कविता

मृत्यूची सय ही निमित्तमात्र

ज्ञानोबाचे पैजार's picture
ज्ञानोबाचे पैजार in जे न देखे रवी...
30 Mar 2019 - 2:44 pm

एकाच कवितेमधून दोन वेळा प्रेरणा मिळाली हे निमित्तमात्र

मग पुढे असं होतं की ..
दोन श्वासातले अंतर वाढत जातं.
डोळ्यामधली चमक विझत जाते.
ओठावरचं हसू निवत जातं...
अग्नीचा स्पर्श ही समजत नाही ..
आणि नातलग लागतात गुण आठवायला..
कुडीतले प्राण निघतात प्रस्थानाला ..
असं होण्या आधी भरभरून जगायचे..
मृत्यूची सय ही निमित्तमात्र..

पैजारबुवा,

bhatakantiकाणकोणकॉकटेल रेसिपीकोडाईकनालगरम पाण्याचे कुंडकविता

चित्त

अन्या बुद्धे's picture
अन्या बुद्धे in जे न देखे रवी...
30 Mar 2019 - 1:34 pm

अवयव घेती
सुख दुःख भोग
जाणिवेचे जग
चित्ता माजी

चित्त पाही सारे
चित्त चव घेई
चित्ता गंध येई
कवटीत

इंद्रिये देतात
संवेद संकेत
त्यांची काय मात
चित्ता विना?

चित्त हे सक्षम
घडे संवेदन
स्वतःतून जाण
सुख दुःख

चित्ता माजी घडे
दुःख आणि सौख्य
निवड स्वातंत्र्य
आपणासी

कळले वळले
ज्यास हे, सतत
आनंदाचा स्रोत
अंतरात

-अनुप

कविता

डॉक्टर हा निमित्तमात्र..

सोन्या बागलाणकर's picture
सोन्या बागलाणकर in जे न देखे रवी...
28 Mar 2019 - 8:05 am

मूळ प्रेरणा: काॅफी ही निमित्तमात्र..

(मूळ कवयित्री प्राची अश्विनी यांची माफी मागून)

मग पुढे असं होतं की ..
दातामधलं अंतर वाढत जातं.
डोळ्यामधला नंबर वाढत जातो.
बोळक्यामधलं हसू निवत जातं...
नावं होतात विसरायला..
आणि घरचे लागतात रागवायला..
फुफ्फुस लागतं धापा टाकायला..
असं होऊ नये म्हणून भेटायचं..
डॉक्टर हा निमित्तमात्र..

vidambanमुक्त कविताहास्यकविताविडंबन

पुरंदराचं तेजस्वी पातं..! [updated]

राघव's picture
राघव in जे न देखे रवी...
27 Mar 2019 - 9:16 pm

मुरारबाजी म्हटलं की डोळ्यांपुढे न चुकता उभी राहते ती पुरंदरची लढाई. त्रिवार मुजरा अगदी सहज घेते - ती प्रयत्नांची पराकाष्ठा, अतुलनीय शौर्य आणि न खचणारी, कुठलीही भीड-मुर्वत न मानणारी अभेद्य हिंमत.. मुरारबाजींची आणि त्यांच्यासोबत, दिलेरखानाच्या ५००० च्या सुलतानढव्याला [डोक्याला कफन बांधून, जीवाची पर्वा न करता केवळ विजयासाठीची चढाई करण्याची मुघल पद्धत] उत्तर देण्यासाठी बाहेर पडलेल्या उण्यापुर्‍या ७०० कडव्या मावळ्यांची. त्यात मुरारबाजींचं शौर्य बघून दिलेरखानानं मनसबीचं आमिष दिलं.. झालं.. त्या निरोपानं कृद्ध झालेल्या मुरारबाजींनी सरळ मुघल सैन्याच्या मध्यात घुसून खानालाच कापण्यासाठी चाल केली..!!

वीररसरौद्ररसइतिहासकवितासमाज

काॅफी ही निमित्तमात्र..

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
26 Mar 2019 - 10:02 am

मग पुढे असं होतं की ..
शब्दांमधलं अंतर वाढत जातं.
डोळ्यामधलं पाणी सुकत जातं.
ओठावरचं हसू निवत जातं...
स्पर्श होतात विसरायला..
आणि भांडणं लागतात आठवायला..
नातं लागतं विरायला..
असं होऊ नये म्हणून भेटायचं..
काॅफी ही निमित्तमात्र..

फ्री स्टाइलकविता

|| माझे बाबा ||

बी.डी.वायळ's picture
बी.डी.वायळ in जे न देखे रवी...
15 Mar 2019 - 11:51 am

हे विठ्ठला माझे मस्तक तुझ्या चरणी झुकू दे |
माझे बाबा माझ्या कन्यादानापर्यंत टिकू दे ||धृ||

त्यांच्याच आधाराने झाले लहानाची मोठी |
खंबीरपणे उभे राहिले सतत माझ्या पाठी ||
त्यांचच बोट धरुन मी चालायला ही सिकाले |
म्हणूनच तर आतापर्यंत कधिच नाही थकले ||
हे विठ्ठला त्यांच शेत मोत्यावानी पिकू दे |
माझे बाबा माझ्या कन्यादानापर्यंत टिकू दे ||1||

कविता माझीकविता

चढणं म्हणजे काय असते रे भौ ( एक अशीच केलेली "श श क कविता" )

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
12 Mar 2019 - 6:45 pm

चढणं म्हणजे काय असते रे भौ

लेका , चढणं मंजी ईचारांशी लढणं असतं रे भौ

लढणं मंजी काय असतं रे भौ

लेका लढणं मंजी आतल्याआत कुढणं असतं रे भौ

आतल्याआत कुढणं , मंजी काय असते रे भौ

लेका , त्ये मंजी सवताच्या नजरेतन पडणं असते रे भौ

नजरेतन पडणं म्हणजे काय असते रे भौ

लेका, नजरेतन पडणं म्हणजे मनाविरुद्ध उडणं असते रे भौ

मनाविरुद्ध उडणं म्हणजे काय असते रे भौ

मनाविरुद्ध उडणं , मंजी टुल्ली गहाण ठेवणं असतं भौ

टुल्ली गहाण ठेवणं मंजी काय रे भौ

आरं लेका, त्येच तर बोलून ऱ्हायलोय

इतिहासकविता

काचेच्या अलिकडून

चाणक्य's picture
चाणक्य in जे न देखे रवी...
9 Mar 2019 - 9:12 pm

बहुतेक वेळेला मी मान फिरवूनच घेतो
किंवा लक्ष नाही असं दाखवतो
नाहीच जमलं दुर्लक्ष करणं
तर मानेनेच नाही म्हणतो
आणि कधीकाळी दिलेल्या
दहा रूपड्याचं गणित मांडून
स्वतःचच समर्थन करतो...
पण खरं सांगायचं तर,
आत एक द्वंद्व चालू असतं
कारण मला पक्कं ठाऊक असतं की,
नकार,
अपमान,
एकटेपण,
तिरस्कार,
नाकारलेपण,
संघर्ष,
या शब्दांचे अर्थ
मला नाही कळणार कधीच....
ते कळतील
फक्त
गाडीच्या बंद काचेबाहेर असणा-या
आणि बेदरकार नजरेने आयुष्याशी दोन हात करत असणा-या
....त्या हिजड्याला

मुक्त कविताकविता

व्हेनीसचे व्यापारी

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
6 Mar 2019 - 2:50 am

क्लीओपात्राच्या सौंदर्याला
सीझरच्या नश्वरतेचा शाप
या भुताटकीच्या जगात
सगळेच हॅम्लेटचे बाप
*
व्हेनीसचे व्यापारी सारे
मासाचे भुकेले
रोमीयोचे शहाणपण
उगाळुन प्यायलेले
*
म्हणुन म्हणतो पोरी
बरे असते स्व:ताला जपलेले
ईथे सगळे वंशज सेक्सपीयरचे
तारुण्याला हपापलेले...........

कविता

सजले अंतर

कुमार जावडेकर's picture
कुमार जावडेकर in जे न देखे रवी...
6 Mar 2019 - 1:36 am

नाही माझ्या आसवांना तुझ्या श्रावणाची सर
वाट चिंब ही भिजली आणि सजले अंतर

दारी निघताना होती पागोळ्यांची मध्यलय
जणू सोबतीला आले तुझ्या संतूरीचे स्वर

विसरलो गेला कसा सारा दिवस सरून
झाली दिवेलागणी अन्, मन कातर कातर

काजळले क्षितिज हे, मिटल्या पापण्यांसम
चमकत्या मोतियांची नवी लेवून झालर

प्रश्न नाही आला मनी, नाही यायचाही कधी
जाणशी तू सारे आणि मला ठाऊक उत्तर

मातीतून मातीकडे असा मृद्गंधी प्रवास
ज्यात एक एक झाला श्वास श्वास हा ईश्वर...

- कुमार जावडेकर

कवितागझल