गेले मोदी कुणीकडे
स्वप्नांचा पाऊस पडे सारखा
महागाईलाही पूर चढे
विमान उडवीत चहूकडे
गं बाई .... गेले मोदी कुणीकडे
शिक्षण खोटे पदवी खोटी
मंत्रीणबाई तुळशी झाली
केजरीवालची पडता बिजली
दचकून तीचा ऊर उडे
गं बाई .... गेले मोदी कुणीकडे
पैसा काळा आणू म्हणुनी
ठोकूनी भाषण दाही दिशांनी
चाय - गाय पे चर्चा करूनी
मनकी बाता देश बुडे ,
गं बाई ...... गेले मोदी कुणीकडे
चीनमध्ये झोपाळ्यावरुनी
दाढीवाले बिंब बघूनी
हसता संघ भगव्या रानी
धर्म अफूचे ऊन पडे
गं बाई .... गेले मोदी कुणीकडे..
= = = = = = = = =