एक होती चिऊ
तिला दोन भाऊ
ती बोलु लागली की वाटे मऊ मऊ,
तिची सकाळची सातची एन्ट्री झकास
दहाची एक्झीट करुन जाई भकास
एकला तिच्या परतीची लागे आस
तो पर्यंत होई डोळ्यांना नुस्तेच भास
एक दिवस ती बोलली स्वतःहुन
तिचा आवाज ऐकुन बदलली जीवनाची धुन
गालावर तिच्या खळी, चेहरा तिचा मुन
विचारले तिला होशील का माझ्या आईची सुन?
ती म्हणाली यार तु बोलतोस खुप छान
तुझ्याशी बोलुन कमी होतो मनावरचा ताण
गोड गोड बोलुन बाईसाहेब झाल्या मुक्त
माझ्या प्रश्नावर नकारार्थी मान हलवली फक्त
मी म्हणालो हा असा कसा फंदा
तुका म्हणे बाळा तुझा झाला आहे कंधा
प्रतिक्रिया
21 Oct 2016 - 10:34 am | वैभव पवार
ही कविता स्वगृह मधे दिसत नाहीये !
21 Oct 2016 - 3:09 pm | हृषीकेश पालोदकर
तिची सकाळची सातची एन्ट्री झकास
दहाची एक्झीट करुन जाई भकास
एकला तिच्या परतीची लागे आस
तो पर्यंत होई डोळ्यांना नुस्तेच भास......... जमलं
एक होती चिऊ
तिला दोन भाऊ
ती बोलु लागली की वाटे मऊ मऊ...... बसतं नाही असं वाटत.
22 Oct 2016 - 12:38 am | शार्दुल_हातोळकर
धमाल चिऊ....