छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२०

हि सर पावसाची पुन्हा आज आली.

Primary tabs

AjayRGodse's picture
AjayRGodse in जे न देखे रवी...
19 Oct 2018 - 12:53 pm

हि सर पावसाची पुन्हा आज आली

हि सर पावसाची पुन्हा आज आली
पुन्हा आसवांची मोकळी वाट झाली
मन व्याकुळ होते, पुन्हा चिंब न्हाते,
क्षितिजावरी का तुला ते पहाते ?
पुन्हा पावसाशी तुझी बात झाली.

हि सर पावसाची, हि ओढ तुला भेटण्याची.

हि सर पावसाची पुन्हा आज आली
तुझ्या आठवाणी पुन्हा जाग आली
मन बेभान होते, तुझे गीत गाते.
का मिलनाची तुला साद देते ?
तुला भेटण्याची का मना आस झाली ?

हि सर पावसाची, हि ओढ फक्त मिलनाची.

हि सर पावसाची पुन्हा आज आली.
तुझ्या अंतरीचे गुज सांगून गेली.
मन बेधुंद होते, विरहात झुरते.
स्वप्नी तुझ्या का हळुवार बुडते?
निसटून गेली पुन्हा रात्र ओली.

हि सर पावसाची, हि ओढ तुझ्या मिठीची.

अजय गोडसे (राधेय)
9890206565

प्रेम कविताकविताप्रेमकाव्य