स्वप्नांचे कवडसे

शिवोऽहम्'s picture
शिवोऽहम् in जे न देखे रवी...
29 Apr 2017 - 3:56 am

लँग्स्टन ह्यु या अमेरिकन कवीची ही एक कविता फार आवडली, तिचा अनुवाद करण्याचा प्रयत्न.

प‌ंखांसार‌खे हात‌ प‌स‌रून‌
स्व‌च्छ‌ उन्हात‌ नाह‌त‌
स्व‌त:भोव‌ती गिर‌क्या घेत‌ र‌हाव‌ं, नाचाव‌ं
सूर्य‌ माव‌ळेस्तोव‌र‌..
आणि म‌ग‌ खुशाल‌ प‌हुडाव‌ं गार‌ वार‌ं अंगाव‌र‌ घेत‌
उंच, डेरेदार‌ वृक्षाच्या छायेत‌ स‌ंध्याकाळी
आणि रात्र‌ अल‌ग‌द‌ उत‌रावी
काळीसाव‌ळी, माझ्यासार‌खी.
अस‌ं माझ‌ं स्व‌प्न‌ आहे..

प‌ंखांसार‌खे हात‌ प‌स‌रून‌
ट‌ळ‌ट‌ळीत‌ उष्ण दुपारी
नाचाव‌ं! गिर‌क्या घ्याव्या! झ‌पुर्झा व्हाव‌ं!
आणि दिव‌स‌ च‌ट‌क‌न स‌रावा
उदास‌ स‌ंध्याकाळी पाठ‌ टेकावी
उंच‌, किर‌कोळ‌ झाडाज‌व‌ळ‌
रात्र‌ त‌शीच यावी अल‌ग‌द‌
काळीशार‌. माझ्यासार‌खीच..

कला

प्रतिक्रिया

मूळ कविताही दिलीत तर उत्तम.

To fling my arms wide
In some place of the sun,
To whirl and to dance
Till the white day is done.
Then rest at cool evening
Beneath a tall tree
While night comes on gently,
Dark like me—
That is my dream!

To fling my arms wide
In the face of the sun,
Dance! Whirl! Whirl!
Till the quick day is done.
Rest at pale evening . . .
A tall, slim tree . . .
Night coming tenderly
Black like me.

यशोधरा's picture

29 Apr 2017 - 6:35 am | यशोधरा

ओह, लक्षात नाही आली लिंक दिलेली. कविता पेस्टल्याबद्दल आभार.
कविता तर सुरेख आहेच, भावानुवादही आवडला.

मूळ कविता आणि अनुवाद दोन्ही सुंदर ! 'झपुर्झा व्हावं' हे फार आवडलं !

वाह! मूळ कविता आणि भावानुवाद, दोन्ही फार तरल आणि मनात रुंजी घालणारे.

पैसा's picture

29 Apr 2017 - 10:02 pm | पैसा

सुरेख भावानुवाद!

सत्यजित...'s picture

30 Apr 2017 - 2:16 am | सत्यजित...

सुरेख भावानुवाद!
अभिनंदन! पुलेशु!

शिवोऽहम्'s picture

1 May 2017 - 8:17 am | शिवोऽहम्

सर्वांना धन्यवाद!

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2017 - 8:04 pm | अत्रुप्त आत्मा

आवडलं.

अत्रुप्त आत्मा's picture

1 May 2017 - 8:13 pm | अत्रुप्त आत्मा

बाकी हे झपुर्झा मंजे काय ?
बरेच दिवस मनात सवाल हाय!

असा पुर्ण मोकळा लक्ष्मी रोड आहे, तुलशिबाग पूर्ण सुनी आहे. पोटात दूर्वांकुराचा अनलिमिटेड आमरस आहे. त्यानतर लावलेला मस्त बार किक देतोय. एक्टिव्हावर मांडी घालून त्या रसत्यावरुन मोकाट फिरताना तुमच मन म्हनेल. " ओ बुवा मि झपुरझा झालो"
तुम्ही म्हणाल " लुलुलुलुलुलुलुलुलु "

शिवोऽहम्'s picture

2 May 2017 - 12:13 am | शिवोऽहम्

हर्षखेद ते मावळले,
हास्य निवालें
अश्रु पळाले;
कण्टकशल्यें बोंथटलीं,
मखमालीची लव वठली;
कांही न दिसे दृष्टीला,
प्रकाश गेला,
तिमिर हरपला;
काय म्हणावें या स्थितिला ?-
झपूर्झा ! गडे झपूर्झा !

हर्षशोक हे ज्यां सगळें,
त्यां काय कळे ?
त्यां काय वळे ?
हंसतिल जरि ते आम्हांला,
भय न धरुं हें वदण्याला :-
व्यर्थीं अधिकची अर्थ वसे,
तो त्यांस दिसे,
ज्यां म्हणति पिसे,
त्या अर्थाचे बोल कसे?-
झपूर्झा ! गडे झपूर्झा !

शिवोऽहम्'s picture

2 May 2017 - 12:14 am | शिवोऽहम्

**केशवसुत

पद्मावति's picture

1 May 2017 - 10:35 pm | पद्मावति

सुरेख.

रुपी's picture

1 May 2017 - 11:05 pm | रुपी

वा!

मूळ कविता आणि भावानुवाद दोन्हीही सुरेख!