नव गृहाचे कर्जही, फेडणे आता उभ्याने !
नव गृहाचे कर्जही, फेडणे आता उभ्याने
नोकरीशी जुंपणेही फिरुनी ते, नव्या दमाने ।
राहीले मनात गाणे, वर बॉसचे जोडे नव्याने,
काय पडलो मी भरीला, बिल्डरांच्या सुक्या दमाने ।
कोणत्या शैय्येवरी असते मजा सांगा गड्यांनो,
छळे इएमाय वेळी-अवेळी, रोजचा नव्या बळाने ।
भूक तगडी पण रोमान्सही, का जमेना रोज आता ?
रेंटातूनी हप्ता वळविणे माथी का, पुन्हा नव्याने ।
तू मला कुरवाळणेही सोडले आहे अताशा,
टेक-होम झाला कमी का? व्हिलनी नव्या लोनाने ।
भाडेकरी मी शोधतो पण, रेंट पाडूनी मागती,
मुजोर कामवालीचाही रेट, वाढतो नव्या दराने ।