गतं न शोच्यं ! !
आपल्या भारतात दोन परंपरा सुरु आहेत. त्याविषयी येथे लिहिण्याचा हा प्रयत्न.शासकिय उच्च पदावरील व्यक्ती, जेंव्हा मरण पावते, त्यावेळी राष्ट्रभर अथवा राज्यभर सात्/तीन्/एक दिवसाचा दुखवटा पाळला जाण्याची घोषणा केली जाते.शासकिय जाहिर केलेले कार्यक्रम रद्द केले जातात. मरण कोणालाही चुकलेले नाही, हे त्रिकालाबाधीत सत्य आहे, हे काही नवीन नाही. कोणतीही व्यक्ती, मग ती आपल्या घरातील असो, समाजातील असो वा उच्च पदावरील असो, दु:ख्ख तर होणारच." मरणांती वैराणी " असे आपल्या कडे म्हटले जाते. मरण पावल्यानंतर, त्या व्यक्तिशी असलेले वैर संपुष्टात येते, आलेच पाहिजे.