तुझी कविता

शिव कन्या's picture
शिव कन्या in जे न देखे रवी...
18 Jan 2019 - 7:55 am

तुझ्यापाशी जन्मलेली माझी
हट्टी, खोडकर, अल्लड
कविता
तू डोळ्यांत सांभाळून
घेऊन ये....

येता येता वाट चुकली
तर मला जागं कर...पण
मी माझ्याच तंद्रीत असेन
तर
माझ्या कवितेला वाट विचार....

ती आधी मस्करी करेल,
तुला चकवा घालेल,
घनघोर गप्पा मारेल,
निळावंती होऊन,
वाटेवरले झाडमाड प्राणीपक्षी दाखवेल,
लपूछपू म्हणत पाठीत गुद्दे घालेल,
मिठीत शिरता शिरता एकदम
वारा होऊन
तुझ्या गळ्यात पडेल,
शेवटी थकून
तुझ्या दुमडलेल्या हातावर
निर्धास्त झोपी जाईल,
तेव्हा तू तिला परत डोळ्यांत साठव....

अशी थकून झोपलेली,
झोपेतही तुझ्याच डोळ्यांत राहणारी
माझी कविता सांभाळून
घेऊन ये....
मी असेनच कवितेच्या आसपास.

-शिवकन्या

अदभूतकविता माझीप्रेम कविताभावकवितामाझी कवितामुक्त कवितामांडणीवावरवाङ्मयकविताप्रेमकाव्यसाहित्यिकसमाज

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

18 Jan 2019 - 10:14 am | यशोधरा

किती सुरेख :)

ज्ञानोबाचे पैजार's picture

18 Jan 2019 - 10:55 am | ज्ञानोबाचे पैजार

आवडली,
पैजारबुवा,

अत्रुप्त आत्मा's picture

18 Jan 2019 - 1:03 pm | अत्रुप्त आत्मा

व्वाह! लाजवाब!

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

18 Jan 2019 - 9:35 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

सुरेख

दिपक's picture

19 Jan 2019 - 5:22 pm | दिपक

सुंदर !!

नाखु's picture

22 Jan 2019 - 11:03 am | नाखु

कविता.

भटक्य आणि उनाड's picture

23 Jan 2019 - 2:06 pm | भटक्य आणि उनाड

झक्कास बुवा....

शिव कन्या's picture

16 Feb 2019 - 1:12 am | शिव कन्या

सर्व रसिक वाचकांचे आभार.