मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

चढणं म्हणजे काय असते रे भौ ( एक अशीच केलेली "श श क कविता" )

खिलजि · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
चढणं म्हणजे काय असते रे भौ लेका , चढणं मंजी ईचारांशी लढणं असतं रे भौ लढणं मंजी काय असतं रे भौ लेका लढणं मंजी आतल्याआत कुढणं असतं रे भौ आतल्याआत कुढणं , मंजी काय असते रे भौ लेका , त्ये मंजी सवताच्या नजरेतन पडणं असते रे भौ नजरेतन पडणं म्हणजे काय असते रे भौ लेका, नजरेतन पडणं म्हणजे मनाविरुद्ध उडणं असते रे भौ मनाविरुद्ध उडणं म्हणजे काय असते रे भौ मनाविरुद्ध उडणं , मंजी टुल्ली गहाण ठेवणं असतं भौ टुल्ली गहाण ठेवणं मंजी काय रे भौ आरं लेका, त्येच तर बोलून ऱ्हायलोय टुल्ली गहाण ठेवणं म्हणजेच चढणं असते रे भौ :(((((((((( सिद्धेश्वर विलास पाटणकर )))))))))):

वाचने 4376 वाचनखूण प्रतिक्रिया 11

चित्रगुप्त Tue, 03/12/2019 - 21:21
लई भारी 'वर्तुळ कविता' माझ्या पाच वर्षांच्या नातवाला ही कविता वाचून दाखवल्यावर त्याला यातला फक्त एकच "टुल्ली" हा शब्द कळला, आणि तो हसून हसून गडबडा लोळू लागला. पाच वर्षाच्या पोरालाही भावणारी प्रभावशाली कविता इथे डागल्याबद्दल शतशः आभार आणि अभिनंदन.

In reply to by ज्ञानोबाचे पैजार

आयुष्य म्हणजे नुसते, चढ उतर, सॉरी उतार. ऊन पाऊस, सुख आणि दु:ख. अशा आस्वादाच्या पातळीला गेलो की कवितेचा अर्थ उलगडत जातो. ;) वरील विधानाचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर डोळ्यासमोर एक चिन्ह आणा. उदाहरणार्थ - ( वजाबाकी) चिन्ह जेव्हा मेंदूवर उमटते तेव्हा ते नुसते चिन्ह नसते त्याबरोबर एक पुढील क्रियाही स्पष्ट होते किंवा त्याचा अर्थ लक्षात येतो. त्याचा जो निश्चित अर्थ आहे तो बदलत नाही. इथे मात्र दुसर्‍या ओळीने 'इचारांशी लढणे' हे वाचून तुम्ही नीट उताराला लागता. शाश्वत कलेचा शोध आणि आनंद घ्यायचा असेल तर अभ्यास आणि आनंदासाठी अशा कविता आवश्यक असतात. असे वाटते. - दिलीप बिरुटे (काम चलाऊ समीक्षक) :)