शतशब्दकथा स्पर्धा २०१७ : मतदान
नमस्कार मिपाकरहो,
'शतशब्दकथा' या मिपाच्या आगळ्यावेगळ्या संकल्पनेवर आधारित स्पर्धेचं हे दुसरं वर्ष. पहिल्या वर्षी शतशब्दकथा स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक उत्कृष्ट कथा या निमित्ताने मिपावर वाचायला मिळाल्या. दुसर्या वर्षी या स्पर्धेला थोडीशी कलाटणी द्यावी म्हणून चित्रावरून शतशब्दकथा लिहायची स्पर्धा मिपावर आयोजित केली आणि त्यालाही अतिशय उत्साहवर्धक प्रतिसाद तुम्ही सगळ्यांनी दिलात, त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद.