बहिण भावाचं नातं भांडणारं तर कधी रुसणारं।
सुखदुःखांमध्ये एकमेकांना साथ देणारं।।
बहिण भावाच्या पवित्र नात्याचा सण रक्षाबंधन।
याच नात्याला जिवापाड जपणारं हळवं असतं मन।।
भांडण, रुसवेफुगवे तितकीच असते माया।
भाऊ - बहिणीच्या नात्यांमध्ये नेहमी दिसतो गोडवा।।
ताई असते दुसरे आईचेच रुप।
भावाला देते ती मायेची ऊब।।
राखी बांधून भावाला बहिण नातं घट्ट करते।
बहिण-भावाच्या नात्याची ती हळुवार जपणूक करते।।
भावाच्या आनंदात स्वतःचा आनंद मानते।
त्यात तीला कुठल्याचं गोष्टीची अपेक्षा नसते।।
असे निरागस नाते बहिणभावाचे।
मायेच्या हिंदोळ्यावर ते सदा फुलतं रहावे।।
प्रतिक्रिया
20 Jan 2019 - 5:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
क्या बात है....!
-दिलीप बिरुटे
(एक हळवा निरागस भाऊ)