कला

काळाचे गीत

चांदणे संदीप's picture
चांदणे संदीप in जे न देखे रवी...
9 May 2017 - 10:45 am

तूहि नव्हतीस, मीही नव्हतो
बघ काळ कसा बदलतो
तारे ते जे सदाच असती
आपल्या जागी नभात वरती
आज मोजण्या जागे कोणी
मनात अन् मोगरे माळूनि
फेऱ्या आपुल्या पाणवठ्याच्या
चर्चा साऱ्या गावकुसाच्या
कशी न कळली तू गेलेली
नियती अशी उलटलेली
पुन्हा भेटलीस का वळणावर?
घेऊन कुंकू परके, भांगावर
उभय उरातहि ते काही
आधीसारखे हलले नाही
        तूहि नव्हतीस मीही नव्हतो
        पुरते आपण अनोळखी होतो
        तू आहेस अन आज मीही
        समोरासमोर अगदी, तरीही
        त्याच्या हाती सर्व आहे

प्रेम कवितामाझी कविताकरुणकलाकविताप्रेमकाव्यसाहित्यिक

स्वप्नांचे कवडसे

शिवोऽहम्'s picture
शिवोऽहम् in जे न देखे रवी...
29 Apr 2017 - 3:56 am

लँग्स्टन ह्यु या अमेरिकन कवीची ही एक कविता फार आवडली, तिचा अनुवाद करण्याचा प्रयत्न.

प‌ंखांसार‌खे हात‌ प‌स‌रून‌
स्व‌च्छ‌ उन्हात‌ नाह‌त‌
स्व‌त:भोव‌ती गिर‌क्या घेत‌ र‌हाव‌ं, नाचाव‌ं
सूर्य‌ माव‌ळेस्तोव‌र‌..
आणि म‌ग‌ खुशाल‌ प‌हुडाव‌ं गार‌ वार‌ं अंगाव‌र‌ घेत‌
उंच, डेरेदार‌ वृक्षाच्या छायेत‌ स‌ंध्याकाळी
आणि रात्र‌ अल‌ग‌द‌ उत‌रावी
काळीसाव‌ळी, माझ्यासार‌खी.
अस‌ं माझ‌ं स्व‌प्न‌ आहे..

कला

बौद्धिक संपदा हक्क दिवस २०१७

खेडूत's picture
खेडूत in जनातलं, मनातलं
26 Apr 2017 - 2:14 pm

h

.
.
(प्रासंगिक)

सोशल मिडीया आपल्या बोटावर नाचायला लागल्यापासून चांगलं काय झालं याचं मोजमाप प्रत्येकाचं वेगळं असेल. सोय आणि मनोरंजनाचे साधन म्हणून ते आवश्यक झालेय. पण दुष्परिणामही कमीअधिक प्रमाणात अनुभवायला मिळत आहेत.

धोरणमांडणीसंस्कृतीकलाजीवनमानतंत्रप्रकटनविचारप्रतिसादशिफारसमाहितीप्रतिभा

काही प्रश्न - रामदास यांना

अश्फाक's picture
अश्फाक in जनातलं, मनातलं
6 Apr 2017 - 8:46 pm

1)वीरकरने दमण एअरपोर्ट वरुन जोशीला पकडून आणल का??
2)ह्यात जो तिसरा भिडु घुसला तो पिल्लेच का?? कि मुल्ला??
3) माधुरीने गेम केला की विनीताने पिल्लै सोबत मिळून ?
4) 50 लाखा चा चेक घ्यायला कोण आला होता ?
5) मेहता आनी संदीप बहल चे सेटिन्ग आहे का ?

कृपया पिसिजेसि चा शेवटचा भाग लिहून मिपकरांना उपकृत करावे ही विनंती .
लोभ असावा .

कलाkathaa

छापू का?

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
6 Apr 2017 - 6:47 pm

नमस्कार मंडळी,
सुमारे वर्षभरापूर्वी मी खास मिपाकरांसाठी काही टिशर्टचे डिझाईन्स बनवले होते. त्याला प्रतिसाद तर मिळाला होताच पण आता चित्रांपेक्षा काही स्पेशल पंचलाईन्सची वेळ आहे. आपले मिपा अशा पंचलाईन्सचे खाणच जणू. मुद्दा हा की अशा पंचलाईन्स मस्त कॅलिग्राफीत करुन शर्टावर प्रिंटल्या तर काय चीज बनेल बावा...
बाकी सब है, शर्ट है, डिझायनर है, कॅलिग्राफर है...बस्स पंचेस अन आयड्या होना..
संजयजी, लीमाऊ, स्पावड्या, सूडक्या, मोदक्या, डांगे, आदूबाळासारखे बॉक्सर आणि मिपाकरांसारखे फायटर असताना पंच नाहीत म्हणजे काय?
अब आन दो भाई एकेक.
आता हेच बघा की अजरामर काही पंचेस.

कलाविरंगुळा

स्पेशल महापुरूष

परशु सोंडगे's picture
परशु सोंडगे in जे न देखे रवी...
4 Apr 2017 - 1:17 pm

आता आता कुठं
तुम्ही वाटून घेतले खुशाल महापुरूष
एका एका जातीचा एक एक
स्पशेल महापुरूष
मग अपोआपचं वाटले गेली
रंग, तळी, डोंगर नदया ,गाव
नि गल्ल्या बोळी,मोहल्ले
कॅलेडरवरल्या तारखासुध्दा
सोडल्या नाहीत.जातीच्या चिकट लगदाळीने
जो तो विणत गेला आपल्याच
जातीचं कोष
गुरफटत गेला त्या चिकाट लाळेत
माणूसजाती जातीच्या कशाल्याशा
गर्वानं फुगून
फुटू लागली सा-यांचीचं
छाताडं.
ते समतेचं गाणं
कसं काय गायचं बुवा
एक सुरात
एका तालात
परशुराम सोंडगे,पाटोदा

रौद्ररसकलाकविता

तमाशा

ज्ञानदेव पोळ's picture
ज्ञानदेव पोळ in जनातलं, मनातलं
3 Apr 2017 - 4:21 pm

चैत्र निघाला की गावागावात यात्रांचा हंगाम सुरू व्हायचा. खेड्यातील या यात्रांमध्ये तमाशा हेच मुख्य आकर्षण. संगीतबारीचा आणि ढोलकीफडाच्या तमाशांचे फड गावोगावी दिवस रात्र रंगू लागायचे. तमाशा खेड्याची लोककला, परंपरा आणि संस्कृती. पठ्ठे बापूराव, विठाबाई भाऊ नारायणगावकर, मालती इनामदार, काळू-बाळू, रघुवीर खेडकरसह कांताबाई सातारकर, मंगला बनसोडे, दत्ता महाडिक, माया तासगावकर अशी अनेक मंडळी या लोककलेचे शिलेदार. तर काही वारसदार.

कलालेख

मोहीम - २ फलक

अभ्या..'s picture
अभ्या.. in जनातलं, मनातलं
2 Apr 2017 - 6:40 pm

नमस्कार मंडळी,
मागच्या भागात आपण पॅम्प्लेटस इन्सर्शन ह्या जाहीरात मोहीमेचा एक भाग पाह्यला. जाहीरातीसाठी वापरला जाणारा आद्य प्रकार म्हणजे नाम फलक. ह्या फलकांचे विविध प्रकार आपण ह्या भागात जाणून घेऊ. विषयाची व्याप्ती बरीच असलेने सुरुवातीपासूनचे फलक ते विद्युत आकाश फलक (हो, अशा फलकांना परवानगी देणार्‍या विभागाचे अधिकृत नाव हेच आहे) असे प्रकार क्रमश: पाहुयात. ह्यासंदर्भात काही सूचना, दुरुस्ती असल्यास स्वागत आहे. माझ्या अल्पज्ञानाने अन अनुभवाने जेवढी माहीती आहे ती मी लिहायचा प्रयत्न करत आहे.
................................

कलामाध्यमवेध

निशीगंधाचे उखाणे

परशु सोंडगे's picture
परशु सोंडगे in जे न देखे रवी...
30 Mar 2017 - 12:48 pm

रात शांत शांत कशी
वारा अबोल जरासा.

पेटला धूंदीत गारवा
चाहूलीत तू चंद्र जसा.

निशीगंधाचे हे उखाणे.
अंगी शहारांची रे टिंबे.

सांगू नको तू कुणाला
प्राणात गोंदले प्रतिबिंबे.
परशुराम सोंडगे,पाटोदा
9673400928

शृंगारकलाकविता

लाल टांगेवाला

रासपुतीन's picture
रासपुतीन in जनातलं, मनातलं
22 Mar 2017 - 12:44 pm

नमस्कार मिपाकरहो,

संस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतपाकक्रियाबालकथाप्रेमकाव्यबालगीतउखाणेव्युत्पत्तीशब्दक्रीडासामुद्रिकमौजमजाचित्रपटप्रकटनविचार