"मोदी" हे फक्त आडनाव आहे
वाव आहे , अजूनही कमवायला वाव आहे
कोण म्हणतं , आता काही शक्य नाही
अरे , मोदी हे फक्त आडनाव आहे
खोऱ्याने ओढत जा तुम्ही , जोपर्यंत हातात टिकाव आहे
वाव आहे , अजूनही सुधारायला ( स्वतःला ) वाव आहे
धंद्याला लावणाऱ्यांचा देशाबाहेर एक गाव आहे
पळून जाण्यासाठी पैलतीरी , सरकारी नाव आहे
ललित गेला , विजय गेला , निरव शांतता झाली
येतील हळूहळू बिळातून बाहेर एकेक
साल्यांच्या मनातच काळे डाव आहेत
सर्व साले एकजात बरबटलेले
म्हणूनच सुधारायला वाव आहे
वाव आहे , अजूनही कमवायला वाव आहे