कविता

वेदना जहरी

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
30 Dec 2018 - 10:55 am

अनोळखी गंध कुणाचा आला दारी
अंगणातल्या मोगऱ्याची गेला करुन चोरी

वाट कुणाला पुसू त्याच्या गावाची
सांगेल कुणी कहानी त्याच्या नावाची
होऊन शहाऱ्यांचे भाले रुतले माझ्या उरी

पाचोळ्यांच्या रानात फुलली ठिणगी
पेटू लागल्या ज्वाला साऱ्या अंगी
डोळ्यांत उगवली माझ्या प्रीत प्यारी

आठवणींची भरुन येते रात
सूर कुणी पेरले या ओठांत
सोसते मी एकांताची वेदना जहरी

कविता

कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
29 Dec 2018 - 7:13 pm

कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
सखे काय सांगू.
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
*
घेता मिठीत त्याने,आग अंगास लावली
अधराने अधरावर प्रेम कविता कोरली
सुटले भान पदराचे, गळून पडली चोळी
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
*
स्पर्शिता उरोज त्याने,श्वास माझे थांबले,
धुंद मिटल्या नयनी,कामस्वप्ने तरळले
गात्र गोजिरी स्वप्ने फुलली,ग्लानी आली
कुंकवाच्या धन्यानं अशी रात जागवली
ना डोळ्यास डोळा. ना पापणी मिटू दिली
*

शृंगारकविता

वृक्षवल्ली आम्हा सोयरी

नायकुडे महेश's picture
नायकुडे महेश in जे न देखे रवी...
29 Dec 2018 - 12:38 pm

जसे वाळवंटी असे निर्जरा,
जसे सागराच्या तळाशी धरा,
तसा एक तू जीव या भूवरी,
वृक्षवल्ली आम्हा सोयरी,
वृक्षवल्ली आम्हा सोयरी ।।

कुणी वृक्षप्रेमी पुकारी तुला,
तया जीवनी एक आधार तू,
कुणी वृक्षवैरी न ठावे तुला,
करी स्वप्न साऱ्यांचे साकार तू,
जसा देव नांदे सदा अंतरी ...
वृक्षवल्ली आम्हा सोयरी,
वृक्षवल्ली आम्हा सोयरी ।।

माझी कवितामांडणीसंगीतकविता

तू काळजाला भिडावे

परशुराम सोंडगे's picture
परशुराम सोंडगे in जे न देखे रवी...
28 Dec 2018 - 10:49 pm

देहास माझ्या स्पर्शताना
तू काळजाला ही भिडावे

श्वासात श्वास गुंतताना रे
उरातले चांदणे धन्य व्हावे

बहर माझा नि कहर तुझा
क्षणांनी जराशी धुंद व्हावे

तू बेभान मी व्याकूळ तरी
देहानी जरा किनारा व्हावे

पाकळया तू उलगडताना
तुझा गंध जरा कुंद व्हावा

तू रिक्त कधी, विरक्त कधी
मलाही सृजनाचा पूर यावा

. . . . . . परशुराम सोंडगे,पाटोदा
. . . . 9527460358

kelkarकविता

तू काळजाला भिडावे

परशुराम सोंडगे's picture
परशुराम सोंडगे in जे न देखे रवी...
28 Dec 2018 - 10:49 pm

देहास माझ्या स्पर्शताना
तू काळजाला ही भिडावे

श्वासात श्वास गुंतताना रे
उरातले चांदणे धन्य व्हावे

बहर माझा नि कहर तुझा
क्षणांनी जराशी धुंद व्हावे

तू बेभान मी व्याकूळ तरी
देहानी जरा किनारा व्हावे

पाकळया तू उलगडताना
तुझा गंध जरा कुंद व्हावा

तू रिक्त कधी, विरक्त कधी
मलाही सृजनाचा पूर यावा

. . . . . . परशुराम सोंडगे,पाटोदा
. . . . 9527460358

kelkarकविता

मोबाईलची शेजआरती

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
23 Dec 2018 - 11:05 pm

*मोबाईलची शेजआरती*

उत्तररात्र रात्र झाली तुम्ही झोपावे आता
थकलो मी दिसभराचा व्हावे आता त्राता || धृ||

दया दाखवा मज पामरासी केले मनोरंजन
तुम्हासी दिला आनंद केला माझा नाश
बॅटरी उतरवली दोन वेळा ||१||

घरी लपविले आई बापापासून मला
ऑफीसात केले कामाच्यावेळी खेळ
असा टाईमपास किती करावा? ||२||

असतात महत्वाची कामे घरी हापीसात
न वापरावे कधी कितीही व्हाटसअप
जरी आता मिळे फ्री डेटा ||३||

वर्षभरातच मज वापरून टाकूनी देसी
नवे मॉडेल मोबाईलचे घेवूनी येसी
जरी मी असे चांगला ||४||

अभंगगाणेशांतरसकविताविनोदसमाजजीवनमानतंत्रमौजमजा

अनन्तयात्री

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
23 Dec 2018 - 6:56 pm

अनाम नक्षत्रातील तारा
झळाळताना गगनी
अनाहताच्या झंकाराची
दुमदुम आली कानी

इंद्रियगोचर विभिन्न अनुभव
एकवटोनी गेले
स्थूल सूक्ष्म जड चेतन यातील
भेदही गळून पडले

सुदूर बघता बघता अवचित
क्षितिज बिंदूवत उरले
अडले पाऊल कुंपण तोडून
अनन्तयात्री झाले

माझी कविताकविता

भुकेच्या ज्वाळा

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
22 Dec 2018 - 6:46 pm

दूर निघाली पाखरे शोधाया दाणा
भवताली साऱ्या भेगाळलेल्या दुष्काळाच्या खुणा

तडफडणाऱ्या उभ्या झाडाच्या सावलीत
दमून आली पाखरे निवारा शोधीत

पोटात पेटल्या होत्या भुकेच्या ज्वाळा
कंठात झाला होता जीव गोळा

थकलेल्या उदास डोळ्यांच्या आडोशाला
पाण्याच्या एक थेंब हळूच पाझरला

घरट्यात राहिलेल्या आपुल्या पिलांसाठी
एखादा दाना जाऊ बांधून गाठी

पेटलेल्या ऊन्हात पुन्हा पाखरे उडाली
एका दाण्यासाठी हिरव्या देशी निघून गेली

कविता

लोकशाहीला नाही वर्ज्य

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
22 Dec 2018 - 12:07 pm

कुणी म्हणाले दलित
भटक्या कुणी म्हणाले
हाडाचा कुणबी तो
ठणकावून सांगितले

बिनकाम रित्या डोक्यांना
विषय चघळाया नवा
खडा तुरट जातीचा
बेशर्म जिभांना हवा

स्वये श्रीरामप्रभू मातले
जनचर्चा त्या बाधली
जनसामान्य इथे तर सारे
नेत्यांच्या आधीच हवाली

देवळाबाहेरच्या रांगेतला
एकेक मोजला जाईल
हक्काचा मतदार, त्याची
जात पडताळणी होईल

लोकशाहीला नाही वर्ज्य
कुणीही, माणूस वा देव
तुझ्यावरच आले आता
मारूतीराया, तुझी जात समोर ठेव
<\p>
- संदीप चांदणे (२२/१२/२०१८)

कविता माझीमाझी कविताकवितासमाज

बापाचे मुलीस पत्र..

प्रियाभि..'s picture
प्रियाभि.. in जे न देखे रवी...
21 Dec 2018 - 2:59 pm

पोरी, देतो तुला आज
माझ्या प्रेमाची शिदोरी
कर स्विकार प्रेमाने
ठेव जपून तू उरी..

जरी सांगे माय-बाप
तुला जगायची रीत
शिकशील तुझी तूही
पुढे जगाच्या शाळेत..

पोरी, अंतरी ग तुझ्या
प्रेम राहो निरंतर
थारा द्वेषाला नसावा
दूर राहुदे मत्सर

कविता