छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२०

मोबाईलची शेजआरती

Primary tabs

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
23 Dec 2018 - 11:05 pm

*मोबाईलची शेजआरती*

उत्तररात्र रात्र झाली तुम्ही झोपावे आता
थकलो मी दिसभराचा व्हावे आता त्राता || धृ||

दया दाखवा मज पामरासी केले मनोरंजन
तुम्हासी दिला आनंद केला माझा नाश
बॅटरी उतरवली दोन वेळा ||१||

घरी लपविले आई बापापासून मला
ऑफीसात केले कामाच्यावेळी खेळ
असा टाईमपास किती करावा? ||२||

असतात महत्वाची कामे घरी हापीसात
न वापरावे कधी कितीही व्हाटसअप
जरी आता मिळे फ्री डेटा ||३||

वर्षभरातच मज वापरून टाकूनी देसी
नवे मॉडेल मोबाईलचे घेवूनी येसी
जरी मी असे चांगला ||४||

काही मर्यादा सेल्फी फोटो किती काढावे?
काढले ते काढले, का फेसबुकी अपलोडावे?
व्यर्थ व्यापार हा फुकाचा ||५||

आवरा आता बास करा जास्त वापर
मोबाईलसाठी नाही आपण बोले पाषाण
अती तेथे माती हे जाणा ||६||

- पाषाणभेद
२३/१२/२०१८

अभंगगाणेशांतरसकविताविनोदसमाजजीवनमानतंत्रमौजमजा