सत्यनारायण कथा - सामाजिक समरसतेची कथा
काही वर्षांपूर्वीची गोष्ट, दिल्लीच्या दत्त विनायक मंदिरात सत्यनारायणाची कथा सुरु होती. मंदिराच्या प्रांगणात एक ग्रहस्थ काही लोकांसोबत सत्यनारायण कथेचा माखौल उडवित होते. मी हि तिथे पोहचलो. थोड्यावेळातच लक्ष्यात आले, हे ग्रहस्थ नुकतेच पुण्याहून परतले आहे, आणि तिथल्या एका महाविद्वानाची मुक्ताफळे आपल्या तोंडाने फेकत आहे. मी हि त्या चर्चेत शामिल झालो. एखादी कथा हजारों वर्षांपासून जनमानसात रुजलेली आहे, तर निश्चितच त्या कथेत सामान्यांना भावणार काही तरी असणारच. सत्यनारायणाची कथा सामान्य माणसाला सत्यमार्गावर चालण्याची प्रेरणा तर देतेच शिवाय सामाजिक समरसतेचा संदेश हि देते.