क्लीओपात्राच्या सौंदर्याला
सीझरच्या नश्वरतेचा शाप
या भुताटकीच्या जगात
सगळेच हॅम्लेटचे बाप
*
व्हेनीसचे व्यापारी सारे
मासाचे भुकेले
रोमीयोचे शहाणपण
उगाळुन प्यायलेले
*
म्हणुन म्हणतो पोरी
बरे असते स्व:ताला जपलेले
ईथे सगळे वंशज सेक्सपीयरचे
तारुण्याला हपापलेले...........
प्रतिक्रिया
8 Mar 2019 - 1:56 pm | धर्मराजमुटके
व्वा ! व्वा ! लागून रहा !
23 Mar 2019 - 11:08 am | स्वलिखित
हॅम्लेट काय , शेक्सपियर काय
वा !! वा !!