कविता

...असं काही नसतं

निओ's picture
निओ in जे न देखे रवी...
6 Apr 2019 - 5:44 pm

नवरा बायकोचं भांडण
असं काहीच नसतं
तो म्हणतो पूर्व, ती म्हणते पश्चिम
बस एवढंच म्हणणं असतं

बघितलं तर ती ही एक गंमत असते

हाताबाहेर जाईल
एवढं ताणायचं नसतं
दोन चार दिवसांच्या अबोल्यानंतर
आपोआपच नरम व्हायचं असतं
वीजांच्या कड्कडाटानंतर पावसानं
धरणीला भिजवायचं असतं
तिनं हळूच
कुशीत शिरायचं असतं
त्यानं हळूवार
कुरवळायचं असतं
मायेच्या ओलाव्यात
नवीन जग फुलवायचं असतं

कविता माझीप्रेम कविताभावकवितामाझी कवितामुक्त कविताकविताप्रेमकाव्यमुक्तक

खिंड बोगदा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
6 Apr 2019 - 12:58 pm

खिंड बोगदा

या डोंगररांगा निघती
माझ्या घराच्या पुढती
किती बघावे उंचावूनी
नच कोणत्या वाटा दिसती
अनामिक भिती मनात असे
वर जावे की खाली यावे प्रश्न मनी वसे
केवळ एकच खिंड बोगदा
लांबून दिसे कुणी खोदला
एकदा जावे वाटते त्यातूनी
वाट परतीची येई का तिथूनी?

पाषणभेद
०६/०४/२०१९

अद्भुतरसशांतरसकविता

काव्य कंड

प्रमोद पानसे's picture
प्रमोद पानसे in जे न देखे रवी...
5 Apr 2019 - 10:13 pm

भुभूक्षीता सम विषय छेडु
यथातथा ती यमके जोडु
कुंथुनी मग ते शिळकट पाडू
अनाकलनीय नवकाव्य कंडु

कवन जंते उदरी माझ्या
विचार कल्पना असती ताज्या
परी शब्दांसव मेळ ना साधे
मळमळ मनात करती गमजा

बहु प्रयत्नांती सिद्ध जाहलो
झरझर लेखणी मी पाझरलो
मळकट तावावरती शाई ,
फुटत फुटत मी काव्य प्रसवलो

नवकवी
कंडुदास

कविता

दाराआडचे घड्याळ

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जे न देखे रवी...
5 Apr 2019 - 8:04 pm

.

एक घड्याळ दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर ?
स्वतःच्या बाहेर, शतकानुशतकांच्या पार...
जिथे आहे एक लंबकाचे घड्याळ...
.

आणि एक वाळूचे घड्याळ...

.

अदभूतकालगंगाकाहीच्या काही कविताजिलबीमाझी कवितारतीबाच्या कवितासंस्कृतीइतिहासकविताप्रेमकाव्यसाहित्यिकजीवनमानतंत्रदेशांतरराहती जागामौजमजा

(दाराआडची आई)

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
5 Apr 2019 - 12:51 am

पेरणा...अर्थातच

एक आई दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर?
कॉलनीच्या बाहेर, ग्राऊंडच्या पार
जिथे एक मुलगा खेळतो आहे मुग्ध....
करत असेल का तो तिचा काही विचार?
येत असेल का तो ही
खेळण्यातून बाहेर, ग्राऊंडच्या अलीकडे?
आईला दाराआडून बाहेर यायचं नाही...
मग ती वेताची काठी हळूच चाचपते,
ती काठी पाठीत घेऊन
मुलगा अविश्रांत कोकलत राहतो....
काठी सापडलेली आई
सताड उघडलेल्या दाराआडून सुतत राहते...
सुततच राहते....

-चमचमचांदन्या

eggsgholvidambanअदभूतअनर्थशास्त्रअभय-काव्यअविश्वसनीयआगोबाआता मला वाटते भितीआरोग्यदायी पाककृतीइशाराकविता माझीकाहीच्या काही कवितागरम पाण्याचे कुंडगाणेगोवाजिलबीफ्री स्टाइलबालसाहित्यभावकविताभूछत्रीरतीबाच्या कवितावाङ्मयशेतीविडम्बनभयानकहास्यकरुणअद्भुतरसरौद्ररसकविताविडंबनविनोदआरोग्यइंदुरीउपहाराचे पदार्थउपाहारओली चटणीडावी बाजूपारंपरिक पाककृतीरायतेऔषधोपचारप्रवासभूगोलराहती जागालाडूवन डिश मीलविज्ञानव्यक्तिचित्रव्यक्तिचित्रणक्रीडाफलज्योतिषराशीमौजमजारेखाटन

दाराआडची मुलगी

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
3 Apr 2019 - 9:47 pm

एक मुलगी दाराआडून बघते आहे बाहेर
किती बाहेर?
स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पार
जिथे एक मुलगा बसला आहे स्तब्ध....
करत असेल का तो ही तिचा विचार?
जात असेल का तो ही
स्वत:च्या बाहेर, समुद्राच्या पलीकडे?
मुलगी दाराआडून बाहेर येऊ शकत नाही...
मग ती तिचे संपूर्ण डोळे पाठवते,
ते डोळे डोळ्यात घेऊन
मुलगा शांतपणे जागा राहतो....
डोळे हरवलेली मुलगी
घर नसलेल्या दाराआडून बघत राहते...
बघतच राहते....

-शिवकन्या

कविता माझीवावरसंस्कृतीवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाज

देव

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जे न देखे रवी...
3 Apr 2019 - 4:57 pm

कितीक नवस
देवासी बोलती
भजती पूजती
मनोभावे

वाहणारी नदी
देव कितीकांची
पालक प्राणांची
कितीकांच्या

उगम डोंगरी
अंत सागराशी
वाहे दूर देशी
असहाय्य?

करी कुणी एक
त्यात मासेमारी
वाळू चोरी करी
कुणी एक

कुणी तीत करी
सुखे जलक्रीडा
आणि कुणा पीडा
बुडोनिया

तितूनच होई
विजेची निर्मिती
नासाडी पुरती
पुरामाजी

तिच्या पाण्यावरी
वाढतात शेते
शुष्क जग होते
तिच्या विना

सांगा मज आता
नदीचे वागणे
आमुच्या कारणे
असते का?

कविता

कोळीगीत: शिडाशिडात भरारे वारा

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
3 Apr 2019 - 7:10 am

आता देशावरून आपण कोकणात जावूया अन एक कोळीगीत ऐकूया.

शिडाशिडात भरारे वारा
होड्या निघाल्या किनारा || धृ ||

फिरवा सुकाणू सारी जाली भरली
मांदेली नगली करली तारली गावली
गोळा करुन घोळ चिंबोरी अन पाला
होड्या निघाल्या किनारा ||१||

घेवून दर्याची दौलत हाती
विकून होईल कमाई मोठी
पडो शिल्लक पैसा थोरा बरा
होड्या निघाल्या किनारा ||२||

उभी आसलं माझी बाय पाहत वाट
"कवा येईल धनी माझा परतून आज"
तिच्या कालजीचा आज होईल उतारा
होड्या निघाल्या किनारा ||३||

शिडाशिडात भरारे वारा
होड्या निघाल्या किनारा || धृ ||

शांतरसनृत्यकविताकोळीगीत

कोरडं रान

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
3 Apr 2019 - 4:03 am

किती भाग्यवान तुह्या पैंजणाचं घुंगरू ग
मी आसा दुर अन ते तुह्यापाशी राहतं ग

नको निघू भर दुपारचं उन्हातानाची ग
कमरेवर जरी पाणी तरी डोईवरी आग ग

चालतांना चाल तुही लचकेदार ग
रानामधी धावती हारीणी नाजूक ग

सगळीकडं आसती काटेरी बाभळी ग
तु रानामधी उगवलं गुलाबाचं फूल ग

किती वाटतं दोन शब्द तुह्याशी बोलू ग
पन बोलतांना वठी नाही काही येत ग

तुह्या नजरंला जवा नजर माझी भिडती ग
ढगातली वीज पडं लक्कन काळजात ग

एकडाव तरी तु माह्यासंग मनातलं बोल ग
तुझ्या बोलानं फुटलं मह्या काळजाचं डेकूळ ग

प्रेम कविताकविताप्रेमकाव्य

पाहिजे

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जे न देखे रवी...
2 Apr 2019 - 10:39 am

मनातले थेट लेखणीतून पाझरले पाहिजे
मौनाने अक्षरातून तरी स्पष्ट बोलले पाहिजे

गाईलही कधी पाखरू मुग्ध भाव मनातले
एकदा देऊन कान आतुर मने ऐकले पाहिजे

खडकातही कधी फुटेल कोवळी पालवी
ओतून जीव रक्त घाम परी शिंपले पाहिजे

भेटेल पांडुरंग आस दर्शनाची धरेल त्याला
सोडून देहभान भक्तिमार्गी चालले पाहिजे

साहल्यावरी तिचा दुरावा दिवसभराचा
भेटण्या स्वप्नात तरी तिने आले(च) पाहिजे

-अनुप

कविता