विषय
इतिहासाच्या तासाने आम्हाला फारच छळले,
पानिपतच्या लढाईत कोण जिंकले,कोण हरले,
हे शिकून तरी काय कळले,
आयुष्याच्या इतिहासात खरे तेच यशस्वी ठरले,
ज्यांनी आपल्या शत्रूचेही मन जिंकले.
भूगोलाच्या तासाला नाही कळले चंद्र व सूर्यग्रहण,
विधात्याने निर्मिले 'मानव' हे क्षुद्र उपकरण,
ऊन-सावलीच्या खेळाने करतो तो स्वतःचे मनोरंजन,
त्याच्या अचाट क्षमतेने झालो थक्क नि गेलो भांबाबून.