डॉ जुलाबचंद एनिमावाला एनिमालॉजिस्ट आहेत. त्यांनी अन्न -विष्ठा संबधांच्या केलेल्या पन्नास वर्षांच्या अभ्यासातून काढलेले निष्कर्श उपलब्ध असल्यास एकाद्या पिडीएफमधे वाचता येतील. त्यात अन्न -विष्ठा संबंधांचे आणि शरीररचनेचे अत्यंत बेसिक विवेचन असल्यामुळे त्यातले उतारे इथे सरळ प्रकाशित करता येत नाहीत. त्यांनी त्यावर शोधलेला उपाय (एनिमाचे भांडे ) इंटरनेटवर इतरत्र ऑनलाईन आणि कमी किंमतीत उपलब्ध आहे. त्यामुळे हा लेख कोणत्याही विशिष्ट भांड्याची जाहिरात नाही, पण उपाय नामी आहे हे नक्की.
तर मुद्दा असा की वरकरणी डॉ जुलाबचंद एनिमावालांचे विचार कितीही एकांगी वाटले आणि खादाडपणा वरुन स्त्री-पुरुषात वाद दिसले तरी ते जिव्हेची अतृप्ती आणि आतड्याचं असामर्थ्य या फंडामेंटल गोष्टीतून ते निर्माण होतात. याचा अर्थ जिव्हेला तृप्त करुन कोणीही पारस्पारिक आदर आणि समभाव यांना हरताळ फासू शकतो असा नाही. किंबहुना जिव्हातृप्त स्त्री-पुरुषात विनासायास अनुबंध निर्माण होतो. स्त्री दीर्घकाल आकर्षक दिसू आणि राहू शकते. आणि पुरुषाला धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे पुरुषार्थ अजिबात साधता आले नाहीत तरी सहज रेचन साधल्यानं तो समाधानी राहून सुखाचा संसार करु शकतो.
प्रतिक्रिया
1 Nov 2016 - 9:00 pm | भालचंद्र_पराडकर
अगागा भोंदू गुरुचा बाजार उठवला पार!!!
धुरळाच
1 Nov 2016 - 9:11 pm | भालचंद्र_पराडकर
भ्रामक आणि भंपक महागुरुचा, स्त्रीला केवळ उपभोग्य वस्तू समजणा-या भंपक महाभागाचा खुरादा उडवलेबद्दल धप्यवाद
1 Nov 2016 - 9:26 pm | चित्रगुप्त
हा केवळ तात्कालीन मौजमजेचा धागा असल्याने एक दोन दिवसात उडवून टाकावा, ही संपादक मंडळास विनंती.
1 Nov 2016 - 9:28 pm | भालचंद्र_पराडकर
नको सरजी!
असू देत हा धागा!
अतिशय गलिच्छ भावना बाळगून लेख पाडणारांना मुस्कटात बसू देत की!
1 Nov 2016 - 9:28 pm | भालचंद्र_पराडकर
नको सरजी!
असू देत हा धागा!
अतिशय गलिच्छ भावना बाळगून लेख पाडणारांना मुस्कटात बसू देत की!
1 Nov 2016 - 9:34 pm | बॅटमॅन
"ओह द कोलोन" ही एका सेंटची ट्यागलाईन अता कधीच धडपणी वाचवणार नाही.
1 Nov 2016 - 9:49 pm | बोका-ए-आझम
लई भारी एनिमा दिलेला आहे.
1 Nov 2016 - 10:41 pm | श्रीगुरुजी
जबरी!
1 Nov 2016 - 11:15 pm | गामा पैलवान
चित्रगुप्त,
बस्ती म्हंटलं की मला तो सरकारी महात्माच आठवतो.
आ.न.,
-गा.पै.
1 Nov 2016 - 11:23 pm | कविता१९७८
भारी
2 Nov 2016 - 6:14 am | चौकटराजा
ह्या ,पी डी एफ पायजेच !
2 Nov 2016 - 6:58 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
कोना एका व्यक्तिचा हिशेब चुकता होत असल्यामुळे विडंबनाला प्रतिसाद भरपूर मिळतील. पण मजा आली नाही.कानडाऊ योगेशु ची एक कविता होती -
"नको वाळवुस तु असे..
केस ओलेचिंब उन्हात..
वणवा पेटतो गं माझ्या.
हळव्या नाजुक मनात.."
याला अनुरूप चित्र आणि मग विडंबन पेरायला पाहिजे होतं. पुढील लेखनासाठी शुभेच्छा ! :)
-दिलीप बिरुटे
2 Nov 2016 - 6:59 am | साहना
पुरुषाच्या हृदयाचा मार्ग त्याच्या पोटातून जातो असे ऐकले होते. हे ते मार्गक्रमण करण्याचे साधन आहे का ?