तुझ्या कवितेची ओळ
तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
जिंदगीच्या निवडुंगा
इवलेसे फूल येते
तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
कालियाच्या डोहातून
कृष्णधून उमटते
तुझ्या कवितेची ओळ
अवचित ओठी येते
पाखराच्या लकेरीने
हिर्वी वेल थर्थरते
कवितेची ओळ तुझ्या
पुन्हा पुन्हा ओठी येते
पुन्हा पुन्हा रुजूनिया
पुन्हा पुन्हा उगवते
छान आहे पण मीठ कमी पडलंय
चुकून "छान आहे पण पीठ कमी
मस्त...
_____/\_____
पैजारबुवांची फ्याक्टरी खतरी
खिखिखि
तुझ्या कवितेची ओळ
कालियाच्या डोहातून
कालियाच्या डोहातून कृष्णधून उमटतेसुरेख.सुंदर कविता !
प्रतिसाद
कविता लई आवडली.
मूळ कविता आवडली आहे