पाऊल टाकता घरात , उघडावे ते कपाट ,
बदलावे सारे कपडे , राहुनी गप मुकाट
चहा झाला तरीही , प्यावासा वाटला तरीही
कप गुमान धुवून घ्यावा , देईल तेव्हढाच प्यावा
इथे तिथे बघावे नंतर , ठेवुनी एक माफक अंतर
हळूच जेवणाबद्दल पुसावे
येता आवाज तो करडा , होईल तेव्हाच खावे
चालेल थोडे कमी असले मीठ , चालेल थोडा असला कमी मसाला
आवाज ना करता गप्प उठावे , हलकेच टाकावे बेसिनला
काडीची चव नसली , तरीही गोडवे खुशाल गावे
हलकेच आठवूनी जेवण ऑफिसातले , दात कोरत बसावे
येता भांड्याचा आवाज फार , हळूच बंद करावे दार , बेडरूमचे
मुलांना जवळ घ्यावे , आणि त्यांच्या अभ्यासात रममाण व्हावे
थोडे दटावावे अभ्यासावरूनी , आवाज कमी होईस्तोवर
आवाज संपला एकदाचा , ओढोनि चादर झोपून जावे , सूर्य उजाडेस्तोवर
लग्न लागता धोपाटण्याशी, करावे मनापासून नाटक संसाराचे
दाखवावे तिलाही मजनू बनुनी , गोड मानुनी खावे तिच्याच हाताचे
दुसऱ्या जेवणाची उडवावी खिल्ली , हीच आहे लेका , लग्नानंतरची गुरुकिल्ली
सिद्धेश्वर विलास पाटणकर