शतशब्दकथा : सर्टिफिकेट
अनिरुद्धने कपाटातून फाईल काढली.
नकळत स्मिताच्या एकेका सर्टिफिकेटवरुन त्याची नजर फिरत होती. दहावी, बारावी, एम बी बी एस्, एम डी सगळ्या परीक्षांत अव्वल यश. परीक्षांशिवायही काही सर्टिफिकेट्स होते अंताक्षरी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि खूप काही कसल्या कसल्या परीक्षा , पेपर प्रेजेंटेशन्स. स्मिताने मेहनत करुन घवघवीत यश मिळवावं आणि घरी येवून बाबाला प्रेमळ आज्ञा करावी "बाबा..माझं सर्टिफिकेट फाईल करशील ना प्लीज"..आपल्या लाडक्या लेकीचं प्रत्येक नवीन सर्टिफिकेट फाईल करताना तो नेहमीच पुर्ण फाईल पुन्हा पुन्हा बघत रहायचा.