समाज

डनिंग-क्रुगर इफेक्ट

अमृता_जोशी's picture
अमृता_जोशी in जनातलं, मनातलं
30 Mar 2016 - 12:04 am

१९९९ मध्ये अमेरिकन मानसशास्त्रज्ञ डेविड डनिंग व जस्टीन क्रुगर यांनी केलेल्या एका मानसशास्त्रीय निरक्षण प्रयोगातून पहिल्यांदा 'Dunning Kruger Effect' या नावाचा एक सखोल अभ्यास समोर आला. सध्या ही सर्वात कॉमन मानसिक स्थिती असून जवळपास ८७% लोक या स्थितीतून एकदा तरी जातात.

समाजलेख

माझा "वाचक" मित्र आणि मी!!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
29 Mar 2016 - 3:41 pm

"निमिष, तू स्वत:ला काय मोठा तत्त्वज्ञानी समजतोस की काय?" माझ्या एका जुन्या परम मित्राने मला एकदा चिडून विचारले.

मी हसून म्हणालो, "का रे मित्रा? असे तुला वाटण्याचे कारण काय बरे?"

आम्ही पुण्यातल्या एका उपाहारगृहात मस्त अमृततुल्य चहा घेत होतो. हा मित्र दहा वर्षानंतर प्रथमच मला प्रत्यक्ष भेटला होता.

वाङ्मयसमाजजीवनमानविचारप्रतिक्रियासमीक्षाअनुभववादविरंगुळा

माझी ज्यूरी ड्युटी १

शेंडेनक्षत्र's picture
शेंडेनक्षत्र in जनातलं, मनातलं
28 Mar 2016 - 4:12 am

अमेरिकेत रहाणारे देशी लोक दोन गोष्टींना घाबरून असतात एक म्हणजे टॅक्स ऑडिट अर्थात आयकर खात्याची धाड. भारतात ती बड्या फिल्म स्टार, उद्योगपतींवर पडते. इथे तसे नाही कुणाकडेही पडू शकते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ज्यूरी ड्युटीचे आमंत्रण! अनेक देशी लोक हे असले बोलावणे टाळण्याकरता वर्षानुवर्षे ग्रीन कार्ड बाळगून असतात. शक्य असूनही नागरिक बनत नाहीत. काय असते हे? अमेरिकन न्यायसंस्थेत खटला चालवण्याकरता ज्यूरी हा एक मोठा महत्त्वाचा घटक आहे. आरोपी, फिर्यादी, दोन्ही बाजूंचे वकील, न्यायाधीश हे तर आवश्यक आहेतच.

समाजअनुभव

घी देखा पर ......... ...... .........

पुणे मुंग्रापं's picture
पुणे मुंग्रापं in जनातलं, मनातलं
27 Mar 2016 - 9:40 pm

आपल्यावर झालेल्या अन्यायाबाबत ग्राहक संरक्षण कायद्याच्या मदतीने ग्राहकांनी कसा न्याय मिळवला याच्या काही सत्यकथा आतापर्यंत आपण वाचल्या. मात्र आजची कथा त्यापेक्षा निराळी आहे. या कायद्याचा दुरुपयोग व्यापारी, उत्पादक तसेच सेवा पुरवणारे इ. ना त्रास देण्यासाठी किंवा 'एखादा जुना हिशोब चुकता करण्यासाठी' केला जाऊ नये अशी तरतूदही या कायद्यात केलेली आहे, हे या कायद्याचे वैशिष्ट्य आहे.

धोरणमांडणीसमाजजीवनमान

चोरी

आनंद कांबीकर's picture
आनंद कांबीकर in जनातलं, मनातलं
27 Mar 2016 - 2:52 am

उंच टेकडीवरचे जुनाट दगडी मंदिर. सीमेंट च्या रस्त्याने मंदिराच्या टेकड़ीला गोल चक्कर घातलेली. रस्त्याच्या दोन्ही बाजुला दाट झाडी आणि नंतर तब्बल दहा फूटी भिंतीचे कुंपन. आत जायला दोन मोठाली प्रवेश द्वार.
एका प्रवेशद्वाराला खेटुनच असलेल्या सिसाच्या डेरेदार झाडाखाली म्हातारी आणि तिचा नातु गोधड़ीवर लोळत पडलेली.
"ये आजे! उथ ना! मया लय भुत लादली" पेंगुळलेल्या आजीला त्यानं दोनदा हलवलं पण तिना काहीच प्रतिसाद दिला नाही.

कथासमाज

आक्की

जव्हेरगंज's picture
जव्हेरगंज in जनातलं, मनातलं
23 Mar 2016 - 8:33 pm

आक्की आली. फटफटीवर बसून. साधं वळून बघितलं पण नाही. फटफट गेली पुढे. पाठीमागं धूरच धूर.

मग आमची गाडी काढली. क्रेट बांधलं. बाप म्हणाला बारक्यालापण घीऊन जा. मग बसलो मागं. गाडी पळाली.

कॅनालच्या कडंला पत्र्याचं शेड. शेडमधी बाटल्याच बाटल्या. मिरींडा न पेप्सी. भरली क्रेटमधी. मग क्रेट घेऊन पुन्हा गाडीवर. क्रेटचा बॉटम मांडीत रुतला. गाडी निघाली भुरभुरभुरभूर.

परत आल्यावर आक्की कुठं दिसली नाही. आधी कसं वाळूच्या ढिगाऱ्यावर. तवा तिचं लगीन नव्हतं झालं. पोरांना दगडं फेकून मारायची. वाळूचा ढिगारा तिच्या बानं आणून ओतलेला. पोरं चिडीचूप.

कथासमाजजीवनमानप्रतिभा

भाई वैद्य तुम्ही सुध्दा ?

गॅरी शोमन's picture
गॅरी शोमन in जनातलं, मनातलं
23 Mar 2016 - 11:23 am

"भारत माता की जय‘ जो म्हणेल, तोच या देशाचा नागरिक, अशी नवी व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष करू पाहत आहेत. मुस्लिमांना छळायचे, कोंडीत पकडायचे हे यामागचे त्यांचे कुटिल राजकारण आहे. ते आपण ओळखायला हवे. संविधानातील नागरिकत्वाची व्याख्या बदलून "भारत माता की जय‘ म्हणा, हे आपल्याकडे अनिवार्य झाले, तर आजवर ही घोषणा देत आलेला मी पुढे अखेरपर्यंत देणार नाही... ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य बोलत होते.

धर्मसमाजजीवनमानप्रकटनविचारप्रतिसादप्रतिक्रियासमीक्षामाध्यमवेधलेखबातमी

गाव बदललाय!

निशांत_खाडे's picture
निशांत_खाडे in जे न देखे रवी...
21 Mar 2016 - 3:25 am

परवा बऱ्याच वर्षांनी मामाच्या गावी जाउन आलो,
सगळं बदललय!
हल्ली फाट्यावरून तासभर डोंगर वाट तुडवत जावं लागत नाही,
सगळ्यांकडे गाड्या आहेत.
सुर्य मावळल्यावर वेशीतल्या पिंपळाच्या पारावरही गर्दी होत नाही,
घराघरात टीवी आलेयत.
पहिल्यासारखा पहाटे चंद्राच्या प्रकाशात गाव उजळून निघत नाही,
सगळीकडे बल्ब लागलेयत.
शाळा सुटल्यावर मुले पटांगणात गोट्या आणि विटी दांडू खेळत नाहीत,
शिकवण्या असतात.
मारुतीच्या देवळापुढे शेकोट्या करून तरुण गप्पा मारत बसत नाहीत,
स्मार्टफोन आलेयत.

मुक्त कवितासमाज

यमुनाकाठी दैवीय शांती संमेलन आणि आसुरी अहिष्णुता

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
19 Mar 2016 - 10:42 am

द्वापारयुगात कृष्णाने यमुनेच्या तीरावर प्रेमाचा संदेश दिला होता. त्याच यमुनेचाकाठी भव्य दिव्य अश्या मंचावर दैवीय प्रेरणेने सर्व पंथीय धार्मिक नेते जमले होते. तिथे पोपचे प्रतिनिधी होते, इस्लामी जगतातल्या विभिन्न पंथांचे देश-विदेशातील धार्मिक नेते हि होते. या शिवाय भारत सहित एशियातील सर्व अन्य पंथीय धार्मिक नेते हि जमले होते. या शिवाय जगातल्या आदिम जमातीतील नेते हि तिथे होते. या सर्वांचा परमेश्वराला ओळखण्याचा मार्ग वेग वेगळा होता तरी हि या भव्य दिव्या अश्या दैवीय मंचावरून सर्वांचा मुखातून एकच वैदिक सत्य बाहेर पडले एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति.

समाजआस्वाद