कविता

स्वप्नांची गोष्ट (गझल)

कहर's picture
कहर in जे न देखे रवी...
28 Jan 2019 - 5:28 pm

कुठे होते नशा आता पिल्यावर भांग स्वप्नांची
किती पेलायची ओझी शिरी अथांग स्वप्नांची

क्षणासाठीही नव्हती ती नजर नजरेस भिडलेली
रात्रभर संपली नाही पुढे ती रांग स्वप्नांची

किती हा घाम गाळावा किती हे रक्त आटवावे
इथे भरतात का पोटे कधी तू सांग स्वप्नांची

गावची वेसही साधी कधी ना लांघली ज्याने
कशी पोहचे नभाच्या पार त्याची ढांग स्वप्नांची

किती ओसाडला तो पार जेथे तोडले नाते
हसूनी त्याच वृक्षावर शवे मग टांग स्वप्नांची

भरवश्यावर कुणी मारू नये पोकळ बढाया
बसता लाथ बघ जाहलीच पांगापांग स्वप्नांची

gazalकविता माझीमराठी गझलकवितागझल

तुझ्या कवितेची ओळ

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जे न देखे रवी...
21 Jan 2019 - 11:47 am

तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
जिंदगीच्या निवडुंगा
इवलेसे फूल येते

तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
कालियाच्या डोहातून
कृष्णधून उमटते

तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
पाखराच्या लकेरीने
हिर्वी वेल थर्थरते

कवितेची ओळ तुझ्या
पुन्हा पुन्हा ओठी येते
पुन्हा पुन्हा रुजूनिया
पुन्हा पुन्हा उगवते

मुक्त कविताकविता

भाऊ बहिण नाते

mukund sarnaik's picture
mukund sarnaik in जे न देखे रवी...
19 Jan 2019 - 11:36 pm

बहिण भावाचं नातं भांडणारं तर कधी रुसणारं।
सुखदुःखांमध्ये एकमेकांना साथ देणारं।।
बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन।
याच नात्याला जिवापाड जपणारं हळवं असतं मन।।
भांडण, रुसवेफुगवे तितकीच असते माया।
भाऊ - बहिणीच्या नात्यांमध्ये नेहमी दिसतो गोडवा।।
ताई असते दुसरे आईचेच रुप।
भावाला देते ती मायेची ऊब।।
राखी बांधून भावाला बहिण नातं घट्ट करते।
बहिण-भावाच्या नात्याची ती हळुवार जपणूक करते।।
भावाच्या आनंदात स्वतःचा आनंद मानते।
त्यात तीला कुठल्याचं गोष्टीची अपेक्षा नसते।।
असे निरागस नाते बहिणभावाचे।

कविता

देव्हारा

कहर's picture
कहर in जे न देखे रवी...
19 Jan 2019 - 8:58 am

तिचा सुगंधही उडवून नेई तिच्यासवे वारा
पहा निघे ती घरातून अत्तर तरी फवारा

वाट पाहिली शकुनांची मी तिच्या उत्तरासाठी
नाही म्हणता तिने खळकन तुटला ना तारा

उभा ठाकला जगापुढे लेखणी धरून हाती
पण शाईच्या किमतीपायी हरला बेचारा

पटविण्याचा प्रश्न गहन पोरास पाटलाच्या
आजकालच्या मुली मागती आधीच सातबारा

इतके झाले घट्ट आता या दुःखाशी नाते
सुख बहुधा पाहून दुरूनच करते पोबारा

पूजतात जिथे आईवडिलांना दैवताप्रमाणे
घरी अशा प्रत्येक कोपरा असतो देव्हारा

gajhalgazalकवितागझल

तुझी कविता

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
18 Jan 2019 - 7:55 am

तुझ्यापाशी जन्मलेली माझी
हट्टी, खोडकर, अल्लड
कविता
तू डोळ्यांत सांभाळून
घेऊन ये....

येता येता वाट चुकली
तर मला जागं कर...पण
मी माझ्याच तंद्रीत असेन
तर
माझ्या कवितेला वाट विचार....

अदभूतकविता माझीप्रेम कविताभावकवितामाझी कवितामुक्त कवितामांडणीवावरवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाज

अनामिक

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जे न देखे रवी...
18 Jan 2019 - 12:48 am

खरी कविता कधी येते माहितीये का?
जेव्हा ती आतून हाक मारते ना! तेंव्हा!!!
तीच तिची खरी-यायची वेळ..

तिला मग यमकांची, छंदांची, वृत्तांची, कसलीच गरज उरत नाही..

खरोखर अनावृत्त होऊन छंदमुक्तीचा
खरा ध्यास घेऊनच धावत येते ती! .

वेदना जागायची, स्वतःहुन चालत बोलत घडत धडपडत बाहेर यायची खरी वेळ..

काहीही सुचायची, सांगायची, बोध शिकवायची, ओझी डोक्यावर न घेता ती सताड उमटते बाहेर! जशी आत आहे तशीच!!!

हीच तिची खरी सुरवात मानायची का हो!???
असेल, असेल कदाचित..आणि असू दे ..असली तरीही!

कविता माझीकविता

ढग

सागरलहरी's picture
सागरलहरी in जे न देखे रवी...
17 Jan 2019 - 10:03 pm

तोच पाऊस जुनासा
गंध हळवा नवासा
भिजू भिजू पदराला
मखमल स्पर्श हवासा

स्पर्श रुते खोल
पापण्याशी ओल
पुन्हा ऊन पदराला
अन एक उसासा

उसासलेलं हसू
मोरपंखी दिसू
काळा करंद ढग
डोळा ये जरासा

सागरलहरी

कविता

स्वात्रंतवीर

mukund sarnaik's picture
mukund sarnaik in जे न देखे रवी...
17 Jan 2019 - 12:08 pm

लाल,बाळ,पाल,बोस आणि गांधी।
देशासाठी लढले हे स्वातंत्रसेनानी।।
पहिला हुतात्मा ठरला मंगल पांडे।
त्याने आपले जीवन देशासाठी पणाला लावले।।
स्वा. सावरकर इंग्रजांना भारी पडले।।
शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मातृभूमीचाच ध्यास मनी घेऊन जगले।।
तरुणांना ऊर्जा देणारे एक नेतृत्व वासुदेव बळवंत फडके।
देशासाठी प्राण पणाला लावून अमर झाले।।
राजगुरू सुखदेव भगतसिंग एकजुटीने लढले।
मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी एकत्रच फासावर गेले।।
इंग्रज अधिकार्‍याचा खून चाफेकर बंधूंनी केला।
त्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाचा विचारही नाही केला।।

कविता

श्रावण...

bhagwatblog's picture
bhagwatblog in जे न देखे रवी...
14 Jan 2019 - 3:29 pm

सुप्रसन्न वारा आणि धरणीचा सुवास
प्रफुल्लित मन अन सुखाचा सहवास

हिरवागार सडा शिंपडला भुईवरी
नक्षत्राचे चांदणे अंथरले नभावरी

उडणारे तुषार अन मंजुळ कोकिळ स्वर
पक्षाचा आराव अन मन स्वार ढगावर

हळवा श्रावण, महिन्याचा राजा श्रावण
अनंत निसर्गाची रूपे दाखवतो श्रावण

कणा-कणातील संगीताने मेघ व्यापले
प्रकृतीच्या काव्याने मन तृप्त झाले

निसर्गाच्या किमयेने मन गंधाळले
सर्वांना वसुंधरेच्या रूपाने वेडावले

festivalsकविता

किंचित अस्वस्थ वाटते आहे !

संदीप-लेले's picture
संदीप-लेले in जे न देखे रवी...
6 Jan 2019 - 12:30 am

उत्स्फूर्तपणे की कोणी घडवून आणते आहे?
याच विचारांनी किंचित अस्वस्थ वाटते आहे !

उगम असो काहीही घटत्या तीव्रधार घटनांचा
वाहवत रहावे की कोरे? कूट ग्रासते आहे

समर्थन विचारांना वा तीव्र निषेध असू शकतो
समाज माध्यम त्यास्तव का वेठीस जुंपते आहे?

होवो थोडा वा जबरदस्त परिणाम प्रतिक्रियांचा
खारीचा वाटा देता, मन का सुखावते आहे?

काय महत्वाचे, कशास प्राधान्य योग्य द्यावे?
राष्ट्राचे व नागरिकांचे निधान कोणते आहे?

इतके सारे पडले का हो प्रश्न मूढ कोणा? अन्
उत्तर त्यांना का उलटे माझ्याहून मिळते आहे?

कवितासमाज