तुटक्या फुटक्या गळक्या एसटीत
वायफायवर सिनेमा पहायचा
सदा लेट ट्रेनची वाट बघत
फुकट नेटचा आनंद लुटायचा
शेती, व्यवसाय, नोकरीची
चिंता नाही करायची
साऱ्याच दुःखांवरती
फोर-जीची फुंकर घालायची
सारे पैसे बँकेत ठेवून
कॅशलेस व्यवहार करायचा
व्याजाहून महाग सेवांचा
मनसोक्त लाभ घ्यायचा
तुम्ही आणि जीएसटी
एकाच ताटात जेवायचे
उपाशी मरायचे नसेल तर
आधारला सारेकाही जोडायचे
प्रतिक्रिया
21 Feb 2018 - 8:16 pm | माईसाहेब कुरसूंदीकर
उत्तम. किंचित डावीकडे झुकलेली.
21 Feb 2018 - 9:17 pm | नाखु
दगा दिला
चांगली कविता झाली असती
डॉ एक विनंती इतरांच्या सादरीकरणाला दाद देत जा ( माझ्या नसली तरी हरकत नाही)
21 Feb 2018 - 9:30 pm | तेजस आठवले
कविता चांगली जमलीय