वेदना जहरी

चांदणशेला's picture
चांदणशेला in जे न देखे रवी...
30 Dec 2018 - 10:55 am

अनोळखी गंध कुणाचा आला दारी
अंगणातल्या मोगऱ्याची गेला करुन चोरी

वाट कुणाला पुसू त्याच्या गावाची
सांगेल कुणी कहानी त्याच्या नावाची
होऊन शहाऱ्यांचे भाले रुतले माझ्या उरी

पाचोळ्यांच्या रानात फुलली ठिणगी
पेटू लागल्या ज्वाला साऱ्या अंगी
डोळ्यांत उगवली माझ्या प्रीत प्यारी

आठवणींची भरुन येते रात
सूर कुणी पेरले या ओठांत
सोसते मी एकांताची वेदना जहरी

कविता