लग्नाआधी लिटमसची चाचणी करून घ्यावी
निर्व्यसनी असाल तर वाईट सवय लावून घ्यावी
व्यसनांनुसार टाकावा एकेक थेम्ब लाळेचा
लिटमस पेपरवरी
जर सामू आला सात
लग्नास नसावी काही बात
त्यामध्ये असेल चढउतार
घ्यावी सरळ माघार , लग्नकार्यातूनी
सवयीनुसार सामूची वर्गवारी
तंबाखू असे तीनवरी
सुपारीसहित तोच बैसे पाचावरी
सोडामिश्रित आठवरी तर
ऑन दि रॉक्स ती दहावरी
देशीसाठी नसे चाचणी
देशी असे जनावरी
लक्षात ठेवा नवरोबानो
अर्धांगिनी पण लिटमस परी
सुटणार नाहीत नाद कुणाचे
असाल कायम रडारवरी
व्यर्थ नका मरू दादा
घ्या लिटमस पेपर साधा
व्यसनांती पण सामू जर "सात " असेल
तरच निवडा आपली राधा
जर हे सर्व व्यवस्थित जमेल
तर आणि तरच बोहल्यावर चढा
अन्यथा रामदास स्वामींप्रमाणे
सावधान ऐकताक्षणी सरळ मंडपाबाहेर पडा
सिद्धेश्वर विलास पाटणकर
प्रतिक्रिया
26 Mar 2018 - 4:01 pm | अभिजीत अवलिया
ते यमक वगैरे जुळवा की दादा जरा. का नाही?
26 Mar 2018 - 9:10 pm | प्रसाद गोडबोले
एकदम गरीब कविता !
बाकि खिलजिच्या कवितेत रामदास स्वामींना जागा मिळालेली पाहुन अंमळ हसुच आले =))
27 Mar 2018 - 2:40 pm | सूड
नक्की काय झालंय?