असेलही वा नसेलही...

प्राची अश्विनी's picture
प्राची अश्विनी in जे न देखे रवी...
16 Oct 2018 - 8:57 am

असेलही वा नसेलही...
दोनच या शब्दांवर सारे
जगणे अपुले वसेलही...

धर्मच गेला देऊन उत्तर
शाश्वत वैश्विक प्रश्नाचे.
परी न विसरू शकला डोळे
कधीच नंतर द्रोणाचे.
मनात त्याच्या खंत तयाची
रुतून बसली असेलही....

असेलही वा नसेलही
दोनच या शब्दांवर सारे
जगणे अपुले वसेलही...

डोळ्यांमध्ये प्राण आणुनी
कुणी विचारी आज तिला,
पहा बदललो पुरा राणि मी
आवडेन का अता तुला?
हसून उत्तर टाळू जाता
नयनी पाणी नसेलही...

असेलही वा नसेलही
दोनच या शब्दांवर सारे
जगणे त्यांचे वसेलही...

भावकविताकविता

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

16 Oct 2018 - 11:11 am | श्वेता२४

मस्त कविता अतिशय आवडली

चांदणे संदीप's picture

16 Oct 2018 - 12:22 pm | चांदणे संदीप

कविता आवडली!

Sandy

अभ्या..'s picture

16 Oct 2018 - 12:58 pm | अभ्या..

असेलही वा नसेलही
हीच कहाणी प्रत्येकाची
शब्द वेगळे, वेळ वेगळी
प्रत्येकाची व्यथा आगळी
कुण्या चुकीची जाणीव कुणाला
असेलही वा नसेलही....

असेलही वा नसेलही
दोनच या शब्दांवर सारे
जगणे त्यांचे वसेलही...

प्राची अश्विनी's picture

16 Oct 2018 - 4:02 pm | प्राची अश्विनी

खरंय.

यशोधरा's picture

16 Oct 2018 - 1:52 pm | यशोधरा

वा! सुरेख! द्रोणांच्या डोळ्यांचा काय संदर्भ आहे?

अभ्या..'s picture

16 Oct 2018 - 1:58 pm | अभ्या..

नरो वा कुंजरो
द्रोणाला मिळालेली संदिग्धता. आपल्या प्रश्नाचे उत्तर आपणच मिळवण्याची.

प्राची अश्विनी's picture

16 Oct 2018 - 4:01 pm | प्राची अश्विनी

हा संदर्भ कुणाला कळेल की नाही ही धाकधूक होती.

यशोधरा's picture

16 Oct 2018 - 5:08 pm | यशोधरा

ओह! बरोबर. धन्यवाद.

अनन्त्_यात्री's picture

16 Oct 2018 - 3:58 pm | अनन्त्_यात्री

कविता आवडली!

प्राची अश्विनी's picture

16 Oct 2018 - 4:06 pm | प्राची अश्विनी

श्वेता २४, यशोधरा, अभ्या, चांदणे संदीप, अनंत रात्री... धन्यवाद.

प्रचेतस's picture

16 Oct 2018 - 5:21 pm | प्रचेतस

अत्यंत सुरेख.

राघव's picture

17 Oct 2018 - 7:27 pm | राघव

अत्यंत सुंदर! खूप आवडले! :-)

टर्मीनेटर's picture

17 Oct 2018 - 8:01 pm | टर्मीनेटर

खूप छान.

प्राची अश्विनी's picture

19 Oct 2018 - 11:19 am | प्राची अश्विनी

टर्मीनेटर, राघव आणि प्रचेतस,
धन्यवाद!

माहितगार's picture

19 Oct 2018 - 1:24 pm | माहितगार

चांगली रचना, अर्थात काव्याचा काही भाग समजून घेणे माझ्या बाबतित अद्याप बाकी असावे असे वाटते, पुर्नवाचनात अधिक अर्थ काही लागू शकल्यास बघता येईल. पु.ले.शु.

चित्रगुप्त's picture

19 Oct 2018 - 1:45 pm | चित्रगुप्त

कविता आवडली, माहितगार म्हणतात त्याप्रमाणे मलाही संपूर्ण अर्थ उलगडलेला नाही. थोडेसे दिशादर्शन केल्यास उपयोगी ठरेल.

प्राची अश्विनी's picture

19 Oct 2018 - 6:07 pm | प्राची अश्विनी

The truth is not absolute. त्याला(कमीतकमी) दोन बाजू असतात. असं काहीसं म्हणायचं होतं. To be or not to be हा एक शाश्वत प्रश्न आहेच.
द्रोणाने विचारलेल्या "अश्वत्थामा मेला का " या प्रश्नाला प्रत्यक्ष धर्माने ( pun intended) सुद्धा नरो वा कुंजरो वा असं गुळमुळीत "असेलही किंवा नसेलही या अर्थाचं उत्तर दिलं. आणि म्हणून द्रोण खचला आणि त्याला मारणं शक्य झालं. हा संदर्भ घेतलाय

माहितगार's picture

19 Oct 2018 - 6:38 pm | माहितगार

डोळ्यांमध्ये प्राण आणुनी
कुणी विचारी आज तिला,
पहा बदललो पुरा राणि मी
आवडेन का अता तुला?
हसून उत्तर टाळू जाता
नयनी पाणी नसेलही...

प्राची अश्विनी's picture

19 Oct 2018 - 7:00 pm | प्राची अश्विनी

पहिल्या कडव्याशी लिंक नाही, मूळ कल्पनेशी आहे.
भातुकलीच्या खेळामधली ....आठवतंय? काही वर्षांनंतर ते राजा राणी पुन्हा भेटले तर???
आता ते कडवं वाचा..
राणीने उत्तर टाळलंय.

माहितगार's picture

19 Oct 2018 - 8:15 pm | माहितगार

ओह, आता अर्थ लागतोय आणि आता कविता पोहोचली असे नक्कीच म्हणता येते, न कळलेला काही अधिक खोल अर्थ असावा असे वाटतच होते पण नेमका काय असेल हे समजत नव्हते. चांगली विचारात पाडणारी रचना . पु.ले.शु.

चित्रगुप्त's picture

19 Oct 2018 - 6:34 pm | चित्रगुप्त

जै धर्मात ज्याला 'स्यात' ( .. हिंदीतील 'शायद ?)म्हणतात ते हेच असावे. असेही असेल किंवा तसेही असेल, अंतिम सत्य म्हणून काहीही सांगता येत नाही.... वगैरे. यावर ओशोंचे खूप छान प्रवचन पूर्वी वाचले होते.

प्राची अश्विनी's picture

19 Oct 2018 - 7:01 pm | प्राची अश्विनी

स्यात..
ही नवीन माहिती मिळाली.

नाखु's picture

19 Oct 2018 - 6:38 pm | नाखु

आवडली.

असेल ही नसेल ही च्या अधेमधे वावरणारा नाखु पांढरपेशा

प्राची अश्विनी's picture

19 Oct 2018 - 7:01 pm | प्राची अश्विनी

:)

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Oct 2018 - 7:39 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर कविता ! यादृच्छिकपणा आणि अनिश्चितता यांच्यावरची टिप्पणी आवडली.

जीवन हे नेहमी 'असेलही-नसेलही'च्या हिंदोळ्यावर झुलत असते... खात्री (असलीच तर,) फार कमी गोष्टींची आणि तीही फार कमी वेळा असते. पण, त्यामुळेच, जीवनात मजा आहे.

ज्ञानोबाचे पैजार's picture

20 Oct 2018 - 9:25 am | ज्ञानोबाचे पैजार

कविता लै म्हणजे लैच आवडली
बर्‍याच दिवसांनी अशी कविता वाचायला मिळाली की जी पहिल्या वाचनात आवडून गेली.
(कवीने / कवयत्रीने १० वीच्या परीक्षेत सुध्दा संदर्भासहीत स्पष्टीकरणाचा प्रश्र्ण सोडवू नये, कविता पुन्हा पुन्हा वाचण्यात जी मजा असते ती त्याने कमी होते, असे आपले माझे मत आहे)
पैजारबुवा,

प्राची अश्विनी's picture

20 Oct 2018 - 12:52 pm | प्राची अश्विनी

पटेश!;)

सुंदर कविता , अभ्याशेठचे सुंदर शब्दांत निरूपण आणि त्याबरोबर कवितेवर झालेले विवेचन , सारं काही सुंदर .. छान भट्टी जमून आलीय .. दुग्धशर्करा योग

पिशी अबोली's picture

23 Oct 2018 - 3:25 pm | पिशी अबोली

छान कविता. आवडली.

चिगो's picture

23 Oct 2018 - 4:43 pm | चिगो

भावपुर्ण कविता.. आवडली.

अवांतर : शिर्षक वाचूनच डोक्यात भीमराव पांचाळेंनी गायलेली 'तुझा तसाच गोडवा... असेलही, नसेलही'ही गझल झरायला लागली..

प्राची अश्विनी's picture

24 Oct 2018 - 6:28 am | प्राची अश्विनी

तुम्ही सांगितल्यामुळे एका सुंदर गझलेची ओळख झाली. धन्यवाद.

प्राची अश्विनी's picture

24 Oct 2018 - 6:27 am | प्राची अश्विनी

चिगो, पिशी अबोली, खिलजी, _/\_

नेत्रेश's picture

24 Oct 2018 - 11:35 am | नेत्रेश

आवडली!

नावातकायआहे's picture

24 Oct 2018 - 11:50 am | नावातकायआहे

कविता अतिशय आवडली!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

24 Oct 2018 - 5:35 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

अतिशय सुंदर