नवकविता - ट्रॅफिक जॅम
नवकविता ब-याच वाचनात येतायत आजकाल. माझाही प्रयत्न. :D
विडंबन वगैरे समजू नये.
मनावर सततच्या होणा-या वारांमुळे अविरत चिघळत रहाणारी जी जखम आहे
त्यातून स्त्रवलेलं हे काव्य आहे.
प्लीज रिस्पेक्ट दॅट. इट्स ओरिजिनल.
नवकविता - ट्रॅफिक जॅम
उशीराच तरीही पुन्हा मी निघतो
त्या भयाण प्रवासासाठी
जणू फरफटत नेतं मला माझं नशीब
नशिबाचं काय म्हणा
नशीब त्याचंही असतं जो
खच्चकन चाकूचा वार केल्यासारखा
जातो...
जातो मला कट मारून...
आणि त्या मन गोठवणा-या थंडीत
रागाचा ज्वालामुखी मला चटके देतो...
आतून