कविता

गज़ल

MipaPremiYogesh's picture
MipaPremiYogesh in जे न देखे रवी...
26 Oct 2018 - 11:16 pm

गज़ल
गजल म्हणजे डोळ्यांच्या
काजळातील रेघ!
जसे श्रावणात
बरसणारे मेघ!!!
गजल म्हणजे जुन्या 
आठवणीतील धागा!
जशी कृष्णासाठी
आसुसलेली राधा!!!
गजल म्हणजे
पहिले प्रेम!
जसा गोऱ्या
गालावरील नाजूक थेंब!!!
गजल म्हणजे 
श्रावणातील पाऊस!
जसे श्रावणातील पावसात
चिंब भिजलेले केस!!!
गजल म्हणजे 
नक्षत्र स्वाती!
जसा त्या नक्षत्रात
तयार झालेला सुंदर मोती!!!
गजल म्हणजे ओंजळीतील
हिरवंगार पान!
जशी मल्हार रागातील
घेतलेली सुंदर तान!!!
गजल म्हणजे 

कवितागझल

पाकळी!

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जे न देखे रवी...
21 Oct 2018 - 11:55 am

सकाळ झाली
कोवळी किरणे अंगावर आली
अन् पाकळ्यांनी हळूच
डोळे किलकिले केले
एक फुलपाखरू बागडतच
पाकळीवर येऊन बसले
अन् मिटलेल्या साऱ्या पाकळ्या
फूल फूल होऊन गेल्या...
किरणांनी न्हाऊन ताज्या झाल्या,
वाऱ्यासंगे डोलू लागल्या,
सुगंध उधळत झुलू लागल्या...
उमलत्या पाकळ्यांना
फुलपाखरांचे थवे
गुदगुल्या करू लागले
अन् हसूहसूं होऊन
पाकळ्या लाजल्या...
सारा दिवस तोच खेळ!

कविता

हि सर पावसाची पुन्हा आज आली.

AjayRGodse's picture
AjayRGodse in जे न देखे रवी...
19 Oct 2018 - 12:53 pm

हि सर पावसाची पुन्हा आज आली

हि सर पावसाची पुन्हा आज आली
पुन्हा आसवांची मोकळी वाट झाली
मन व्याकुळ होते, पुन्हा चिंब न्हाते,
क्षितिजावरी का तुला ते पहाते ?
पुन्हा पावसाशी तुझी बात झाली.

हि सर पावसाची, हि ओढ तुला भेटण्याची.

हि सर पावसाची पुन्हा आज आली
तुझ्या आठवाणी पुन्हा जाग आली
मन बेभान होते, तुझे गीत गाते.
का मिलनाची तुला साद देते ?
तुला भेटण्याची का मना आस झाली ?

हि सर पावसाची, हि ओढ फक्त मिलनाची.

प्रेम कविताकविताप्रेमकाव्य

असेलही वा नसेलही...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
16 Oct 2018 - 8:57 am

असेलही वा नसेलही...
दोनच या शब्दांवर सारे
जगणे अपुले वसेलही...

धर्मच गेला देऊन उत्तर
शाश्वत वैश्विक प्रश्नाचे.
परी न विसरू शकला डोळे
कधीच नंतर द्रोणाचे.
मनात त्याच्या खंत तयाची
रुतून बसली असेलही....

असेलही वा नसेलही
दोनच या शब्दांवर सारे
जगणे अपुले वसेलही...

डोळ्यांमध्ये प्राण आणुनी
कुणी विचारी आज तिला,
पहा बदललो पुरा राणि मी
आवडेन का अता तुला?
हसून उत्तर टाळू जाता
नयनी पाणी नसेलही...

असेलही वा नसेलही
दोनच या शब्दांवर सारे
जगणे त्यांचे वसेलही...

भावकविताकविता

रदीफ नाही कधी जुळला ...

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
13 Oct 2018 - 8:04 pm

रदीफ नाही कधी जुळला
न कधीही काफिया सुचला
गजल जगण्यातला तरिही
कैफ भरपूर अनुभवला

जिव्हारी लागतिल ऐसे
कितीतरी वार परतविले
तरी एल्गार युध्दाचा
जखम ओली असुन केला

सदैवच लागले होते
ध्यान हे ऐहिकापार
इकडच्या ऊनछायेचा
कधी अफसोस ना केला

माझी कविताकवितामुक्तक

हा सागरी किनारा

केदार गाड्गीळ's picture
केदार गाड्गीळ in जे न देखे रवी...
9 Oct 2018 - 4:59 pm

हा सागरी किनारा । रवि दूर लोटताना
हीरा राजा ची ही जोड़ी । थोडा भार सोसताना

पाणी अथांग मुक्त । पक्षी शोधी निवारा।
वाहे खटयाळ् वारा। हा सागरी किनारा

बघता सखे तुला मी। क्षण होती धूंद धूंद। मग मंद होइ वारा। हा सागरी किनारा। हा सागरी किनारा

रवि जाई सांज होइ ।भासे चंद्र कोंदणात। अन एक शुक्रतारा। हा सागरी किनारा

ऋतू सांजवेळी खुलला। मनि मोगराच फुलला । आकाशी नक्षत्र नजारा। हा सागरी किनारा

मन बावरे असे हे
स्वप्नात ही नजारे
ही कोणति नशा रे
हा कोणता किनारा
मन शोधता किनारा

कविता

यलो ऑकर ची स्वप्ने

हर_हुन्नरी's picture
हर_हुन्नरी in जे न देखे रवी...
8 Oct 2018 - 3:55 pm

यलो ऑकर ची स्वप्ने :

पानगळ सुरु झालीय

नोव्हेंबर मधली

सेकंदागणिक कोसळतायत

हजारो स्वप्नं

गवताच्या अगणित हिरव्या

छटांमध्ये

रानावनांत , जंगलात

शहरातल्या पार्कात

पडीक घरांच्या अवतीभवती

धांदल नुसती

अविरत

एकेक पान पाहावं

अगदी जवळून ,

गाढ , सुगंधी झोपेतल्या

खुशबूदार स्वप्नासारखं

पहिल्या धारेच्या

प्रशियन ब्लू चे शिंतोडे

सूर्याने जाळून टाकलेले

कच्चे खाऊन टाकलेले रंग

व्हर्मीलॉन रेड पासून बर्न्ट सिएना

पर्यंत च्या सर्व रंगश्रुती

कविता

एवढंच करा.

अंतरा आनंद's picture
अंतरा आनंद in जे न देखे रवी...
6 Oct 2018 - 4:43 pm

कोणाकडे प्रतिभेची कुंडले असतील तर,
तर ती उतरवूनच ठेवावी.
कारण ती मागणारे इंद्र,
रस्तोरस्ती उतरलेत.

तुमची प्रतिकं असतील मारे प्रत्यक्षाहून उत्कट
तुम्हीहून ती जाळा.
कारण प्रत्यक्षांच्या उरावर,
त्यांना थयाथया नाचवणारे,
तुमच्या अंगणात आलेत.

अभ्यासाचं कवच काढूनच टाकावं
रक्तबंबाळ झालात तरी.
कारण, ते देणाऱ्या सूर्याने
त्याचं तेज गहाण टाकलय.

कविता

चित्रातल्या कळ्या...

कलम's picture
कलम in जे न देखे रवी...
4 Oct 2018 - 10:16 am

स्वप्नात रंगलेल्या चित्रातल्या कळ्यांनो

फुलणे तव बघाया मी अधीर झालो

फुलतील फुले तुमची देतील गंध ह्रदया

रंगूनी टाकतील अन माझ्याही जीवनाला

फुलबाग मग कदाचित मनीही फुलेल माझ्या

मन ही म्हणेल गाणे जुळवूनिया सुरांना

पसरेल गंध तुमचा गंधीत होई माती

होईल पूर्ण गाणे जुळुनी नवीन नाती

फाकेल सूर्यबिंब पसरेल दश दिशांना

माझेच नवे जग हे दावीन जीवनाला

पण ह्या मनास वेड्या सांगू कसे तुम्हाला

फुलण्यास वेळ नाही चित्रातल्या कळ्यांना

कविता

मन

संदीप-लेले's picture
संदीप-लेले in जे न देखे रवी...
1 Oct 2018 - 7:46 pm

असे समुद्र अथांग, मन त्याहूनही खोल
हिमालय जो उत्तुंग, मन त्याहूनही थोर

वाहताना होते नदी कधी वाकडी वेल्हाळ
मन जागच्या जागीच आणि तरीही नाठाळ

लहरी वारा आणे पाण्यावरती तरंग
मनी उठता तरंग लहरते अंतरंग

वेगवान प्रकाशाला संथ काळाचीच साथ
संथ जीवनी राहून मन धावते वेगात

तारे टांगले ज्यावर त्यास म्हणती अंबर
मन टिपते विश्वाला, मन विश्र्वाचे झुंबर

मूल पाहताच मन लहानाहून लहान
तेच तन तेच मन खरे तेव्हांच महान

हाव भाव राग लोभ, मनी अगणित मिती
देव धर्म पाप पुण्य, सारी त्याचीच निर्मिती

कविता