दूर निघाली पाखरे शोधाया दाणा
भवताली साऱ्या भेगाळलेल्या दुष्काळाच्या खुणा
तडफडणाऱ्या उभ्या झाडाच्या सावलीत
दमून आली पाखरे निवारा शोधीत
पोटात पेटल्या होत्या भुकेच्या ज्वाळा
कंठात झाला होता जीव गोळा
थकलेल्या उदास डोळ्यांच्या आडोशाला
पाण्याच्या एक थेंब हळूच पाझरला
घरट्यात राहिलेल्या आपुल्या पिलांसाठी
एखादा दाना जाऊ बांधून गाठी
पेटलेल्या ऊन्हात पुन्हा पाखरे उडाली
एका दाण्यासाठी हिरव्या देशी निघून गेली