झाडांच्या सावलीत, राणीच्या बागेत, ... ... येताय ना ? ;)
प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ...
प्रेरना माननीय प्रेषक, कंजूस, यांची नैसर्गीकपणे मोकळी-चाकळी माफी मागून :) मिपाकरांच्या सेवेत सादर ...
प्रेरणा : "कुठ कुठ जायाच हनिमूनला" ही प्रसिद्ध ठसकेबाज लावणी!
कुठं कुठं जाऊ मी सांगायला?
अहो भरल्या जवानीत 'सर' तुम्ही मला हेरलं
हेरलं ते हेरलं अन् जॉबच् माझ्या ठरलं
ख्रिसमस झाला, "न्यू" इयर झालं
आता फक्त ऑफिस की हो उरलं!
मार्केटींग, मॅनेजमेंट, निवांत एच.आर.
कोण नाही पर्वा करायला
कुठं कुठं जाऊ मी सांगायला?
थोडं तरी इन्क्रिमेण्ट करायला!
एका मित्राशी व्हाट्सएप्प वर चॅट करत होतो,
सांगत होता गेले काही महिने जाम बिझी आहे,
पण आज मात्र अक्खा दिवस 'उनाड' पणा केलाय,
तेवढा मी लकी आहे!
त्यानी 'उनाड' पणा केलाय,
आता माझी जळजळ!
क्षणात आयुष्यभरातले काही 'उनाड'क्षण
वहीची पानं अंगठ्यानी सोडल्या सारखे सपासप सुटले,
अश्या ह्या उनाड पानांच्या वह्या...
काहींच्या बोटांनी मोजता येतील इतक्याच
तर काहींच्या शंभर पानी काहींच्या दोनशे!
काहींच्या तीनशे पानी!!
ही त्यांचीच कहाणी..
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
स्वप्नात झाले होते
पटाईत आमचे (पटाईतांची पटाईतपणे माफी मागून!)
पंतप्रधान मोदींचे सचीव !! :)
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
क्रिंग क्रिंग क्रिंग क्रिंग
त्यांनी विचारले गेले
वर्ष भर काय केले ?
ओबामां फोनु आला
डू यु नो अँड व्हॉट दे सेड ?
हॅप्पी न्यू यीअर !!
ओह मिपाकरांना आमचा
निरोप द्या
ओह मिपाकर
हॅप्पी न्यू यीअर !! बरं का !
हॅप्पी न्यू यीअर !!
शिवकन्या यांची माफी मागून..
============================
कुंठीत धाग्यात्,कोण रिंगणात?
थुई थुई नाचे मोर्,पिसारा पुढे,मागे बाकी काही नाही!
नाचर्या पावसात, कोण रस्त्यात?
थांबते गाडी, रिकामी सीटे, बाकी प्रवासी कुणी नाही!
चेहरा मनात, कोण आरश्यात?
अलवार हसू, खुलते ध्यान, बाकी याद कसली नाही!
गमेना मित्रांत, कोण दिवसा स्वप्नांत?
लटका राग, मोहक हसू , बाकी ठावे काही नाही!
तपत्या उन्हात, कोण उरात?
गम्मत गुज,आठवण शिरशिरी, बाकी मग कुणी नाही!
समईचा घेऊन हार ही रात उभी तलवार
गात्रात पौर्णिमा काळी भरजरी तलम अलवार
उन्मुक्त नदीसे जगणे या अधोवदन वेलीचे
वृक्षाचा खांदा नीरव पर्युत्सुक मंत्र भुलीचे
संन्यस्त शिळेच्या माथी का डाग तप्त चंद्राचा
अतृप्त भग्न वैरागी जोगवा त्यास गीताचा
नखखुडल्या माडांनाही का तृषा जहरभरणीची
जळतीच्या पागोळ्यांची का दिशा पार्थ बाणांची
साकल्यसूक्त गंगेचे भय लोभस हिरवे कहरी
हंबरून गायी सार्या उधळीत दिशा गिरिकुहरी
निर्लज्ज उगवती अंकी उन्मादी गातो पक्षी
पांघरी डोह काळोखी नवरातकिड्यांना रक्षी
त्यावेळी जिकडे तिकडे चारोळ्यांचे पेव फुटले होते . जोतो चारोळ्या करत फिरत असे. चारोळ्या मित्रांना म्हणून दाखवत असे . काही ओरिजिनल असत , काही इन्स्पायरड असत , तर काही चक्क कॉप्या असत व आपल्या नावावर खपवल्या जात . पण तरीही चारोळ्या ऐकण्यात , करण्यात आणि मित्रांमध्ये ऐकवण्यात एक वेगळीच मौज असे . अशाच त्या मंतरलेल्या कॉलेज च्या दिवसांत काही सुचलेल्या ,काही इन्स्पायरड चारोळ्या फक्त तुमच्या साठी . ओडून ताणून कलेल्या ,काही र ला र , ट ला ट जोडून जुळवून आणलेल्या, तर काही सरस जमलेल्या . पहा आवडतात का ! नाही आवडल्या तरी चारोळ्याच त्या , टाईम पास झाल्याशी कारण ........ काय ?
जमेल तितकं सांग...
बोटं पळतायत...
डोकं चालतै...
डोळे पाहातायत...
अक्षरांची रांग...
मन बोम्बलतय...
जमेल तितकं सांग
किती अक्षरं आली, आणि पुसली,
कधी हसली अन कधी रुसली
कैक रात्री बब्बूळांचा अंत बघत लिहीतोय
कधी आई बाबांचा,
कधी आजी आजोबांचा,
कधी मित्रमैत्रणींचा,
काही मोठे काही छोटे...
आठवणींचे कधी...
कधी स्वप्नांचे थवे सोडतोय.
आत्ताचा क्षण सरपण
सेकंदा पूर्वीचा... ती आठवण
आठव अजुन आठव...
पानांत अजुन साठव
प्रेरणा : माझा कोंबरा कोनी मारीयला
माझी चादर कोनी चोरीयली
नं माझी चादर कोनी चोरीयली
माझी चादर कोनी चोरीयली... कोरस - २
सोलापूराशी मिनी आनीली
नं मयतराने मना भेट दिली
सोलापूराशी मिनी आनीली
नं मयतराने मना भेट दिली
नं माझी चादर कोनी चोरीयली
माझी चादर कोनी चोरीयली... कोरस - २
माझ्या चादरीच्या फुल्या
माझ्या चादरीच्या फुल्या
नं त्या मी निरमाने धुतल्या
नं त्या मी निरमाने धुतल्या
मध्यमध्वनीलहरी ४२० कि.ह.
आम्ही मनाच्या आकाशवाणी केंद्रावरून बोलत आहोत.
सकाळचे पाच वाजून पंचावन्न मिनिटे आणि तीन सेकंद झालेत.
आमच्या आज प्रसारित होणाऱ्या ठळक कार्यक्रमांची रूपरेषा...
सकाळच्या सभेत सुरुवातीला ऐकू या ‘भक्तीवंदना’!
यात ज्याच्यात्याच्या मनाचे श्लोक सादर होतील!
त्यानंतर ‘मनाची शेती’ कार्यक्रमात,
‘मनातल्या गाजर गवताला आळा कसा घालावा?’
याविषयी मार्गदर्शन केले जाईल.
दिवसभराच्या जगण्याच्या झेंगटाचा आढावा घेतला जाईल,
‘हवामनाचा अंदाज’ मध्ये!
विविध वाहिन्यांवरून प्रक्षेपित होणाऱ्या