यमुनाकाठी दैवीय शांती संमेलन आणि आसुरी अहिष्णुता

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
19 Mar 2016 - 10:42 am

द्वापारयुगात कृष्णाने यमुनेच्या तीरावर प्रेमाचा संदेश दिला होता. त्याच यमुनेचाकाठी भव्य दिव्य अश्या मंचावर दैवीय प्रेरणेने सर्व पंथीय धार्मिक नेते जमले होते. तिथे पोपचे प्रतिनिधी होते, इस्लामी जगतातल्या विभिन्न पंथांचे देश-विदेशातील धार्मिक नेते हि होते. या शिवाय भारत सहित एशियातील सर्व अन्य पंथीय धार्मिक नेते हि जमले होते. या शिवाय जगातल्या आदिम जमातीतील नेते हि तिथे होते. या सर्वांचा परमेश्वराला ओळखण्याचा मार्ग वेग वेगळा होता तरी हि या भव्य दिव्या अश्या दैवीय मंचावरून सर्वांचा मुखातून एकच वैदिक सत्य बाहेर पडले एकं सद्विप्रा बहुधा वदन्ति. विद्वान धार्मिक लोक ज्याला वेग वेगळ्या स्वरूपात ओळखत असले तरी तो एकच आहे. प्रेम आणि शांती हीच परमेश्वराची खरी आराधना. कदाचित कलयुगात असा दैवीय अनुभव लोकांना प्रथमच अनुभवला असेल. १५५ देशातल्या हजारोंच्या संख्येने उपस्थित जनतेनी शांती आणि प्रेमाचा ह्या यज्ञात आपली आहुती टाकली. जगभर श्रीश्रींचा प्रेम आणि शांतीचा संदेश पसरविण्याचा प्रण केला.

केवळ धार्मिक नेत्यांनीच प्रेम आणि शांतीचा उद्घोषणा नाही केली तर मंगोलिया ते मेक्सिको, लात्विया ते अर्जेन्टिना, जगभरातल्या देशातील राजप्रतिनिधी तिथे उपस्थित होते. सर्वानीच ईश्वर एकच आहे, जगाला पुढे नेण्याचा एकच मार्ग, तो म्हणजे प्रेम आणि शांतीपूर्ण सह अस्तित्वाचा मार्ग. काही राजप्रतिनिधीनीं प्रेम आणि शांतीचा संदेश देणारा संमेलन श्रीश्रीनी त्यांच्या देशात भरवावे अशी इच्छा हि व्यक्त केली. जगभरातल्या विभिन्न संस्कृतींचे दर्शन या विशाल मंचावरून सर्वांनाच घडले. भिन्न असलो तरी आपण एकच आहोत हि भावना लोकांच्या मनात रुजुविण्यात या संमेलनाला यश आलेतच. सर्व विश्व एक मोठे घरच आहे, या वेद्वाक्याची प्रचीती हि आलीच. इथे नमूद करणे जरुरी आहे, पाकिस्तान मधून आलेल्या एका सांस्कृतिक प्रतिनिधीच्या म्हणण्याचा आशय होता, दोन्ही देश्यांचा मध्ये ‘अंबुजा सिमेंटने’ बांधलेली मजबूत भिंत असली तरी, आपण भाऊच आहोत, हेच सत्य.

शांती आणि प्रेमाचा प्रसार करणारा हा यज्ञ रक्तपिपासू आसुरी शक्तींना कसा आवडणार. आमचाच मार्ग सत्य आणि सर्वानींच तोच मार्ग स्वीकारावा असे म्हणविणार्या IS, अलकायदाचे प्रतिनिधी तिथे आले नव्हते. सतत क्रांतीचा जयघोष करणारे, दुसर्यांचा विनाश चिंतणारे, आमच्या शिवाय सर्वच मूर्ख असे म्हणविणारे, रावणा समान बुद्धिमान, आधुनिक वेदज्ञाता, पुरोगामी, बुद्धिमंद लोकानां अहिष्णूतेची खाज होणारच होती. त्यांना ह्यातही हिंदू धर्माचे षड्यंत्र दिसले. शिवाय जगातील लोक जर शांतीने राहू लागले तर क्रांती कुणाच्या विरोधात करणार, कुणाचा विनाश चिंतणार. चांगल्या गोष्टींचा विरोध आणि दैवीय यज्ञ उध्वस्त करणे हि आसुरी बुद्धिमंदांची परंपराच आहे. त्यात नवल काहीच नाही.

या संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान मोदीजी करणार होते आणि समापन अर्थात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल. एका मुळे, राजकुमाराला देशाची गादी मिळाली नाही आणि दुसर्याने दिल्लीत कांग्रेसला धुळीस मिळविले. साहजिकच आहे जिथे मोदी तिथे अहिष्णुता हि आलीच, संमेलनात मोदीजीना महत्व दिल्या जात आहे, हे पाहून राणी साहेबांच्या अंगाची लाही-लाही होणारच होती. प्रेम आणि शांतीचा संदेश देणारा हा दैवीय यज्ञ उध्वस्त झालाच पाहिजे असे तिला वाटणे साहजिकच होते. ज्या कार्यक्रमाला दिल्ली प्रदूषण नियमायक मंडळाने अनुमती दिलेली होती. श्रीश्रींचे भक्त असलेले अनेक कांग्रेसी नेते हि कार्यक्रमाला सहयोग देत होते. गेल्या सहा महिन्यापासून तिथे काम सुरु होते. कचर्याने जागा स्वच्छ करण्यात आली होती, विशाल मंच बांधण्याचे काम हि ४-५ महिने आधी सुरु झाले होते. कुणाचाच विरोध नव्हता. पण राणी साहेबांच्या कपाळावर आठ्या पाहून सर्व नमकहलाल पत्रकार, नेता, RTI कार्यकर्ता मैदानात उतरले. कार्यक्रमाचा जोरदार विरोध सुरु झाला. ज्या NGTला दिल्लीतल्या हजारोंच्या संख्येत असलेल्या कारखान्यातून निघणार्या रासायनिक कचरा कधीच दिसला नाही. किंवा यमुनाच्या काठावर घरकुल उभारणारे बांग्ला देशीय हि दिसले नाही. ती NGT कुंभकर्णा प्रमाणे झोपेतून जागी झाली. पण प्रत्यक्ष राजाचा आशीर्वाद प्राप्त असलेल्या या कार्यक्रमाला उध्वस्त करणे NGTला शक्य नव्हते. ५ कोटींचा रुपयांचा जजीया लाऊन कार्यक्रमाला अनुमती दिली (असे अनेकांचे म्हणणे आहे).

शेवटी आसुरी शक्तींचा पराभव झाला आणि जगात शांती आणी प्रेमाचा संदेश देणाऱ्या यज्ञ यथासांग पार पडला. बाकी बाबू मोशाय यांना सर्व जगातील लोकांना ‘आम्ही तुमाके भाले-भाषी म्हणायचे असेल, पण त्यांची ती इच्छा मनातच राहिली असेल. असो.

समाजआस्वाद

प्रतिक्रिया

नाना स्कॉच's picture

19 Mar 2016 - 10:55 am | नाना स्कॉच

पाकिस्तान मधून आलेल्या एका सांस्कृतिक प्रतिनिधीच्या म्हणण्याचा आशय होता, दोन्ही देश्यांचा मध्ये ‘अंबुजा सिमेंटने’ बांधलेली मजबूत भिंत असली तरी, आपण भाऊच आहोत, हेच सत्य.

बरोबर आहे हो!! फ़क्त तिकडला एखादा भाऊ येऊन इकडल्या एका भावाचे मस्तक उतरवुन नेतो! फुटबॉल खेळायला बरंका!!

असो!

बाबा रामदेव की जय ___/\___

दा विन्ची's picture

19 Mar 2016 - 11:38 am | दा विन्ची

काही विशेष आवडला नाही लेख

हे श्री श्री फ़क़्त गोल गोल गप्पा मारतात. रामदेव बाबांसारखाच यांचाही हा एक छान चाललेला व्यवसाय आहे. आणि स्वताला कायद्यापेक्षा मोठा समजण्याची वृत्ती पण फारशी पचनी पडली नाही ब्वा.

आणि स्वताला कायद्यापेक्षा मोठा समजण्याची वृत्ती पण फारशी पचनी पडली नाही ब्वा.

हेच म्हणतो.. कायद्याअ आव्हान न देता दंद भरला असता, आणि नंतर त्याविरुद्ध रान उठवले असते तर जास्त बरे पडले असते.. बाकी मला वाटते याबाबतीत स्वतः मोदींनीच दंड भरण्याचा सल्ला दिलेला दिसतो.

तर्राट जोकर's picture

19 Mar 2016 - 1:44 pm | तर्राट जोकर

आरती वोवाळण्यास पुर्ण स्वातंत्र्य आहे. विरोध करणार्‍यांना असूर समजले जाते आहे ही ध्यानात घेण्यासारखी गोष्ट आहे.

मितभाषी's picture

19 Mar 2016 - 4:11 pm | मितभाषी

हाहाहा हे तर किरकोळ आहे.
काहींनी आता परत पाठीला बोराट्या आणि गळ्यात गाडगे अडकवले नाही म्हणजे मिळवली. =) )

गामा पैलवान's picture

19 Mar 2016 - 8:47 pm | गामा पैलवान

मितभाषी, महाराच्या गळ्यात मडकं आणि पाठीला झाडू वगैरे केव्हा बांधलं गेलं? पुण्यातल्या कुठल्या रस्त्यावरून महारांना असं फिरवीत असंत? याचा आदेश कोण काढंत असे?
आ.न.,
-गा.पै.

मितभाषी's picture

19 Mar 2016 - 8:57 pm | मितभाषी

हा शुध्द बामनी कावा प्रशन आहे.
टिप. मी मोबाईलवरून टायपतो आणी मराठी शुध्द लेखनात चुका असू शकतात. हे सोडून मुद्दयाच बोला हि विनंतती. कारण यालाही मोठा इतिहास आहे.

मितभाषी's picture

19 Mar 2016 - 9:02 pm | मितभाषी

पुण्यात कशाला. गावागावात होत हे. माही म्हातारी/रा दोघही अजून जिवंते. खात्री करायची असन तर प्रत्यक्ष भेट मला.

गामा पैलवान's picture

19 Mar 2016 - 11:42 pm | गामा पैलवान

काहीही हं मितभाषी! कुठल्या गावात हे होत असे? महार तर गावाबाहेर महारवस्तीत राहायचे ना?
आ.न.,
-गा.पै.

अभ्या..'s picture

19 Mar 2016 - 11:59 pm | अभ्या..

अंह अंह अंह
गामाजी, मिभाजी.
थांबा की इथंच
प्लीज.

मितभाषी's picture

19 Mar 2016 - 8:04 pm | मितभाषी

अजून ५ वर्ष जर हे आले तर बहूजण आणि दलित यांचा खातमा होणार हे निश्चित.
माझ्या आयुष्यातील निवडक अनूभवानुसार हे मनुवादी जर देशाच्या बाहेर हाकलले तर सगळे प्रशन एका फटक्यात सुटतील.

या सरकारने दलीतावर असा काय अत्याचार केलाय
आणि अगोदरचे सरकार काय भल करत होत हे
सांगितलत तर फार म्हणजे फार कृपा होइल

हे मनुवादी जर देशाच्या बाहेर हाकलले तर सगळे प्रशन
एका फटक्यात सुटतील. >>>>>>>>>म्हणजे भारतात भ्रष्टाचार,गरीबी, दहशतवाद हेही प्रश्न सुटतील? तेही एका फटक्यात?
रात्री अंमळ जरा जास्तच झाली वाटते!!!!

मितभाषी's picture

22 Mar 2016 - 2:09 pm | मितभाषी

हम्म , झाली जरा जास्त काय करू. ;)

मितभाषी's picture

19 Mar 2016 - 8:17 pm | मितभाषी

आणि अजून एक.
मी माॅर्निंग वाॅकलाही जातो. अरे म्हातार्यांना मारण्यापेक्षआम्हाला नडा मग आम्हीपण दाखवून देऊ. आम्ही काय चिज आहे ते.

रमेश आठवले's picture

19 Mar 2016 - 8:59 pm | रमेश आठवले

ज्या जागेला उकिरड्याचे रूप आले होते तीचे या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुनरुज्जीवन झाले .

श्री गावसेना प्रमुख's picture

19 Mar 2016 - 9:51 pm | श्री गावसेना प्रमुख

संजय सोनावनी आणि अभिराम दीक्षित ह्यांच्या समर्थकांच्या जशा fb वर हाणा मार्या चालतात तशा इथे करू नका म्हणजे मिळवल।

मितभाषी's picture

19 Mar 2016 - 9:57 pm | मितभाषी

मी कूठल्याही ब्रिगेड सेना राष्ट्रवादी किंवा कोणत्याही राजकीय पक्षाला/शी संलग्न अथवा सदस्य नाही.

मितभाषी's picture

19 Mar 2016 - 10:00 pm | मितभाषी

गावगाड्याचा अभ्यास कर.

विवेकपटाईत's picture

19 Mar 2016 - 11:18 pm | विवेकपटाईत

NGTच्या अनुमतीची गरज पक्या निर्माण कार्यासाठी असते. तात्पुरत्या कार्यासाठी अनुमती देण्याचा अधिकार दिल्ली प्रदूषण नियंत्रण बोर्डचा (राज्यातील बोर्ड) असतो, तो घेतलेला होता. NGT कशी टपकली आणि त्याचे कारण काय, याचा विचार केला पाहिजे.

यमुनेच्या काठावर अनेक देशांचे राजप्रतिनिधी उपस्थित होते. ते सर्व मूर्ख होते का? श्री श्री नि मध्य आणि द. अमेरिकेत तरुणांमध्ये पसरलेल्या नशा आणि हिंसाचार पासून त्यांना दूर ठेवण्याचे मोठे कार्य केले आहे. मोठ्या संख्येतून आलेल्या तिथल्या राजप्रतीनिधिनीं या साठी श्री श्रींचा गौरव हि केला (कार्यक्रमाची चित्रफित पाहून खात्री करून घ्या). स्वत:चा पैका खर्च करून आलेले १५५ देशातील लोक तिथे उपस्थित होते, हे कार्य काही सौपे नाही.

मितभाषी यांस- दलितांवर अत्याचार आज कोण करतो आहे, आणि कोण त्यांचा विकासासाठी झटतो आहे, हे कळण्याची क्षमता हि असली पाहिजे. RTI करून बघा, जनधन योजनेत उघडल्या गेलेल्या खात्यात अधिकांश दलितांचे आहेत. (घर दार शिक्षण नसल्या मुळे, आधी बँकेत खाते हि त्यांना उघडता येत नव्हते. सामाजिक सुरक्षेसाठी विमा दिला. त्यांना हि शक्ती मोदींनी दिल्ली. आंबेडकरांच्या नावाने घोषणा देत राजनीती करणार्यांनी नव्हे.

जनधन योजनेत उघडल्या गेलेल्या खात्यात
अधिकांश दलितांचे आहेत. (घर दार शिक्षण नसल्या मुळे,
आधी बँकेत खाते हि त्यांना उघडता येत नव्हते>>>>>>>>मग इतके वर्ष दिलेल्या आरक्षणाचे काय लोणचं घातलं की काय?

जनधन योजनेत उघडल्या गेलेल्या खात्यात
अधिकांश दलितांचे आहेत. (घर दार शिक्षण नसल्या मुळे,
आधी बँकेत खाते हि त्यांना उघडता येत नव्हते>>>>>>>>मग इतके वर्ष दिलेल्या आरक्षणाचे काय लोणचं घातलं की काय?

नाना स्कॉच's picture

22 Mar 2016 - 6:49 am | नाना स्कॉच

इथे पटाईत साहेब ह्यांनी तुम्हाला लागट कॉमेंट्स करायला पूरक अन conducive विधान म्हणजेच "बहुतेक बँक खाती ही दलितांची आहेत" असे म्हणले आहे! सामान्यतः अश्या बाबतीत शहनिशा करायला विदा असावा लागतो , नाही मिपावर लोकं "विचारांचा"ही विदा मागतात हो! इथे तर आकड्यानिशी सिद्ध होईल पण तुम्हाला विदा किंवा पुरावा मागावासा सुद्धा वाटणार नाही. कारण मग जर पुराव्यात काहीतरी विपरीत साधले अन दिसले की मग आरक्षण हाच एक धागा धरुन ते कसे होपलेस होते हे आपल्याला कंठारव करीत सांगायला कसे साधणार

पटाईत साहेब ह्यांनी काहीतरी सांगायचे अन त्याची शहनिशा ण करता आपण तोंडसुख घ्यायचे , कारण शहनिशा करून आलेला चान्स कोणी सोडा! घ्या बोलून मिळतोय चान्स तर!

माफ़ करा पण आपण मितभाषी ह्यांना बरोबर सिद्ध केलेत! :D

DEADPOOL's picture

22 Mar 2016 - 7:55 am | DEADPOOL

बरं अजून किती अवतार?
इंद्रिय तुष्टीकरण झाले का?

नाना स्कॉच's picture

22 Mar 2016 - 8:02 am | नाना स्कॉच

काहीही हां डे!!

मुद्द्यावर बोला मुद्द्यावर ! हे लैच वंगाळ झालं देवा!

मिपावर लोकं "विचारांचा"ही विदा मागतात हो

विचारांचा नाही हो "नक्की कोणता विदा वाचून विशिष्ट विचार केला गेला" तो विदा मागितला जातो*. (किमान मी तरी असाच मागतो)

पण कसे असते.. पुरोगामी, बुद्धीगामी वगैरे पदव्या लावून घेण्याच्या नादात चुकीचा विदा मिळवून तो हवा तसाच वाचून अवास्तव निष्कर्ष काढले जातात. ते निष्कर्ष खोटे ठरण्याची वेळ आली की पाय लावून पळताना "असहिष्णुता, भक्त, फॅसिस्ट सरकार, हुकुमशाही" असे अनेक घासून गुळगुळीत झालेले मुद्दे तयार असतात.
(हे सरसकटीकरण नाहीये. याचा विदा हवा असल्यास "मोदी" हे नांव टाकून मिपावरील अनेक धागे शोधावेत.)

विचारांचा विदा मागितलेल्या प्रतिसादांचा विदा दिल्यास वरील विधानाचा* पुनर्विचार करण्यास माझी हरकत नाही. ;)

नाना स्कॉच's picture

22 Mar 2016 - 9:46 am | नाना स्कॉच

विचारांचा नाही हो "नक्की कोणता विदा वाचून विशिष्ट विचार केला गेला" तो विदा मागितला जातो*. (किमान मी तरी असाच मागतो)

उत्तम! मग आपण इतर काही स्वतःच्या मनाला लावुन घ्यायची गरज नाही

पण कसे असते.. पुरोगामी, बुद्धीगामी वगैरे पदव्या लावून घेण्याच्या नादात चुकीचा विदा मिळवून तो हवा तसाच वाचून अवास्तव निष्कर्ष काढले जातात. ते निष्कर्ष खोटे ठरण्याची वेळ आली की पाय लावून पळताना "असहिष्णुता, भक्त, फॅसिस्ट सरकार, हुकुमशाही" असे अनेक घासून गुळगुळीत झालेले मुद्दे तयार असतात.

होय असे होते खरे! पण कसंय न की बरेच वेळी दुसऱ्याबाजुने सुद्धा गुळगुळीत प्रतिसाद पक्षी तुम्ही मोदी द्वेष्ट आहात, फुरोगामी, सिक्युलर इत्यादी सुद्धा होते! सर्च कसे करायचे हे आपणांस माहीती आहेच :) , बरेच वेळी कंपुबाजी होते, हिरीरीने वकिली थाटात कज्जे लढवल्या प्रमाणे आपल्या लाडक्या आयडीची री ओढ़ली जाते! मग जश्यास तसे ह्या प्रमाणात समोरच्या आयडीसोबत विचारमतैक्य होणाऱ्या दुसऱ्या आयडी ने त्याला समर्थन दिले की खरड़वही ते व्यनि सादर समर्थन देणारा आयडी कसा "डू आयडी" आहे हे "आम्ही मिपा चे पेंटागन आहोत" ककंसात (मिसळपाव इंटेलिजेंस ब्यूरो) वगैरे लिहून एखाद्या आयडीचा मानसिक छळ होइस्तोवर बोलले जाते, तर कोणी (जो स्वतः ओरिजिनल आयडी आहे का नाही ह्याची शाश्वती नाही) तो मुद्द्यावर न बोलता "हा अवतार कितवा" "इंद्रिय तुष्टिकरण झाले नाही का" वगैरे बाष्कळ गप्पा उघड धाग्यावर करतो!

मोदक शेठ, मी स्वतःहून आपणाशी बोललो नव्हतो, तुम्ही प्रपंच केलात म्हणून बोलता झालोय, समतोल राहायचे असेल तर सेलेक्टिव रीडिंग सोडा मालक! नाहीतर आमच्या नादी लागु नका. ही विनंती.

उथळ पाण्याचा "थयथयाट" फार!

नाना स्कॉच's picture

22 Mar 2016 - 10:37 am | नाना स्कॉच

तुम्ही मुद्द्यावर बोला हो! बाकी नंतर पाहता येईल!! कोणचे पाणी उथळ आहे अन कोणत्या आडात पोहर्यात काहीच नाही हे नंतर पाहता येईल! मुद्दे संपले असतील तर वैयक्तिक हल्ले बंद करा , अन मुद्दे संपल्याचे मान्य करा!. ;)

अरेच्चा.. तुम्ही एकदम तलवार काढून आलात...

मी तुमच्या फक्त एका वाक्यासंदर्भात बोललो.
"जर तुमचा गैरसमज झाला असेल तर माझ्या मते काय गैरसमज झाला असावा" असे काहीसे.

मोदक शेठ, मी स्वतःहून आपणाशी बोललो नव्हतो, तुम्ही प्रपंच केलात म्हणून बोलता झालोय, समतोल राहायचे असेल तर सेलेक्टिव रीडिंग सोडा मालक! नाहीतर आमच्या नादी लागु नका. ही विनंती.

सिलेक्टिव्ह रिडींग कुठे दिसले? एक वाक्य उचलले असे वाटत असेल तर तितकेच वाक्य महत्वाचे वाटले. बाकी तुमची दोघांची वैयक्तीक धुळवड चालू आहे म्हणून त्यावर काही बोललो नाही याचा अर्थ सिलेक्टीव्ह रिडींग असा नव्हे. प्रतिसादातला इतर भाग माझा एकंदर अनुभव होता. तुम्हालाच उद्देशून नव्हता.

बाकी "आमच्या नादी लागू नका" ही नवीन पद्धत वाचतो आहे. मिपा हा ओपन फोरम आहे. विचारांचा प्रतिवाद होणारच आणि तुम्हाला विचारांचा प्रतिवाद झालेला चालणारच नसेल तर तसे सांगा.

नाना स्कॉच's picture

22 Mar 2016 - 1:06 pm | नाना स्कॉच

करा ना!! विचारांचा प्रतिवाद नक्की करा!! फ़क्त विचार काय असतील ते ठरवून येऊ नका, अगोदर या मग वाचा मग काही anomaly शोधा मग सांगा. मी अगोदरही इतर जागी बोललो आहे "मला माझे विचार बदलायला आवड़तील" , बहुत काय सांगणार, तुम्ही जे बोलले तेच तुम्ही इतरांना सांगाल काय?

वैयक्तिक आपल्याशी काही वाकडे नाही , धन्यवाद.

मितभाषी's picture

20 Mar 2016 - 12:32 pm | मितभाषी

तटस्थ धर्म चिकीत्सा व्हायला हवी कि नाही. एकदा का ज्ञानाचा व्यापार व्हायला लागला कि पहिला बळी विवेकाचा जातो. आपण तर विवेकाचा केव्हाच मुडदा पाडला आहे. असो.
जातीभेद संपवायचे असतील तर प्रथम जातीव्यवस्था नष्ट केली पाहिजे. त्यासाठी आरेसेस शंकराचार्यांची शेंडी का नाही पिळत.

विवेकपटाईत's picture

20 Mar 2016 - 5:17 pm | विवेकपटाईत

मितभाषी साहेब विवेक कुणा पाशी आहे आणि कोणी त्याचा मूडदा पडला. जगाचा विभिन्न लोकांना एकत्र एका मंचका वर आणणे म्हणजे अविवेकी कार्य. असो
बाकी जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी तुम्ही काय केले,. माझे म्हणाल तर आमच्या घरात, गुजराती (जैन), पाल (धनगर), प. उत्तर प्रदेश, स्वर्णकार (उत्तर प्रदेश), पंजाबी सुना आहेत. माझा जावई सुद्धा हिमाचली आहे, कुठल्या हि लग्नात हुंडा घेतला नाही कि दिला नाही. शिवाय माझी लेक एका मुसलमान मुलाला हि राखी बांधते. वसुधैव कुटुम्बकम् खर्या अर्थाने चालतो यमुनेच्या काठावर श्री श्री हि हेच करत होते. कुणाचे अहित चिंतून कुठलेही कार्य साध्य होत नाही. स्वत: चांगल्या मार्गावर चालणे गरजेचे. बाकी मनातील घाण बाहेर करणे आवश्यक आहे, विवेक जागृत होईल.

मितभाषी,

तटस्थ धर्मचिकित्सेची कल्पना चांगली आहे. आपण वाळवंटी पंथान्पासून सुरुवात करूया. इस्लाम आणि इसाई पंथांची चिकित्सा केव्हा करायला घेताय मग?

हिंदू धर्म विज्ञानाच्या विरोधात नसल्याने तो चिकित्सेसाठी सर्वात शेवटी घेऊया.

आ.न.,
-गा.पै.

रमेश आठवले's picture

22 Mar 2016 - 5:04 am | रमेश आठवले

बुद्ध पंथीय लोकसंख्या आणि इस्लाम धर्माची लोकसंख्या जवळ जवळ सारख्या आहेत ( १.५ ते १.६ बिलियन ) आणि क्रिश्चन संख्या २.२ बिलियन च्या आसपास आहे.

न त्यापेक्षा जाती आधारित आरक्षण का नाही मिटवत!
कारण आम्ही 'मागास' जातींचे म्हणूनच आरक्षणाची बोंब चालू होते!

यावर नास्कॉ आणि मिभा यांचा प्रतिवाद अथवा प्रतिसाद ऐकायला आवडेल!

निमिष ध.'s picture

22 Mar 2016 - 6:45 am | निमिष ध.

पटाईत साहेब, आपण दिल्लीतच आहात. एक आठवड्याने तिकडे महोत्सवाच्या ठिकाणी जाऊन काय परिस्थिती आहे याची पहाणी करा. पाहिजे तर किती सुंदर साफ - सफाई केली आहे त्याचे फोटो काढा आणि इथे टाका. पहा श्री श्री चांगले कार्य करतही असतील त्यात अजून एक जमुना-सफाईचे पण काम होऊन जाऊ द्या की. आता माझ्या मनात उगीच वाईट शंका येतात, की काही ठिकाणी वाचलं की नदीच्या बाजूला ज्या पाणथळ जमिनी होत्या त्यांमध्ये भर घातलेली आहे. आता जर पाऊस पडला आणि प्रवाह जोरात उलट दिशेनी वळाला तर काय होईल. हे सगळे आपल्याला ग्राऊंड झिरो वरून कळेलच. त्यामुळे आम्हाला या माहितीने अपडेट करत रहा.

रमेश आठवले's picture

22 Mar 2016 - 8:29 am | रमेश आठवले

रवि शंकर यांनी त्यांच्या सफाई कामाला महिनाभर लागेल असे म्हटले आहे.
इंद्रप्रस्थाच्या वेळे पासून गेल्या काही हजार वर्षात दिल्ली किती वाढली, यमुना नदीच्या पत्रावर किती आक्रमणे झाली आणि त्यामुळे तिची दिशा किती वेळा बदलली व पात्र किती वेळा बदलले याचाही अभ्यास झाला पाहिजे नाही का ?

निमिष ध.'s picture

22 Mar 2016 - 9:02 pm | निमिष ध.

मग एका महिन्यानी जा की. आम्हाला काहीच घाई नाही.

आता हजार वर्षांमध्ये नैसर्गिक रित्या किंवा मानवाच्या हस्तक्षेपाने यमुनेचे पात्र कसकसे बदलले आहे त्याचा अभ्यास हा खूप मोठा विषय आहे. तुमच्या कडे इंद्रप्रस्थ (की हस्तिनापूर) चे नकाशे असतील तर आपण आताचे , ब्रिटीशकालीन आणि मुघलांचे असे नकाशे एकत्र कंपेयर करू शकतो. तसे सर्व्हे ऑफ इंडिया संस्था (http://www.surveyofindia.gov.in/) ही भारताचे ऑफिशियल नकाशे तयार करत असते त्यांच्याकडे तुम्हाला बरेच नकाशे मिळू शकतील.

शेवटी अभ्यास होणे महत्वाचे आहे ! आणि आपल्याला आतापर्यंत जाग आली नव्हती, पण आता आलेली आहे तर मग जागेच रहावे आणि नदिचे नैसर्गीक पात्र अबाधीत रहावे अशी अपेक्षा आहे.

रमेश आठवले's picture

24 Mar 2016 - 5:00 am | रमेश आठवले

हे मत वाचण्यासारखे आहे.
http://www.firstpost.com/india/world-culture-festival-didnt-damage-yamun...

रमेश आठवले's picture

1 Jun 2016 - 5:15 am | रमेश आठवले

राष्ट्रीय हरित लवादाने रविशंकर यांच्यावर यमुनेच्या तीरावरील मैदानात कार्यक्रम करण्याच्या आधीच त्या कार्यक्रमाने पर्यावरण नुकसान होईल या भीतीने ५ कोटी दंड ठोठावण्याचा फालतूपणा केला होता. कार्यक्रम रद्द होऊ नये म्हणून त्या दंडा पैकी २५ लाख रुपये संस्थेने आधीच भरले होते. आता उरलेले पैसे भरण्यासाठी लवादाने तगादा लावला आहे. त्यावर आमच्याकडून पर्यावरणाचे नुकसान झाले आहे असे सिद्ध करा असे संस्थेने सांगितले आहे आणि या साठी अखेर पर्यंत लढा देण्याची तयारी व्यक्त केली आहे.

http://www.huffingtonpost.in/2016/05/31/national-green-tribunal-a_n_1021...

नाईकांचा बहिर्जी's picture

1 Jun 2016 - 11:35 am | नाईकांचा बहिर्जी

लवादाने "फालतूपणा केला" हे आपण कसे ठरवलेत हो सर?

रमेश आठवले's picture

1 Jun 2016 - 8:33 pm | रमेश आठवले

कार्यक्रमासाठी सरकारच्या संबंधित विभागा कडून परवानगी घेण्यात आली होती. जगभरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असे समजले होते.वेगवेगळ्या स्टेज कलाकारांना आणि नेत्यांना आमंत्रणे दिली गेली होती.अशा क्षणी, तुमच्या कार्यक्रमामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होऊ शकेल, या साठी आधीच दंड स्वरूप पैसे भरा, असे हरित लवादाने, दुसऱ्या कोणीतरी जागे केल्यावर त्याना सांगितले .असे सांगण्या ऐवजी तुमच्या हातून पर्यावरणाचे काही नुकसान झाले तर आम्ही यथोचित दंड करू असे ही सांगता आले असते .

निमिष ध.'s picture

20 Aug 2016 - 2:37 am | निमिष ध.

पुन्हा प्रतिसाद देतोय या विषयावर कारण आता २ महिने झाल्या नंतर एन जी टी ने रिपोर्ट दाखल केलेला आहे की या कार्यक्रमामुळे यमुनेतील पर्यावरणाचे - फ्लडप्लेन चे खुप नुकसान झालेले आहे: " he entire floodplain area used for the main event site, i.e. between the DND flyover and Barapullah drain (on the right bank of river Yamuna) has been completely destroyed, not simply destroyed. The ground is now totally levelled, compacted and hardened, totally devoid of water bodies or depressions, and almost completely devoid of any vegetation (except a few large cattails at the base of of the DND flyover)"

लेखकाला आता काही नविन माहिती कळली असेल तर त्याने सांगावे किंवा खरच नुकसान झाले आहे आपल्या कार्यक्रमाने असे मान्य करावे. कार्यक्रम करायला ना नाही. करावा कार्यक्रम पण मग फिरोजशा कोटला भाड्याने घेऊन का नाही केला ? अशी नदीतली जमीन - पर्यावरणाचा नाश करून का केला?

संदर्भः १) http://indianexpress.com/article/india/india-news-india/art-of-living-sr...

२) http://qz.com/760062/an-indian-gurus-gala-has-ruined-a-river-but-what-ra...

चंपाबाई's picture

21 Aug 2016 - 2:22 pm | चंपाबाई

असे प्रश्न विचारायचे नसतात..