ती जशी जशी जुनी होत गेली
हळूहळू माझी सोनी बनत गेली
वाईनवानी कडुशार होती
नंतर मधाचे पाणी बनत गेली
रंगढंग बघूनच तर जवळ गेलो होतो
खटके उडायचे अधूनमधून
पुढे नवीन कहाणी घडत गेली
या एकल्या जीवाची ती राणी बनत गेली
आधी जे मिळेल ते खायचो नि राहायचो
मग हवी होती कशाला बायको ?
डोळे सताड उघडे असायचे, राव
या डोळ्यांचीच जणू पापणी बनत गेली
कधी आत हृदयात बसली ते समजलंच नाही
आत सळसळणाऱ्या रक्ताची वाहिनी बनत गेली
बायको आधी नकोशी वाटत होती यार
आता मात्र माझ्यासाठी अमृत संजीवनी बनत गेलीय ...
सिद्धेश्वर विलास पाटणकर