२०१९ - लोकसभा निवडणूक

आशु जोग's picture
आशु जोग in जनातलं, मनातलं
27 Feb 2018 - 11:43 am

.डॉ. विश्वजीत कदम यांची ओळख म्हणजे ते शिक्षणसम्राट पतंगराव कदम यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या पाठीशी भारती विद्यापीठ नावाची शिक्षण-संस्था आहे. ते युवक काँग्रेसशी संबंधित असून अत्यंत उच्चशिक्षित आहेत. पीएचडी ही विद्यापीठाची सर्वोच्च पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. त्यांच्या घरात वडिल, काका असे अनेक जण पीएचडी झालेले आहेत. एकाच घरात इतके लोक पीएचडी हे जगातले एक आश्चर्यच मानावे लागेल पण ते कदम कुटूंबाने वास्तवात उतरवले आहे. २०१४ ची लोकसभेची निवडणूक विश्वजीत कदम यांनी लढवली होती. त्यावेळी त्यांनी म्हणजे त्यांच्या माणसांनी कसून प्रयत्न केले होते. आत्तापर्यंत झोपडपट्टीपर्यंत जाऊन आम्हाला मते द्या सांगणारे लोक फ्लॅट आणि बंगल्यांपर्यंत पोचले होते. खूपच जनसंपर्क केला होता त्यांनी.

.सुरेश कलमाडी - पुण्याचे अनेक वर्षे खासदार होते, रेल्वे राज्यमंत्री सुद्धा होते. पूर्वी ते शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू सहकारी मानले जात. सुरेश कलमाडी हिंदी, इंग्रजी बोलू शकतात. पवारांसाठी ते दिल्लीमधल्या उच्च वर्तुळांमधे संपर्क ठेवण्याचे काम करीत. पण मधल्या काळात शरद पवार आणि सुरेश कलमाडी यांचे संबंध तितकेसे चांगले राहिले नाहीत. पवार काँग्रेसमधे असताना त्यांनी सुरेश कलमाडींना काँग्रेसमधून बाहेर जायला लावले होते. मग काँग्रेसबाहेर पडून ते लोकसभेला उभे राहीले. पुणे शहर भाजपाने आपला उमेदवार निवडून येण्याची शक्यता असूनही सुरेश कलमाडींना पाठींबा दिला. पुणे शहर भाजपाने १९९८ मधे मनाचा असा मोठेपणा का दाखवला कळत नाही. भाजपाच्या पाठींब्यावर निवडणूक लढवणारे कलमाडी काँग्रेसच्या विठ्ठल तुपे यांच्याकडून ९१००० ने हरले. भाजपाच्या पारंपरिक मतदारांनीच चिडून जाऊन काँग्रेसला मतदान केले आणि भाजपाला धडा शिकवला, अशी त्यावेळी चर्चा होती. जो मतदार प्रेम करू शकतो तो धडाही शिकवू शकतो. पण यातून भाजपाने काही धडा शिकला का हा स्वतंत्र चर्चेचा विषय होवू शकेल. 2009च्या निवडणुकीमधे कलमाडी काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार होते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कलमाडींना सहकार्य करीनात. शरद पवारांनी जाहीर प्रचार-सभेमधे आपल्या कार्यकर्त्यांना सुरेश कलमाडींसाठी काम करण्याचे आवाहन केले होते. किंबहुना राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुरेश कलमाडींसाठी काम करणार नसतील तर आपण आपली बारामतीमधील निवडणूक बाजूला ठेऊन सुरेश कलमाडींसाठी पुण्यात राहून काम करू, असे पवारांनी सांगितले. शरद पवार जाहीर भाषणांमधे आपल्याबद्दल इतके गोड बोलताहेत त्याअर्थी या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून काहीतरी दगाफटका होण्याची शक्यता आहे हे सुरेश कलमाडींनी ताडले. आपल्या पाठीमधे खंजीर खुपसला जाणार नाही याची सुरेश कलमाडींनी योग्य ती काळजी घेतली आणि 2009 मधे ते खासदार म्हणून पुण्यातून निवडून आले. सुरेश कलमाडींनी आपल्या कुटुंबियांना राजकारणामधे आणलेले नाही.
महीला सबलीकरण - यासाठीही सुरेशभाईंचे नाव घेतले जाते. पुणे शहरात अनेक महीलांना त्यांनी संधी दिली, त्यांच्यामुळेच अनेक महीला महापौरपदापर्यंत पोचू शकल्या. महर्षी कर्वे यांच्या पुण्यात कलमाडींनी कर्व्यांचा वारसा जपला असे म्हणावे लागेल. सध्या वाढते वय आणि कदम यांचा उपलब्ध झालेला पर्याय, यामुळे कलमाडींना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमीच.

.गिरीश बापट हे अनेक वर्षे आमदार राहिलेले आहेत. १९९६ मधे भाजपाकडून ते काँग्रेसच्या कलमाडींविरुद्द लोकसभेची निवडणूक हरले होते. २०१४ मधे ते लोकसभेसाठी इच्छुक होते पण खासदार न होता आमदार झाले पण राज्यात मंत्री होण्याची संधी मिळाली. सध्या ते महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामधे वजनदार मंत्री आहेत. पुणे शहराच्या कारभारावर चांगली पकड आहे. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. एक कार्यक्षम मंत्री आहेत. सर्वपक्षीयांशी त्यांची उत्तम मैत्री असते. आपल्या पोराबाळांना त्यांनी राजकारणात आणलेले नाही. कित्येक वर्षे नगरसेवक, मागील कित्येक टर्म्स ते आमदार आहेत. राजकीय आयुष्याच्या सुंदर टप्प्यावर ते सन्मानाने निवृत्ती घेणार की लोकसभेसाठी प्रयत्न करणार याबाबत उत्सुकता आहे. त्यांचे नाव पुढे आल्यास भाजपाकडून बाकी सर्व नावे मागे पडतील. त्यांच्या नावाला आव्हान दिले जाण्याची शक्यता कमीच.

.प्रदीप रावत - हे बर्‍यापैकी अभ्यासक, वाचक म्हणून ओळखले जातात. हिंदी, मराठी, इंग्रजी मधून वेगवेगळ्या विषयांवर व्याख्यान देऊ शकतात. भारतीय इतिहास, संस्कृती, सावरकरांचा विज्ञानवाद, सामाजिक समरसता हे त्यांच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत. अटल बिहारी पंतप्रधान असताना प्रदीप रावत पाच वर्षे पुण्याचे खासदार होते. २००४ मधे कलमाडींकडून पराभूत झाले होते. त्यांनी आपल्या कुटुंबियांना राजकारणात आणलेले नाही. सध्या शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे ते अध्यक्ष आहेत.

ashutoshjog@yahoo.com

.अनिल शिरोळे - 2009च्या लोकसभा निवडणुकीमधे सुरेश कलमाडींकडून पराभूत झाले. त्यामुळे 2014 च्या निवडणुकीमधे पुणेकरांची असलेली मोठी सहानुभूती, मोदी लाट आणि रिपब्लिकन पार्टी आठवले गटाचा पाठिंबा यामुळे अनिल शिरोळे पुण्यातून अभूतपूर्व बहुमताने विजयी झाले. खासदार झाल्यानंतर त्यांनी आपल्या सुपुत्राला तिकिट मिळवून दिले आणि नगरसेवक केले. पीएमटीच्या समितीवर सुपुत्र संचालक म्हणून काम करतात. पण प्रवाशांना सुद्धा पीएमटी बद्दल जितकी माहिती असते तितकी शिरोळेपुत्राला असते का आणि या सुपुत्राला पीएमटीचा दिवाकर रावते म्हणता येईल का यावर सध्या आमचे चिंतन सुरू आहे. खासदार म्हणून अनिल शिरोळे यांनी काय काम केले, कितपत प्रभाव पाडला याचाही अभ्यास करावा लागेल.

जाणकारांनी आमचा मागील वेळचा धागाही अवश्य पाहून घ्यावा. २०१४ पुणे लोकसभा निवडणूक

2019 मध्ये भाजप-शिवसेना युती होईल का ? काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र येतील का ? राष्ट्रवादी पक्ष पूर्वीइतकीच ताकदवान राहील का ? आपल्या मित्रपक्षाच्या उमेदवाराला दगा देण्याइतकी राष्ट्रवादी स्ट्राँग राहील का ? अशा अनेक प्रश्नांची अजून उत्तरे मिळायची आहेत. कोणी सांगावे जनतेच्या मनात आणखीनच एखादे नाव असू शकेल आणि ही सगळी नावे बाजूला सारून एखादी वेगळीच व्यक्ती पुणेकर सुज्ञपणे खासदार म्हणून निवडून देऊ शकतील. काळाच्या उदरात काय दडले आहे कुणालाच माहीत नाही. तोवर चिंतन सुरु ठेवायचं . . .
ashutoshjog@yahoo.com

धोरणविचार

प्रतिक्रिया

दुश्यन्त's picture

27 Feb 2018 - 2:01 pm | दुश्यन्त

वरील नावाव्यतिरिक्त वेगळे उमेदवार पण रिंगणात असू शकतात.जसे कि भाजपकडून (हसतमुख) जावडेकर, काँग्रेसकडून मीरा कलमाडी. जर शिवसेना वेगळी लढली तर विनायक निम्हण. शक्यतो भाजपवाले शिरोळे याना बदलणार नाहीत. एनसीपी- काँग्रेस आघाडी असेल अन्यथा एनसीपीकडून वंदना चव्हाण हा उमेदवारी पर्याय असू शकतो.

आशु जोग's picture

27 Feb 2018 - 3:00 pm | आशु जोग

अगदी बरोबर

आघाडी न झाल्यास राष्ट्रवादीकडून वंदना चव्हाण हे नाव येऊ शकते. राहून गेले. जावडेकरांची पुन्हा राज्यसभेवर वर्णी लागेलच. ते महत्त्वाच्या खात्याचे मंत्री आहेत.

दुश्यन्त's picture

27 Feb 2018 - 4:20 pm | दुश्यन्त

बरोबर.समजा लोकसभेवर निवडून आले तर त्यांना राज्यसभेचा राजीनामा द्यायला लावून तिथे नवीन चेहरा देऊ शकतात. पण भाजपकडून शक्यतो शिरोळे किंवा मग बापट हेच शकतील. दोन्ही काँग्रेस एकत्र लढले आणि सेनेने आपला उमेदवार दिला तर भाजपला निवडणूक सोपी नसेल. पण ऐनवेळी भाजप सेना युती करतीलही. अजून एक वर्षाचा अवधी आहे.

कपिलमुनी's picture

27 Feb 2018 - 2:50 pm | कपिलमुनी

२०१९ - लोकसभा निवडणूक : पुणे मतदारसंघ
असे असते तर जास्त शोभून दिसले असते.
भ्रष्ट्राचारामुळे कलमाडी यांना तिकिट मिळणार नाही.

भाजपाकडून शिरोळे आणि बापट ही दोन नावे चर्चेत असतील, बापट यांना संधी जास्त आहे कारण खासदार म्हणून शिरोळे यांचे मार्कलिस्ट वाईट आहे.शिवाय सलग दोन वेळा तिकिट मिळाले आहे.. शिरोळे यांच्या तुलनेने बापट यांचा जनसंपर्क आणि प्रसिद्धि जास्त आहे.
त्यापुढे जाउन ( दुर्दैवाने) जातीची समीकरणे आहेत , त्यात बापटांकडे किती व्होट बँक आहे यावर तिकिट अवलंबून राहिल.

आशु जोग's picture

27 Feb 2018 - 3:01 pm | आशु जोग

बापटांना पूर्वी तिकिट मिळालेले होते.

दुश्यन्त's picture

27 Feb 2018 - 4:15 pm | दुश्यन्त

कास्ट फॅक्टर असेल तर मग शिरोळेंनाच फायदा होईल. भाजप मराठा कार्ड वापरून परत शिरोळेंना संधी देईल. बापटांची प्रसिद्धी जास्त आहे पण आजकाल ते नको त्या कारणामुळे पण प्रसिद्धीत राहतात.

लोकशाही म्हणजे वाईटातून चांगले निवडण्याची संधी. पुण्यात एकही योग्य आणी चांगला उमेदवार मिळु नये हे दुर्दैवच.

आशु जोग's picture

27 Feb 2018 - 11:01 pm | आशु जोग

भाजपाच्या नेतृत्वाच्या मनामध्ये काही वेगळेच आहे. कदाचित या सर्वांपेक्षा वेगळा पण निवडून येणारा उमेदवार दिला जाऊ शकतो.

गामा पैलवान's picture

27 Feb 2018 - 11:18 pm | गामा पैलवान

शीर्षकात पुण्याचा संदर्भ नसल्याने ते अस्सल पुणेकरी वाटतंय. अभावजन्य निर्देश यालाच म्हणावं काय?

-गा.पै.

आशु जोग's picture

28 Feb 2018 - 1:37 am | आशु जोग

राहून गेलं. यामधे आणखी काही उमेदवारांची नावेही राहून गेली.

गामा पैलवान's picture

28 Feb 2018 - 2:47 am | गामा पैलवान

आशु जोग,

हुकलेल्या उमेदवारांचं सोडा हो, ऐन मराठी भाषादिनी पुण्यपत्तनमुद्राविलास पाहून मन हरखून गेलं!

;-)

-गा.पै.

साहित्य सम्पादकाना विनंती करून शीर्षक आणि धागा दोन्ही अपडेट करून घेऊ शकता .

आशु जोग's picture

28 Feb 2018 - 4:21 pm | आशु जोग

ओके सांगेन

वंदना चव्हाणांना परत राज्यसभा देण्यात आलीय वाटते.