भाग १ : शेतकर्यांच्या हितासाठी काय गरजेचे आहे - पायाभूत सुविधा
(शेती व्यतिरिक्त अनेक कारक आहे, ज्याच्या परिणाम शेती व शेतकर्यांंवर होतो. यावर प्रकाश टाकण्यासाठी हा उपद्व्याप).
(शेती व्यतिरिक्त अनेक कारक आहे, ज्याच्या परिणाम शेती व शेतकर्यांंवर होतो. यावर प्रकाश टाकण्यासाठी हा उपद्व्याप).
सामाजिक उपक्रमाचे हे आपले नववे वर्ष. हा उपक्रम आता मिपाला नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली ८ वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत. मिपाकरांनीही गेल्या वर्षी भरभरून साथ दिली. समाजासाठी कार्य करणार्या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो.
पुतळा म्हणजे कधी गडकरी, सावरकर तर कधी तो लेनीन,
नाव बदलता मते बदलती, पुतळा त्या वृत्तीचे दर्शन.
पुतळा म्हणजे अंध धुंद निर्बंध कधी सत्तेचा दर्पण.
पु्तळा म्हणजे वांझोट्याशा अहंपणाचे कधी प्रदर्शन.
पुतळा म्हणजे मूर्ती नाही, धर्म रुढींचे ना त्या बंधन.
पुतळा म्हणजे दगड नी धातू, तरीही देई कुणास चेतन.
पुतळा म्हणजे "कधीतरी" अन् "कुणीतरी"ची फक्त आठवण.
पुतळा म्हणजे गतकाळाचे अशक्य भावूक पुनरुज्जीवन.
पुतळा म्हणजे चुकार कुठल्या पक्ष्याचे हक्काचे घरपण..
पुतळा म्हणजे हरवून गेल्या पत्रावरली पत्त्याची खूण..
पाऊल टाकता घरात , उघडावे ते कपाट ,
बदलावे सारे कपडे , राहुनी गप मुकाट
चहा झाला तरीही , प्यावासा वाटला तरीही
कप गुमान धुवून घ्यावा , देईल तेव्हढाच प्यावा
इथे तिथे बघावे नंतर , ठेवुनी एक माफक अंतर
हळूच जेवणाबद्दल पुसावे
येता आवाज तो करडा , होईल तेव्हाच खावे
चालेल थोडे कमी असले मीठ , चालेल थोडा असला कमी मसाला
आवाज ना करता गप्प उठावे , हलकेच टाकावे बेसिनला
काडीची चव नसली , तरीही गोडवे खुशाल गावे
हलकेच आठवूनी जेवण ऑफिसातले , दात कोरत बसावे
येता भांड्याचा आवाज फार , हळूच बंद करावे दार , बेडरूमचे
अगं असशील गं तू लोकांसाठी नावारूपाला आलेली बाई
पण माझी तू फक्त आई आहेस
मी लहान असताना तू किती प्रेम करायचीस
हवं नको ते सारं बघायचीस
मी कर्तासवरता झालो
नि तू दूर दूर गेलीस
इतकी कि आज तुला माझी हाकही ऐकू येत नाही
मी ओरडतो, घशाला कोरड पडते
बेचैन होतो , आतून बाहेरून फक्त एकच आवाज असतो " आई, आई नि फक्त आई "
तू प्रगतीची शिखरे पादाक्रांत करत गेलीस
एकावर एक पुरस्कार मिळवत गेलीस
प्रत्येक पुरस्कारासाठी वेळ देत गेलीस
पण मी तुला मनापासून दिलेले पुरस्कार विसरलीस
देवाची बरोबरी फक्त तूच करू शकतेस
डॉ. विश्वजीत कदम यांची ओळख म्हणजे ते शिक्षणसम्राट पतंगराव कदम यांचे सुपुत्र आहेत. त्यांच्या पाठीशी भारती विद्यापीठ नावाची शिक्षण-संस्था आहे. ते युवक काँग्रेसशी संबंधित असून अत्यंत उच्चशिक्षित आहेत. पीएचडी ही विद्यापीठाची सर्वोच्च पदवी त्यांनी संपादन केलेली आहे. त्यांच्या घरात वडिल, काका असे अनेक जण पीएचडी झालेले आहेत. एकाच घरात इतके लोक पीएचडी हे जगातले एक आश्चर्यच मानावे लागेल पण ते कदम कुटूंबाने वास्तवात उतरवले आहे. २०१४ ची लोकसभेची निवडणूक विश्वजीत कदम यांनी लढवली होती.
प्रिय मायमराठी,
तुझा प्रांत सोडून तब्बल एक तप उलटून गेले, म्हणूनच कदाचित् तुझी आठवण इतर कुणाहीपेक्षा माझ्या मेंदूत जास्त येरझाऱ्या घालत असावी.
तुला न ऐकणे म्हणजे, कान असून श्रवण नसणे. तुला न वाचणे म्हणजे, डोळे असून आंधळे असणे. तुझे देवनागरी रूप महिनोंनमहिने नजरेस पडत नाही, तेव्हा डोळे दुखून येतात.
तू
काना, मात्रा,
विलांटी, शिरोरेखा
घेऊन
माझ्या वहीत
हळूहळू लिहित जातोस,
तेव्हा
मी तुझे
राजस हात
लोभस डोळे
पहात राहते.
तुझ्यात इतका जीव का गुंतावा?
तू माझ्या हातांचे
देवनागरी चुंबन
घेऊन म्हणावे,
मातृभाषा कि काय
तिच्यातच जीव अडकतो बघ,
आई गंssss म्हटल्याशिवाय
प्राणसुद्धा जात नाही....
शाईचे बोट धरुन
तू परत रात्रीच्या
शांतप्रहरी
काना, मात्रा,
विलांटी, शिरोरेखा
घेऊन
माझ्या वहीत
तुझेमाझे हितगुज
हळूहळू लिहित राहतोस...
तुटक्या फुटक्या गळक्या एसटीत
वायफायवर सिनेमा पहायचा
सदा लेट ट्रेनची वाट बघत
फुकट नेटचा आनंद लुटायचा
शेती, व्यवसाय, नोकरीची
चिंता नाही करायची
साऱ्याच दुःखांवरती
फोर-जीची फुंकर घालायची
सारे पैसे बँकेत ठेवून
कॅशलेस व्यवहार करायचा
व्याजाहून महाग सेवांचा
मनसोक्त लाभ घ्यायचा
तुम्ही आणि जीएसटी
एकाच ताटात जेवायचे
उपाशी मरायचे नसेल तर
आधारला सारेकाही जोडायचे
ज्यांना तुम्ही सांगताय-
नोकरी नाही, तर रोजगार करा
मुद्रा योजनेतून कर्ज घ्या
आणि 'पकोडे' तळा!
ऐका, त्यांच्याकडे खऱ्या पदव्या आहेत
त्यांना खऱ्या नोकऱ्या हव्या आहेत
त्यांचे पालक त्यांच्यासाठी झिजलेत
त्यांच्या कष्टातून फीचे पैसे आलेत
त्यांचे स्वप्न चांगल्या नोकरीचे होते
हे नाही कि त्यांनी 'पकोडे' तळावेत!