हा सागरी किनारा । रवि दूर लोटताना
हीरा राजा ची ही जोड़ी । थोडा भार सोसताना
पाणी अथांग मुक्त । पक्षी शोधी निवारा।
वाहे खटयाळ् वारा। हा सागरी किनारा
बघता सखे तुला मी। क्षण होती धूंद धूंद। मग मंद होइ वारा। हा सागरी किनारा। हा सागरी किनारा
रवि जाई सांज होइ ।भासे चंद्र कोंदणात। अन एक शुक्रतारा। हा सागरी किनारा
ऋतू सांजवेळी खुलला। मनि मोगराच फुलला । आकाशी नक्षत्र नजारा। हा सागरी किनारा
मन बावरे असे हे
स्वप्नात ही नजारे
ही कोणति नशा रे
हा कोणता किनारा
मन शोधता किनारा
व्हावे कधी मि तृप्त
मिटता तुज़्या कवेत
म्हणती जश्या लाटा
त्या सागरी किनारया
मृद्गन्ध मि तू थेंब
दवबिन्दु पावसाचे
धरणी करिसी चिंब
मन आनंद सैर नाचे
प्रतिक्रिया
25 Oct 2018 - 11:44 am | खिलजि
असाच एक किनारा होता
तोच वाहणारा वारा होता
मी शोधत होतो , पाठ दाखवून समुद्राला
पण तो पूर्वीचा हवाहवासा
आवडणारा चेहरा नव्हता
खास काही झालं नाही
खास काही केलं नाही
फक्त एक फुल दिलं , त्याच किनाऱ्यावर
बघितलं अन सोडून दिलं होतं सारं
त्याच वाहणाऱ्या वाऱ्यावर
दोन (००) वर कपाळात अश्याच बसून असतात
दोनाचे चार झाल्यावर