हे विठ्ठला माझे मस्तक तुझ्या चरणी झुकू दे |
माझे बाबा माझ्या कन्यादानापर्यंत टिकू दे ||धृ||
त्यांच्याच आधाराने झाले लहानाची मोठी |
खंबीरपणे उभे राहिले सतत माझ्या पाठी ||
त्यांचच बोट धरुन मी चालायला ही सिकाले |
म्हणूनच तर आतापर्यंत कधिच नाही थकले ||
हे विठ्ठला त्यांच शेत मोत्यावानी पिकू दे |
माझे बाबा माझ्या कन्यादानापर्यंत टिकू दे ||1||
जुनी पुरानी कपडे त्यांनी शिवून शिवून घातली |
माझ्यासाठी प्रत्येक वेळेस नविन फ्रॉक घेतली ||
एकच जोडी चपल ते सांधुन सांधून घालायचे |
माझ्यासाठी पायघड्या ते काट्यांवरून चालायचे ||
त्यांच्याकडुन मला पण काही तरी शिकु दे |
माझे बाबा माझ्या कन्यादानापर्यंत टिकू दे ||2||
शेतक-याची मुलगी आहे मी अभिमानाने सांगते |
मिडियावरच्या बातम्या ऐकून उगीच भिती जागते ||
तसल काही करणार नाही अशी त्यांना शक्ती दे |
त्यांचीच चरण सेवा घडो अशी मला भक्ती दे ||
त्यांच्याच पायावरती मला माझे डोके टेकू दे |
माझे बाबा माझ्या कन्यादानापर्यंत टिकू दे ||3||
बी.डी.वायळ
प्रतिक्रिया
15 Mar 2019 - 12:01 pm | प्रभाकर पेठकर
कविता, त्या मागील भावना मनाला भिडणारी आहे.
दुर्दैवाने, माझे बाबा माझ्या कन्यादानापर्यंत टिकू दे हे वडीलांचे आयुष्य मर्यादीत करणारे वाक्य खटकले. थोडे स्वार्थी वाटले.
15 Mar 2019 - 12:05 pm | प्रभाकर पेठकर
एक सुचवणी....
हे विठ्ठला माझे मस्तक तुझ्या चरणी झुकू दे |
माझ्या बाबांना माझ्यासाठी दीर्घायुष्य लाभू दे ।
16 Mar 2019 - 2:33 pm | ज्ञानोबाचे पैजार
नंतर बाप राहिला काय किंवा चचला काय काही फरक पडत नाही.
उलट त्याने फास लावून घेतला तर मिळणारी सरकारी मदत पदरात पाडून घेता येईल
पैजारबुवा,