लाल,बाळ,पाल,बोस आणि गांधी।
देशासाठी लढले हे स्वातंत्रसेनानी।।
पहिला हुतात्मा ठरला मंगल पांडे।
त्याने आपले जीवन देशासाठी पणाला लावले।।
स्वा. सावरकर इंग्रजांना भारी पडले।।
शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या मातृभूमीचाच ध्यास मनी घेऊन जगले।।
तरुणांना ऊर्जा देणारे एक नेतृत्व वासुदेव बळवंत फडके।
देशासाठी प्राण पणाला लावून अमर झाले।।
राजगुरू सुखदेव भगतसिंग एकजुटीने लढले।
मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी एकत्रच फासावर गेले।।
इंग्रज अधिकार्याचा खून चाफेकर बंधूंनी केला।
त्यासाठी त्यांनी स्वतःच्या जीवाचा विचारही नाही केला।।
पाठीला बाळ बांधून लढली देशासाठी ती झाशीची राणी।
ती ठरली सर्वांसाठी आदर्श रणरागिणी।।
असे सर्व जण देशासाठी आपल्या जीवाची बाजी लावून लढले।
त्यामुळेच आज मातृभूमीला स्वातंत्र्य मिळाले।।
आजही देशाच्या सिमेवर लढणारे सैनिक आपले जीव पणाला लावतात।
देशवासीय सुखी रहावेत यासाठी ते मरणाला सामोरे जातात।।
या सर्वांनी आपले आयुष्य देशसेवेसाठी पणाला लावले।
स्वातंत्र्याचा एकच ध्यास मनी ठेवला।।
अशा या स्वातंत्र्यदिनी त्यांनी दिलेले बलिदान आठवले।
नकळत डोळ्यातून अश्रू निघाले।।
प्रतिक्रिया
17 Jan 2019 - 1:32 pm | mrcoolguynice
वाह मोदीजी वाह !
17 Jan 2019 - 6:48 pm | mukund sarnaik
धन्यवाद
17 Jan 2019 - 1:59 pm | प्रसाद_१९८२
फक्त ते शिर्षक "स्वातंत्र्यवीर" असे करा.
17 Jan 2019 - 1:59 pm | विजुभाऊ
स्वात्रंतविर
या शब्दाचा अर्थ काय ?
कोणत्या भाषेतला आहे?