चढणं म्हणजे काय असते रे भौ ( एक अशीच केलेली "श श क कविता" )

खिलजि's picture
खिलजि in जे न देखे रवी...
12 Mar 2019 - 6:45 pm

चढणं म्हणजे काय असते रे भौ

लेका , चढणं मंजी ईचारांशी लढणं असतं रे भौ

लढणं मंजी काय असतं रे भौ

लेका लढणं मंजी आतल्याआत कुढणं असतं रे भौ

आतल्याआत कुढणं , मंजी काय असते रे भौ

लेका , त्ये मंजी सवताच्या नजरेतन पडणं असते रे भौ

नजरेतन पडणं म्हणजे काय असते रे भौ

लेका, नजरेतन पडणं म्हणजे मनाविरुद्ध उडणं असते रे भौ

मनाविरुद्ध उडणं म्हणजे काय असते रे भौ

मनाविरुद्ध उडणं , मंजी टुल्ली गहाण ठेवणं असतं भौ

टुल्ली गहाण ठेवणं मंजी काय रे भौ

आरं लेका, त्येच तर बोलून ऱ्हायलोय

टुल्ली गहाण ठेवणं म्हणजेच चढणं असते रे भौ

:(((((((((( सिद्धेश्वर विलास पाटणकर )))))))))):

इतिहासकविता

प्रतिक्रिया

दुर्गविहारी's picture

12 Mar 2019 - 6:50 pm | दुर्गविहारी

धन्य !!! ;-)

टवाळ कार्टा's picture

12 Mar 2019 - 8:03 pm | टवाळ कार्टा

याचे एक "तसले" विडंबन होऊ शकेल ;)

चित्रगुप्त's picture

12 Mar 2019 - 9:21 pm | चित्रगुप्त

लई भारी 'वर्तुळ कविता'
माझ्या पाच वर्षांच्या नातवाला ही कविता वाचून दाखवल्यावर त्याला यातला फक्त एकच "टुल्ली" हा शब्द कळला, आणि तो हसून हसून गडबडा लोळू लागला. पाच वर्षाच्या पोरालाही भावणारी प्रभावशाली कविता इथे डागल्याबद्दल शतशः आभार आणि अभिनंदन.

ज्ञानोबाचे पैजार's picture

13 Mar 2019 - 9:11 am | ज्ञानोबाचे पैजार

शिर्षक वाचून जरा घाबरत घाबरत उघडली आणि "चढणं मंजी ईचारांशी लढणं"
हे वाचल्यावर आम्ही सपशेल वारलो,
पैजारबुवा,

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2019 - 7:18 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आयुष्य म्हणजे नुसते, चढ उतर, सॉरी उतार. ऊन पाऊस, सुख आणि दु:ख.
अशा आस्वादाच्या पातळीला गेलो की कवितेचा अर्थ उलगडत जातो. ;)

वरील विधानाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर डोळ्यासमोर एक चिन्ह आणा.
उदाहरणार्थ - ( वजाबाकी) चिन्ह जेव्हा मेंदूवर उमटते तेव्हा ते नुसते चिन्ह नसते
त्याबरोबर एक पुढील क्रियाही स्पष्ट होते किंवा त्याचा अर्थ लक्षात येतो.
त्याचा जो निश्चित अर्थ आहे तो बदलत नाही.

इथे मात्र दुसर्‍या ओळीने 'इचारांशी लढणे'
हे वाचून तुम्ही नीट उताराला लागता.

शाश्वत कलेचा शोध आणि आनंद घ्यायचा असेल तर अभ्यास आणि आनंदासाठी
अशा कविता आवश्यक असतात. असे वाटते.

- दिलीप बिरुटे
(काम चलाऊ समीक्षक) :)

खिलजि's picture

13 Mar 2019 - 4:38 pm | खिलजि

सर्व अभिप्राय आवडले . धन्यवाद

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Mar 2019 - 6:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चढणं म्हणजे काय असते रे भौ

लेका , चढणं मंजी ईचारांशी लढणं असतं रे भौ

खुलाशाबद्दल आभारी आहे.

-दिलीप बिरुटे

सर , आपण इथे आपले मत मांडले तेही विस्तृतपणे , त्याबद्दल खूप खूप आभार ..

चौथा कोनाडा's picture

17 Mar 2019 - 11:52 pm | चौथा कोनाडा

चढणं म्हणजे काय असते रे भौ,
एक अशीच
"श श क कविता"
पोस्टवून पिडणं असते रे भौ !

(कृ ह घे)

घेतले .. चान चान अभिप्राय आले कि हलकेच घेतो साहेब..

शब्दानुज's picture

18 Mar 2019 - 7:54 pm | शब्दानुज

आता उतरणं म्हणजे काय हेही सांगून टाका.