लॉर्ड ऑफ द रिंग्स पिच्चरची जी ट्रिलजी आहे त्यातील पहिला भाग. प्रसंग तोच आपला नेहमीचा: बुढ्ढा गँडाल्फ आणि समोर तो महाकाय बॅलरॉग. बुढ्ढ्याचे काय होणार या विवंचनेतच सगळे होते. पुढे काय झाले?
काही शब्दार्थ अगोदरच दिलेले बरे.
गंधाल्प- गँडाल्फ. सगळीकडे फिरूनही स्वतःच्या अफाट ताकदीचा परिचय न दिल्यामुळे अल्प आहे ज्याचा गंध असा तो.
बलराग- बॅलरॉग.
वामन- बुटका अर्थात ड्वार्फ.
अनल्प - एल्फ. एल्फ लोक हे अमर असतात आणि एकूणच समृद्धीत राहतात म्हणून त्यांना अन् + अल्प असे नाव दिले.
हवित्तक - हॉबिट.
प्रद- फ्रोडो, श्याम- सॅम, पिपिन-पिपिन, मारी-मेरी.
वज्राद- विझार्ड, शिवाय वज्र खाणारा तो वज्राद अर्थात प्रचंड पॉवरफुल.
सरुमान- सारुमान., रघुलास- लेगोलास, गम्बली - गिमली, वरमिहिर - बोरोमीर, अलघूर्ण- आरागोर्न.
मौर्यखनि- माईन्स ऑफ मोरिया. औरग - ऑर्क.
कथैषा मध्यदेशस्य द्वापरे ह्यघटत्खलु |
मुद्रिकाभञ्जनस्यैषा सा कथा शृणुयु:स्तदा ||१||
पूर्वं हि कथिता सम्यक्कथाया: पूर्वपीठिका |
मुद्रिकाभञ्जनायैव शायरात्ते बहिर्गता: ||२||
के क आसन् चमौ तस्मिन्? तत्र वै सर्ववंशिका: |
पुरुषा: वामनाश्चापि, अनल्पाश्च हवित्तका: ||३||
गन्धाल्पोऽपि तु तत्रासीत्सर्वाणां मार्गदर्शकः |
वज्रादो ज्ञानवॄद्धो सः सरुमानसमः खलु ||४||
प्रद: श्यामः पिपिन् मारी रघुलासश्च गम्बली |
सार्धं च वरमिहिर: अलघूर्णश्च अन्तिमः ||५||
मौर्यखन्यां तु ह्यगमन् निरुपायाच्च ते खलु |
तत्र वामनराज्ञा तु आसन् ते स्वागताकाङ्क्षिण: ||६||
औरगै: किन्तु तद्राज्यं कॄतं नष्टं हि सत्त्वरम् |
वसन्ति स्म पूर्वखन्यौ तेन दुष्टाश्च औरगा: ||७||
बहूँश्चौरगपिशाच्चान् हत्वाऽस्माकं जनास्त्वहो |
अधावन् त्वरया सार्धं गन्तुं खन्या: बहिस्तथा ||८||
तदानीमेकदाऽपश्यन् कोष्ठं गुरुतम़ं जना: |
उच्चै: नैकैरहो स्तम्भै: धृतवान् कोष्ठभार ह ||९||
पुनस्तत्र नवचमू: अरिभि: परिवेष्टितः|
तदानीमेव विचित्रः ध्वनि: गुरुतरोऽभवत् ||१०||
तच्छृत्वा शत्रवो सर्वे ह्यधावन् तेऽचिरात्खलु |
नवचमौ जना: सर्वे क्षणाय वै अमोदयन् ||११||
छाया चाग्नि च इत्येतं सरुमानोऽवदत् पुरा |
गन्धाल्पं तच्च गन्धाल्पं तदानीमस्मरत् तदा ||१२||
"एषः उच्चतमः शत्रु:, इदानीं तु पलायनम् |
इत्येव करणीयं स्यात्" गन्धाल्पश्चावदत्त्विदम् ||१३||
अधावन् त्वरया सर्वे यदैतच्च श्रुतम् तदा |
तदानीमन्तिमे चांशे सेतुरेको हि दृश्यमान् ||१४||
कज्जलधूम चानेन नाम्ना ज्ञात: स सेतु वै |
आक्रम्य सेतुमेनं तु जना: पारं गता: परम् ||१५||
गन्धाल्पः तत्र वै स्थित्वा अपश्यत्स मुहुर्मुहु:|
अचिरात्तत्र चागच्छत् महाशत्रु: निशाचरः ||१६||
बलरागः इति नाम्ना विख्यातः शत्रु स: महान् |
महाकाय: चतुर्बाहु: अग्निमान् धूमवाँश्च सः ||१७||
प्राचीनराक्षसेणाग्निप्रतोदोऽपि तु धार्यते |
प्रतोदनर्तनं दृष्ट्वा मर्त्या: भीता: तु सत्त्वरम् ||१८||
गन्धाल्पो किन्तु तत्रैव सेतोरुपरि वै स्थित: |
"गच्छ सूकर गुंफायां, प्रवेशोऽत्र निषिध्यते" ||१९||
इत्यवदत् भयहीनः "महावह्नेऽस्मि किङ्करः |
अन्ध:कारबलादत्र न कदा प्रभविष्यसि ||२०||"
तच्छ्रुत्वा बलरागस्तु दिव्यासिमुपयुक्तवान् |
गन्धाल्पोऽपि प्रकाशस्य वलयेन तु वेष्टितः ||२१||
बलरागः हतबल: प्राभवन्नात्र चासिना |
पादाक्रान्तं तदा सेतुं कर्तुं सः आगतोऽग्रतः ||२२||
महाक्रोशेण क्रोधेण गन्धाल्पः जल्पते तथा |
"नैवागच्छ नैवागच्छ गच्छ गच्छ हि पृष्ठत:" ||२३||
तदानीं सेतुभागं च गन्धाल्पस्तु अताडयत् |
सेतुर्नष्टो बलरागस्तेन स: पतितो ह्यधः ||२४||
बलरागप्रतोदेण बद्ध्वा गन्धाल्पमत्र सः |
बलरागो हि अगृह्णात् अधः तेन सह अहो ||२५||
तत्पश्चाद्घटना: नैका: अभवन् तांस्त्वहम् |
कथयिष्यामि अत्रैव समयेऽन्ये यथामति:||२६||
|| इति श्री मुद्रिकाभारते प्रथमे मुद्रिकानाशकचमूनाम्नि पर्वे मौर्यखन्याध्यायः समाप्तः ||
प्रतिक्रिया
3 Feb 2017 - 2:39 am | बॅटमॅन
खूप दिवसांनी कविता पाडल्यामुळे काही व्याकरणाच्या चुका राहून गेल्या आहेत तरी समजून घ्यावे ही इणंती, दुरुस्ती चालू आहे. :)
3 Feb 2017 - 1:15 pm | टवाळ कार्टा
"शोधता आल्या तर" हे लिहायचे राहिले काय? ;)
4 Feb 2017 - 9:03 pm | विशाल कुलकर्णी
आमच्यासारख्यांसाठी "मुळात कळाले तर"हे पण लिहायचे राहीलेय....
बाकी ब्याटम्यानभौंनी लिवलय म्हणल्यावर कायतरी भारीच असणार, म्हणून न कळताच टाळ्या वाजीवतोय :)
3 Feb 2017 - 6:42 am | प्रचेतस
निव्वळ महान.=))
3 Feb 2017 - 6:48 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
अबे हे तर एपिक आहे!!! मस्तं जमलय रे रिंगमास्तरचं संस्कृत रुपांतर.
3 Feb 2017 - 10:26 am | बॅटमॅन
धन्स कप्तान!
खूप दिवसांपासून हा सीन डोक्यात घोळत होता. अखेर काव्य पाडणे झाले.
3 Feb 2017 - 10:50 am | sagarpdy
+ १००००
मस्तच
(लवकरच सिंहासनक्रीडेकडे या, उत्सुकतेने वाट पाहतोय)
3 Feb 2017 - 7:19 am | यशोधरा
अतिशय अद्भुतम!
3 Feb 2017 - 10:50 am | पैसा
आवडलं. येऊ दे पुढचा भाग.
3 Feb 2017 - 11:01 am | सुमीत भातखंडे
सादर प्रणाम _/\_
3 Feb 2017 - 11:21 am | सतिश गावडे
कोण म्हणतं संस्कृत मृत भाषा आहे? :)
3 Feb 2017 - 11:57 am | शब्दबम्बाळ
आपण कष्ट घेऊन सुभाषिते लिहिली आहेत पण त्याखाली त्यांचा मराठी अनुवाद असायला हवा होता.
मराठी संस्थळावर, मराठी हि प्राथमिक भाषा असावी असे वाटते...
3 Feb 2017 - 2:10 pm | साहेब..
मलाही असेच वाटते.
3 Feb 2017 - 12:10 pm | पद्मावति
केवळ _/\_
3 Feb 2017 - 12:48 pm | नंदन
जमलंय.
(अवांतरः तो तेवढा 'वज्रादपि कठोराणि...'च्या श्लेषास फुल्ल स्कोप आहे यात!)
3 Feb 2017 - 12:49 pm | नंदन
जमलंय.
(अवांतरः 'वज्रादपि कठोराणि...'च्या श्लेषास फुल्ल स्कोप आहे यात!)
3 Feb 2017 - 2:17 pm | अभ्या..
आह्ह्ह, खत्तरनाक मुद्रिकास्वामी.
बटोशास्त्री आपण महान आहात.
5 Feb 2017 - 9:45 pm | अत्रुप्त आत्मा
=)) प्लस वण फॉर बट्टमण्ण!
पात्रांचे नामरुपांतरण म्हणजे कहर हाय अगदी! (टनाटनी नाही म्हणून... नैतर ब्याटुक पुना ऒकांनंतर चा ठोक विक्रेता जाहला असता, "हे सगळं आपलच वादी! ". )
शब्द खाटुक बट्टमण्णशास्त्री यांचा फ्याण~ आत्मू जिल्बीवाला!
3 Feb 2017 - 6:59 pm | अजया
बापरे! ______/\______
3 Feb 2017 - 7:14 pm | बोलघेवडा
अवो काय वो हे. प्रतिभा म्हणायची का काय ते.
ते एक गच्ची बघा बसतंय का कुठं!!! :)
-/\-
3 Feb 2017 - 9:23 pm | पगला गजोधर
कंळं न्नै ! मराठीत सांगा नं प्लिज....
4 Feb 2017 - 12:45 am | बॅटमॅन
समस्त प्रतिसादकांना अनेक धन्यवाद!
बाकी ही काही सुभाषिते वगैरे नाहीत. म्हणजे कुभाषितेही नाहीत परंतु नीतीचा काढेबाज डोस पाजणारे श्लोक नव्हेत. संस्कृत म्हटले की सुभाषितच असले पाहिजे वगैरे असे काही नसते.
4 Feb 2017 - 2:07 pm | टवाळ कार्टा
मग एक संचाक लिहून दाखव बरे
4 Feb 2017 - 2:21 pm | बॅटमॅन
या विषयावर गेली हजारदोनहजार वर्षे इतक्या लोकांनी इतक्या विविध प्रकारे लिहिलेय की पुन्हा लिहिण्यात तसा कै अर्थ नाही.
अधिक उत्सुकता असल्यास- गीतगोविंद, चौरपंचाशिका, कुट्टनीमतम्, अमरुशतकम् , शृंगारशतक, अनंगरंगरतिशास्त्र, इ. ग्रंथ चाळावेत. सोळा आणे कोंबडी आणि सोळा आणे मसाला मिळेल. मिपावर पुरुष विभाग असता तर आजचा सुविचार या नावाखाली एकेक संक्लिद्य श्लोक टाकले असते. ;)
4 Feb 2017 - 3:05 pm | गामा पैलवान
च्यायला, संचाक म्हणजे संस्कृतचातुर्यकथा समजून चाललो होतो मी!
-गा.पै.
4 Feb 2017 - 7:36 pm | बिपिन कार्यकर्ते
नाही... तुम्ही म्हणता ते बरोबर आहे पण... ते म्हणतात ना... राजहंसाचे चालणे, जगी जालिया शहाणे, म्हणौनि काय कवणे, चालोचि नये?
;)
4 Feb 2017 - 3:31 am | गामा पैलवान
वाल्गुदमनुष्यास मानाचा मुजरा.
-गा.पै.
4 Feb 2017 - 7:35 pm | बिपिन कार्यकर्ते
धन्य! _/\_
4 Feb 2017 - 9:04 pm | विशाल कुलकर्णी
दंडवत देवा ....
4 Feb 2017 - 9:23 pm | सुधांशुनूलकर
(कविता आणि कवी दोघेही) केवळ महान.
जाता जाता - डूआयडीसाठी अनेक पर्याय??? : गंधाल्प, बलराग, अनल्प, हवित्तक, प्रद, पिपिन, वज्राद, सरुमान (थोडं सलमानसारखं वाटतंय), रघुलास, गम्बली, अलघूर्ण, मौर्यखनि इ. कुणी गंधाल्प घ्या, कुणी अनल्प घ्या...
सर्वांनी कृपया हलकेच घ्या (कृहघ्या)
5 Feb 2017 - 2:22 pm | तिमा
आमचा दंडवत घ्यावा महाराज.
9 Aug 2020 - 8:31 am | चित्रगुप्त
बाबौ. काय इद्वत्ता. काय ते शब्दलाघव, काय ती कवनप्रतिभा. आमचे कोटि कोटि प्रणिपात पंत.