गौतमीपुत्र सातकर्णी.
चित्रपटाचा ट्रेलर समिक्षा.
दुसर्या शतकात होऊन गेलेल्या सातवाहन राजघराणातल्या गौतमीपुत्र सातकर्णी ह्याच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक-काल्पनिक घटनांचा समावेश असलेला चित्रपट येत आहे. गौतमीपुत्र सातकर्णी म्हटल्यावर मला सर्वात आधी प्रचेतसभौ उर्फ वल्लीदा यांची आठवण झाली. केवळ त्यांच्यासाठी म्हणून हा धागा काढत आहे.
ट्रेलरमधे दिसत असलेल्या कथानक, वेशभूषा, शस्त्रास्त्रे, वास्तुकला, ऐतिहासिक खुणा यांचा उहापोह करुयात.
ट्रेलर आवडला. पहिल्या चाळीस सेकंदापर्यंत हा चित्रपट श्रीदेवीच्या पुली नामक भंगारपटाच्या लायकीचा वाटला. पण पुढे जरा लक्ष वेधून घेणारे प्रसंग दिसले. अगदी बाहुबलीच्या तोडीसतोड नसला तरी बर्यापैकी वाटतो. आपल्या आवडत्या राजा सातकर्णी वर असल्याने विषय आवडला, थेटरातच बघितला जाईल. तेलूगू भाषा आवडते.
बालय्या तेलुगूत फेमस असला तरी मला कास्टींग रुचली नाही.
प्रतिसादांत पुढे जमेल तसं लिहितो. तुम्हीही लिहा.
प्रतिक्रिया
12 Jan 2017 - 8:42 pm | अनुप ढेरे
हर हर महादेव ही घोषणा या राजाचीच होती ना?
12 Jan 2017 - 9:03 pm | एस
उत्सुकता आहे.
12 Jan 2017 - 11:30 pm | प्रचेतस
धन्स संदीप :)
ट्रेलर आताच पाहिला, वेशभूषा, वास्तुकला, ऐतिहासिक खुणा ह्या बाबतीत ट्रेलरने निराशा झाली.
भरगोस मिशा असलेला गौतमीपुत्र पाहून हहपुवा झाली. वास्तविक दृष्टीने पाहता गौतमीपुत्राच्या अस्सल नाण्यांत तो मिशाविहीन आहे. हेमामालिनी बहुतेक गौतमी बलश्री दिसतेय.
पुराणांनी सातवाहनांना आंध्रभृत्य ठरवले होते आणि बहुधा हेच तेलगू निर्मात्यांनी विचारात घेतले असावे. गौतमीपुत्राचे सर्वोत्तम पराक्रम हे महाराष्ट्रातले आहेत. ह्या अंगाने ह्यात काही दिसत नाही.
तरीही पिक्चर मात्र बघणार, पिक्चर बरा वाईट कसाही असला तरी ह्या निमित्ताने गौतमीपुत्राची अल्पशी माहिती तरी इतरांना होईल.
13 Jan 2017 - 1:48 am | रेवती
हा सिनेमा येतोय हे तुमच्याकडून समजले असले तरी पाहणार नाही. अम्मा मालिनीला काम जमले आहे असे ट्रेलरमध्ये तरी दिसत नाही. तिच्या मी पाहिलेल्या दोन तीन शिनेमात तिने कधीही अॅक्टींग केली नाहीये. एका प्रसंगात तर वाणी कपूर टाईप नटी दिसलिये. का कोणास ठाऊक पण वाणी कपूर ही शहरी भूमिकांमध्येच बरी वाटते. तिचा मी एकच शिनेमा पाह्यलाय. आधीच ठरवले आहे की या फिल्मच्या वाटेला जायचे नाही. तुम्ही पाहून कळवा.
13 Jan 2017 - 11:57 am | सतिश गावडे
सच्चं भण गोदावरी,
पुव्वसमुद्देण सहिआसंती ।
सालाहण कुलसरिसं,
जइ ते कुले कुलं अत्थि ॥
एक माणुस आता चक्क तेलुगू सिनेमा पाहणार ;)
13 Jan 2017 - 5:40 pm | किसन शिंदे
सातकर्णी आहे म्हटल्यांवर तो कुठेही जाईल. =))
13 Jan 2017 - 12:04 pm | गौतमीपुत्र सातकर्णी
छान.
एकदाची दखल घेतली गेली तर
14 Jan 2017 - 10:46 am | पैसा
टिप्पिकल सौधिंडियन शिणुमा दिसतोय! पण आपल्याला असले पातालभैरवी टैप पोशाखी सिनेमे लै आवडतात. सातवाहनाच्या माहीत असलेल्या इतिहासाची अगदीच काशी केली नसली म्हणजे पुरे! मला एक कळत नाही हे लोक मसाला सिनेमे तयार करण्यासाठी असली ऐतिहासिक नावे कशाला घेतात? सरळ पातालभैरवी किंवा चंद्रकांताच काढायचा की!
14 Jan 2017 - 11:38 pm | पद्मावति
टिप्पिकल सौधिंडियन शिणुमा दिसतोय! पण आपल्याला असले पातालभैरवी टैप पोशाखी सिनेमे लै आवडतात.
सेम पिंच पैसा. पौराणिक तेलुगू सिनेमे मी खूप पाहयले आहेत. एक नंबर असतात =))आता हा चित्रपट नक्कीच बघणार.
20 Jan 2017 - 3:46 am | समर्पक
तेलुगू नाव शातकर्णी असं लिहिलंय, शतकर्ण पासून व्युत्पत्ती असावी का ? व मराठीतील शब्द अपभ्रंश असावा ?