गज़ल
गजल म्हणजे डोळ्यांच्या
काजळातील रेघ!
जसे श्रावणात
बरसणारे मेघ!!!
गजल म्हणजे जुन्या
आठवणीतील धागा!
जशी कृष्णासाठी
आसुसलेली राधा!!!
गजल म्हणजे
पहिले प्रेम!
जसा गोऱ्या
गालावरील नाजूक थेंब!!!
गजल म्हणजे
श्रावणातील पाऊस!
जसे श्रावणातील पावसात
चिंब भिजलेले केस!!!
गजल म्हणजे
नक्षत्र स्वाती!
जसा त्या नक्षत्रात
तयार झालेला सुंदर मोती!!!
गजल म्हणजे ओंजळीतील
हिरवंगार पान!
जशी मल्हार रागातील
घेतलेली सुंदर तान!!!
गजल म्हणजे
राग मेघमल्हार!
जसा कोणासाठी तरी
केलेला साजशृंगार!!!
~ योगेश पुराणिक
प्रतिक्रिया
26 Oct 2018 - 11:19 pm | MipaPremiYogesh
कृपया चांगले वाईट कसेही अभिप्राय असल्यास द्या. मिपा वर पहिली कविता आहे.
27 Oct 2018 - 9:34 am | प्राची अश्विनी
सुरेख!
27 Oct 2018 - 10:47 am | अभ्या..
काजळातील रेघ नव्हे तर काजळाची रेघ असे बरें वाटेल.
बाकी उपमा परिचित.
27 Oct 2018 - 1:55 pm | मदनबाण
सुरेख...
गजल म्हणजे
पहिले प्रेम!
जसा गोऱ्या
गालावरील नाजूक थेंब!!!
लयं भारी !!!
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- इस हाथ ले उस दे दे ये हे प्यार का हे दस्तुर... :- PYAR KA RANG - Raageshwari
1 Nov 2018 - 1:58 pm | MipaPremiYogesh
Dhanywad Prachi, Abhya and Madanban. Abhya - Suchana avadali