदून रडत होता आणि मिताली त्याच्या शेजारी बसून त्याला थोपटत होती. थोड्या वेळाने रोहन शांत झाला आणि त्याने डोळे पुसत मितालीकडे बघितले. त्याने वर बघताच मिताली प्रसन्न हसली आणि म्हणाली,"झालं का मन थोडं मोकळ? मग आता बोल. किती आणि काय काय मनात साठवलं आहेस?"

रोहनने तिचे दोन्ही हात हातात घेतले आणि म्हणाला,"मिताली, मी तुमच्या सगळ्यांचाच गुन्हेगार आहे ग. आज मला प्रामाणिकपणे सगळ सांगून टाकायचं आहे. मिताली, तू म्हणाली होतीस की तू माझी वाट बघशील. आपल्यात काही होऊ शकतं अशी आशा देखील मी तुला दाखवली होती. मात्र मी लग्न ठरवलं आणि केलं देखील; मला एक मुलगी देखील झाली पण मला तुझी एकदाही आठवण झाली नाही. मी आईला शब्द दिला होता की मी शिक्षण झाल्यावर परत येईन, नंतर म्हणालो की नोकरीचा अनुभव घेऊन येईन.... आणि बाबांचा व्यवसाय सांभाळीन. पण मी अस काहीच केलं नाही. इथेच राहिलो, इथेच लग्न केलं............ मी सर्वस्वी इथलाच झालो ग. मला आई-बाबांची देखील माफी मागायची आहे. मी मुलगा म्हणून कमी पडलो ग. त्यांना माझी गरज कायम भासली असेल; मात्र त्यांनी ते कधीच बोलून दाखवले नाही. आणि मी स्वतःत इतका मग्न होतो की मी आपणहून ते कधी समजून घेतले नाही. आजीची तब्बेत बरी नसल्याचे बाबांनी कळवले होते त्यावेळी माझी आणि कॅटीची नुकतीच ओळख झाली होती. त्यावेळी जर मी तिला सोडून भारतात आलो असतो तर कदाचित् ती माझी झाली नसती; या भितीमुळे मी बाबांना खोटेच सांगितले की इथे खूप काम असल्याने सुट्टी मिळत नाही आहे. त्यानंतर आई-बाबा आमच्या लग्नाला आले ते देखील मोजून चार दिवसांसाठी. तरीदेखील मी त्यांना राहायचा आग्रह केला नाही. आजी गेली.............. बाबांनी व्यवसाय विकून टाकला.................. अनेक गोष्टी घडत होत्या........ मात्र माझा आणि त्या घटनांचा काहीच संबंध नसल्याप्रमाणे मी फक्त एकून घेत होतो आणि सोडून देत होतो.............. मात्र आज अचानक कॅटी मला सोडून गेली ग आणि माझ उभ आयुष्य माझ्या डोळ्यांसमोर उभं राहिलं. मिताली, मी खूप खूप चुकलो ग. मला माफ कर. मी तुला विसरून गेलो आणि तू मात्र माझ्या आठवणींवर राहिलीस... कायम माझ्या आई-वडिलांची काळजी घेतलीस................."

अचानक त्याचं बोलण थांबवत मिताली म्हणाली,"रोहन, तुझा काहीतरी गैरसमज होतो आहे असं वाटत. तुला कोणी सांगितलं की मी अजूनही तुझी वाट बघते आहे?"

तिच्या त्या बोलण्याने रोहन बुचकळ्यात पडला आणि म्हणाला,"मिताली, आई म्हणाली की त्यांना सगळी मदत करतेस तू. इतकी की परवा बाबांच्या काही टेस्ट आहेत तर तेवढ्यासाठी तू लवकर जाते आहेस. मुख्य म्हणजे तू अजूनही आमच्या शेजारच्या घरीच राहाते आहेस. त्यामुळे मला वाटलं की अजूनही तू माझी वाट बघते आहेस."

त्याच्या बोलण्यावर मिताली खळखळून हसली आणि म्हणाली,"रोहन, तू लंडनला आलास, इथले राहाणीमान स्विकारलेस पण मनातून अजूनही तू टिपिकल भारतीय मानसिकतेचा पुरुष आहेस. रोहन, तुझ्या माहितीकरीता..................... माझं लग्न झालं आहे. प्रेमविवाह आहे माझा! अरे तू इथे आल्यानंतर कधी ना माझ्या मेल्सना उत्तर दिलस; ना कधी फोन केलास........... ना कधी माझी साधी चौकशी केलीस. मी तुला लक्षात ठेवण्यासारखं तू काहीच केलं नाहीस. त्यामुळे मी देखील वर्षा-दीडवर्षात तुला विसरले. मी त्यावेळी कॉलेजमध्ये शिकत होते. त्यामुळे माझ्या आयुष्यात संदेश आला.... आमचं प्रेम जमलं... आमचं शिक्षण संपल्या नंतर आम्ही घरी सांगितलं आणि आमच्या आई-बाबांनी आमचं लग्न लाऊन दिलं. मला एक मुलगा आणि एक मुलगी देखील आहे रोहन. हो... हे मात्र खरं की मी अजूनही तुमच्या शेजारीच राहाते. कारण दोन वर्षांपूर्वी माझी आई गेली. बाबांचं वय झालं आहे. त्यामुळे ते एकटे राहाणं मला पटत नव्हत. संदेशचे आई-वडील दोघेही आहेत अजून. त्यामुळे त्यांच्याशी बोलून आम्ही निर्णय घेतला की आम्ही बाबांकडे राहायला यायचं. तुझ्या आई-बाबांना मी माझ्या लहानपणापासून ओळखते.... आणि तू नसलास तरी मी त्यांच्याकडे कायम जाणं-येणं ठेवलं होत. त्यामुळे मी इथे राहायला आल्यानंतर हळूहळू त्यांना लागेल ती मदत करायला लागले. ते दोघे देखल माझ्या मुलांना सांभाळतात. त्यामुळे तू हे मनातून काढून टाक की मी तुझ्या आठवणींवर वगैरे जगते आहे....... किंवा दु:खी-अबला नारी वगैरे आहे. रोहन, तू मुलगा म्हणून कमी पडलास अशातला भाग नाही. तू जे आयुष्य स्वीकारलंस तो तुझा चॉईस होता. एक लक्षात ठेव. कोणाचंही कोणामुळे अडत नाही. त्यामुळे तुझे आई-बाबांचं तुझ्याशिवाय कधी काही अडलं नाही. मात्र तू त्यांच्या सोबत त्यांच्या सुख-दुःखात नव्हतास ही बोज त्यांच्या मनाला कायम राहोळी आहे.

रोहन, तू खरच फक्त आणि फक्त स्वतःचा विचार केलास. तुझं शिक्षण... तुझी नोकरी.... तुझं लग्न... तुझ्या पत्नीच बाळंतपण....... सगळ सगळ तुझं होत. तू इथली संस्कृती स्वीकारलीस. हा तुझा चॉईस आहे. त्यामुळे आता तुझ्या आयुष्यात जे घडत आहे ते तू स्वीकारलं पाहिजेस अस मला वाटत. मला माहित आहे की एकट्याने इतक्या लहान बाळाला वाढवण सोप नाही. पण एक सांगू? तू आता भारतात येऊन तिकडचं राहाणीमान स्वीकारू शकणार नाहीस. आणि आई-बाबा ऍनासाठी इथे आलेच तरी ते इथे कायमचे राहू शकणार नाहीत. अर्थात हे माझं मत झालं. शेवटी काय करायचं ते तुलाच ठरवायला लागेल."

मिताली बोलत होती आणि रोहन एकत होता. जणूकाही कोणीतरी त्याच्या कानात गरम तेल ओततं आहे अस त्याला वाटल. मिताली बोलायची थांबली.... रोहन काहीच बोलला नाही. काही वेळ तसाच गेला. मितालीने तिच्या मनगटावरच्या घड्याळाकडे बघितलं आणि म्हणाली,"निघते मी रोहन. उद्या सकाळी मला सगळ्या घरच्यांसाठी शॉपिंग करून मग विमान घ्यायचं आहे. बराच उशीर झाला आहे. अच्छा. आता तुझ्याकडे माझा नंबर आहेच. कधी वाटलं तर फोन कर. बोलू आपण."

रोहन काही बोलायच्या आत मिताली उठली आणि घराचा दरवाजा उघडून बाहेर पडली. बाहेर पडताना तिथल्या तिथल्या संस्कृतीप्रमाणे दार ओढून घ्यायला ती विसरली नाही.

कथामत

प्रतिक्रिया

अनन्त अवधुत's picture

3 Aug 2018 - 11:22 am | अनन्त अवधुत

मितालीचा "सिधी बात नो बकवास" वाला ऍटिट्यूड आवडला.

ज्योति अळवणी's picture

3 Aug 2018 - 12:19 pm | ज्योति अळवणी

धन्यवाद

टर्मीनेटर's picture

3 Aug 2018 - 1:52 pm | टर्मीनेटर

गोष्ट आवडली.

श्वेता२४'s picture

3 Aug 2018 - 2:31 pm | श्वेता२४

शिर्षकावरुनच काहितरी वेगळं वाचायला मिळेल असं वाटलं होतं आणि तुम्ही निराश केलं नाहीत. नेहमीच नायिका अव्हेरलेल्या प्रेमाचं दुख घेऊन आयुष्यभर रडत बसते, आणि प्रसंगी त्याच्या चुकांना माफ करुन त्याच्या वाढलेल्या जबाबदाऱ्यांसकट स्विकारते या रडतराऊ अँप्रोचचा कंटाळा आला होता. स्त्रिया नेहमीच इमोशनल फूल नसतात. आणि आताच्या काळात तर नसतातच नसतात. असो. याबाबतीत स्त्री किंवा पुरुष दोघांनीही प्रॅक्टीकल राहून आपापले मार्ग निवडावेत व पुढे जावे हेच आताच्या काळात व्यवहारीक शहाणपणाचे ठरेल. कथा 1 नं.

ज्योति अळवणी's picture

3 Aug 2018 - 2:35 pm | ज्योति अळवणी

धन्यवाद

ज्योति अळवणी's picture

3 Aug 2018 - 2:43 pm | ज्योति अळवणी

धन्यवाद

आणि अगदी खरं! हे झुरणं किंवा आयुष्य दुसऱ्यासाठी बरबाद करणं ही आजकालच्या पिढीची मानसिकता नाही

ज्योति अळवणी's picture

3 Aug 2018 - 2:43 pm | ज्योति अळवणी

धन्यवाद

आणि अगदी खरं! हे झुरणं किंवा आयुष्य दुसऱ्यासाठी बरबाद करणं ही आजकालच्या पिढीची मानसिकता नाही

फार वाईट वाटलं , रॉन उर्फ रोहन मस्त रंगवलाय , डोळ्यासमोर उभा राहिला .. छान लेखन आणि काहीअंशी सत्य उतरलंय. सध्या हायब्रीड संस्कृतीमुळे , लग्न झालं गोरी किंवा गोऱ्याबरोबर तरी कुठे ना कुठे मन खात राहत . ते जास्त मानवत नाही आणि मानवतंय असं दाखवलं तरी कुठे ना कुठे आपण स्वतः कुढत बसतो .. फार वाईट वाटत ते बघून .

कपिलमुनी's picture

3 Aug 2018 - 4:10 pm | कपिलमुनी

गोष्टी मधला प्रॅक्तिकलपणा आवडला .

दवणीय झाली नाही त्यामुळे आवडली.

सस्नेह's picture

3 Aug 2018 - 4:19 pm | सस्नेह

कथा आवडली.

मराठी कथालेखक's picture

3 Aug 2018 - 4:53 pm | मराठी कथालेखक

नायक स्वार्थी असतो, त्याला नायिकेचे प्रेम एकतर कळत नाही वा त्याची कदर नसते , तर नायिका प्रेमळ, माणूसकीवाली तरीही स्वतंत्र बाण्याची आणि करारी वगैरे वगैरे असते (म्हणजे सगळे सद्गुण नायिकेकडे असतातच असतात !!) पुढे हा नायक खड्ड्यात पडतो, त्याला सगळ्या कर्माचा पश्चाताप होतो , तो नायिकेपुढे लोळण घेत तिची माफी मागतो पण ही करारी वगैरे असलेली नायिका त्याचा पोपट करुन त्याला तो कसा अगदीच नालायक आहे हे ऐकवते, मग नायक अधिकच निरुत्तर आणि हतबल. असा ठोकळेबाजपणा कथेत ठासून भरलाय असे वाटते.
मितालीचे लग्न झाल्याचेही रोहनला माहित नसावे हे काही पटले नाही... त्याने नाही विचारले तरी आई ते सांगणारच हो..!!!
रोहनची आई म्हणते की

मी विचारच करत होते तुला मेसेज करून फोन करू का विचारायचा. तुला एक बातमी द्यायची होती

मिताली या आधी दोनदा लंडनला येवून गेली तरी याचवेळी आईसाठी ती रोहनला देण्याची 'बातमी' कशी काय झाली ?मग मितालीचे लग्न ही मात्र 'बातमी' नव्हती का कधी आईसाठी ? पण कुठूनतरी रोहनचा पोपट दाखवायचाच होता !!
आणि मितालीला रोहनचा इतका राग आहे तरी ती अगदी उत्साहाने त्याला भेटायला गेली .. बहूधा त्याला भेटण्याच्या इच्छेपेक्षा त्याचा पोपट करायची संधी मिळणार आहे हे तिच्या सहाव्या ज्ञानेंद्रियाने ओळखले असावे .. असो.

सहसा मिपावरील एखादी कथा विशेष आवडली नाही तरी माझी प्रतिक्रिया म्हणजे 'प्रतिसाद न देणे' इतकीच असते.
ज्योतिजी, आपल्या लेखनाचा अनादर करण्याचा हेतु नाही. पण या कथेत एकूणच 'नायकाचा (म्हणजे एका पुरुषाचा )पोपट' हेच कथेचे उद्दिष्ट वाटले म्हणून स्पष्टपणे इतका प्रतिसाद दिला. नाती , माणसाचा स्वभाव एका रात्रीत बदलत नाही तर त्यात हळूहळू सुक्ष्म बदल होतात. इथे रोहन आणि कॅटीची केमिस्ट्री आधी कशी जुळली , नंतर कशी बिनसली .. त्यांच्या स्वभावात अंतर असूनही सहा वर्षे ते आनंदाने सहजीवन कसे जगले ह्या गोष्टी नीटपणे समोर येत नाहीत.

कानडाऊ योगेशु's picture

3 Aug 2018 - 5:08 pm | कानडाऊ योगेशु

माझेही काहीसे असेच मत आहे. कथा ओघवती आहे व नाट्यमयता आहे.
कॅटीला का विलन केले आहे.?
माझ्यामते कॅटी/रोहन ला होणारे मूल वगैरे फाफटपसारा आवरला असता व दोन-तीन वर्षातच तिथल्या संस्कृतिनुसार दोघांचा ब्रेक-अप झाला आहे व रोहन आशाळभूत पणे मितालीची अजुनही अपेक्षा करतो आहे व मिताली स्वच्छ व स्पष्ट नकार देते आहे असे दाखवले असते तर तो शेवट परिणामकारक झाला असता.

मराठी कथालेखक's picture

3 Aug 2018 - 5:43 pm | मराठी कथालेखक

रोहन आशाळभूत पणे मितालीची अजुनही अपेक्षा करतो आहे

पण रोहनला मितालीत कधीच रस नव्हता वा त्याचे तिच्यावर प्रेम नव्हते त्यामुळे त्याला उगाच आशाळभूत दाखवऊन नंतर मितालीचा स्पष्ट स्वच्छ नकार (करारी !!) म्हणजे त्याचा पोपट असे दाखवायची गरज नसावी. नायकाला /पुरुषाला सगळे दुर्गुण चिकटवण्यापेक्षा नात्यांचा प्रवाह , त्यांत होणारे हळूवार नैसर्गिक बदल दाखवलेत तर ते जास्त पटू शकतात. म्हणजे सहा वाजता कॅटीने डच्चू दिल्यावर आपल्या आशाळभूत नायकाला साडेसहाला मितालीची आठवण बेचैन करु लागली , सात वाजता तो पश्चातापदग्ध झाला, साडेसातला त्याने मितालीचे पाय धरलेत असं ते नसावं...
त्यापेक्षा कॅटी सोडून गेल्यावर एकतर योगायोगाने मितालीशी संपर्क झाला किवा हळूहळू जुन्या आठवणी दाटून त्याने तिच्याशी संपर्क केला आणि पुन्हा नव्याने होणार्‍या संभाषणातून त्याला मितालीबद्दल ओढ निर्माण झाली असं काही दाखवलं तर ते जास्त पटेल. आणि त्यात पण 'नायकाचा पोपट' आणि 'नायिकेचा करारीपणा' अधोरेखित करण्यापेक्षा नात्यांचा हळूवार प्रवास उलगडला तर जास्त आवडेल.
इथे मितालीनं दुसर्‍या मुलाच्या प्रेमात पडून स्वतःच्या आयुष्यात पुढे जाणं यात काहीच गैरे नाहीये पण ते रोहनच्या समोर ज्या पद्धतीने आलेल दाखवलंय त्यात फक्त 'बघा रोहनची फजिती' असाच सूर जास्त दिसतोय. असो. अर्थात ही कथा आहे आणि व्यक्तिरेखा कशा रंगवायच्यात ते कथालेखिकेचं पुर्ण स्वातंत्र्य आहेच.

ज्योति अळवणी's picture

3 Aug 2018 - 6:25 pm | ज्योति अळवणी

तुमच्या स्पष्ट मताचा मला आदरच आहे. मात्र ही कथा असल्याने इथे एखाद्या धारावाईकारारखे बारीक तपशील द्यावेत असे मला वाटले नाही.

मात्र आपल्यासाठी सांगू इच्छिते, आईने म्हंटले की तुला कळवण्याचा विचार करत होते; म्हणजे कळवले नाही. यातून हेच प्रतीत होते की कदाचित आईला प्रत्येक वेळी काही ना काही बातमी देण्याची इच्छा होती; मात्र मुलाला आपल्या आयुष्यात फार रस नाही हे लक्षात आल्याने तिने प्रत्येक वेळी ही इच्छा मनातून काढून टाकली.

नायक वाईट आहे असे मी कुठेच चित्रित केलेले नाही. तसे तुमचे परसेप्शन असू शकते. माझ्या दृष्टिकोनातून नायक त्याचे इन्स्टिन्ट जे त्याला सांगत होते तसा वागत गेला.

मिताली सद्गुणांचा पुतळा पुतळा आहे हे देखील दाखवलेले नाही. तर ती प्रॅक्टिकल आहे हेच सांगितले आहे. जो मुलगा आवडतो त्याच्या मनात जर आपले स्थान नाही तर त्याच्यासाठी झुरण्याची तिची इच्छा नाही. अलीकडे अनेक घरात एकच मूल असते. तशी ती एकटीच असल्याने आईच्या मृत्यू नंतर वडिलांसाठी त्यांच्याकडे राहायला जाण्याचा तिने निर्णय घेतला तर तो वेगळा असू शकत नाही. वर्षानुवर्षे ज्यांच्याशी भावनिक संबंध आहेत असे नायकाचे पालक जवळ राहातात आणि ते देखील वयोवृद्ध झाले आहेत; तर त्यांना मदत करणे ही आपली संस्कृती नाही का? यात नायिकेला कुठे उदात्त केले?

मुळात आजच्या पिढीतील मानसिकता आहे या कथेत

उपयोजक's picture

4 Aug 2018 - 9:17 pm | उपयोजक

तुमच्याशी सहमत

सोमनाथ खांदवे's picture

4 Aug 2018 - 11:14 am | सोमनाथ खांदवे

छान लिहले आहे .

कथेतलं एक वाक्य , "कोणाचंही कोणावाचून काही अडत नाही" मनापासून पटलेलं आहे.
ही परिस्थिती सध्या शब्दशः अनुभवतो आहे. आयुष्यभर ज्या नात्यांसाठी,लोकांसाठी आपण सगळं काही करतो त्यांच्याचकडून 'तुम्ही काही नसतं केलं तरी आमचं काही अडत नव्हतं' अशी वागणूक मिळू शकते. अर्थात अनावधानाने किंवा स्वभावाप्रमाणे आपणही इतरांशी असंच वागत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कथा छान !!

सोमनाथ खांदवे's picture

4 Aug 2018 - 3:31 pm | सोमनाथ खांदवे

" आयुष्यभर ज्या नात्यांसाठी,लोकांसाठी आपण सगळं काही करतो त्यांच्याचकडून 'तुम्ही काही नसतं केलं तरी आमचं काही अडत नव्हतं' अशी वागणूक मिळू शकते. "
खरी विटंबना तर मला " मिपावर एका धाग्या मध्ये घरातील वयोवृद्धांना आजची तरुण पिढी ' डस्टबीन ' संबोधिते " इथे दिसली .

नाखु's picture

4 Aug 2018 - 10:51 pm | नाखु

कथेच्या बंधनातून मुक्त वास्तव कथा.
पुलेशु

कुठलीही खाल न काढता "बालकथा"ही वाचणारा वाचकांची पत्रेवाला नाखु