विचार मंथन
विचार मंथन
विचार मंथन
नुकतेच सुप्रीम कोर्टाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणली म्हणुन बंगाल सरकारला झापले ! इतर कोणत्याही केस मध्ये " असहिष्णुता" सिध्द झाली नाही म्हणणार्या कोर्टाने ह्या केस मध्ये मात्र दीदींच्या सरकारला तब्बल २० लाख रुपायाचा दंड ठोठावला !
https://thewire.in/law/supreme-court-west-bengal-film-bhobishyoter-bhoot
वरील माहीती देण्यात आचारसंहितेचा भंग होत नाही कारण आहे ही वस्तुस्थिती आहे !
हेच ते जीवघेणे हळवे तळवे
ज्यावर तू तुझे काळीज काढून ठेवलेस!!
शक्य वा हिंमत असती तर
हे तळवे बाजूला काढून
फोटोत घडी घालून
पुरून टाकले असते...
ना ही असोशी असली असती...
ना अंधारात डोळे खुपसून
न उजळणार्या पूर्वेकडे
पहात राहिले असते....
ना रक्तातून तुझे भिरभिरणे ऐकत राहिले असते....
नाहीतर,
माझ्या दोन्ही तळव्यांना
पंख व्हायची शक्ती घटकाभर देता,
तर विधात्याचे काय जाते?
-शिवकन्या
मागील वर्षात जागितक बाजारात खळबळ उडाली ! ती या वर्षाच्या सुरवातीलाच देखील दिसुन येत होती. फेड ची प्रत्येक दरवाढ बाजार अशांत करत आहे.
या वर्षी फेडची दरवाढ आणि चीन यांच्या प्रत्येक घडामोडी पाहण्या सारख्या असतील असे मला वाटते... तर जालावर सध्या रिसेशन कधी येणार यावर चर्चा चाललेली दिसते. ट्रम तात्या भिंतीला चिकटुन बसले आहेत तर तिकडे क्रिमिया मध्ये रशियाने एस-४०० तैनात केले आहे. बिटकॉइचा बुडबुडा फुटल्यावर या वर्षी क्रिप्टो करन्सी कशी वाटचाल करेल हे देखील पाहणे रोचक ठरेल.
जसा वेळ मिळेल तसा हा धागा अपडेट करत राहीन.
२३ डिसेंबर - राष्ट्रीय शेतकरी दिन
शेतीतल्या 'श' ची देखिल माहिती नसलेल्या माझ्यासारख्या सामान्याने याबाबत कसंमांडावं म्हणुन बिचकत होतो.
कामानिमित्त माती, पर्यावरण आणि हौसेपोटी 'Own Grown' म्हणजे स्वत:च अन्न स्वत: पिकवा या प्रवासा थोडा अभ्यास होतोय.
कृषीक्षेत्रातील किटकनाशकांचा वापर, आरोग्यावरचे दुष्परिणाम याचबरोबर अजुनही म्हणावा तसा चर्चिला न गेलेला एक मुद्दा आहे.
सूचना : ही लेखमाला एका शीर्षकाखाली आणण्यासाठी, प्रत्येक लेखाच्या शीर्षकात, "जीवनशैली + (अनुक्रमांक)" हे शब्दगट सामील केले आहेत.
अनुक्रमणिका :
जीवनशैली ०१ : जगातील सर्वात जास्त निरोगी व जास्त आयुर्मान असलेले लोक व्यायामशाळेत जात नाहीत !
जीवनशैली ०२ : आयुर्मानावर लक्षणीय परिणाम करणारे महत्त्वाचे घटक
***************
चकीत झालात ना ?! पण, हे केवळ सनसनाटी शीर्षक नाही, तर शास्त्रीय सत्य आहे. याचा अर्थ असा नाही की व्यायामशाळेत जाऊन शारीरिक क्षमतेला ताणणारा व्यायाम सरसकट वाईट आहे... व्यायामशाळेत शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेला योग्य प्रमाणातला व्यायाम फायदेशीर ठरू शकतो, व तो ठराविक उद्येशांकरिता (उदा: खेळ, प्रतिस्पर्धा,इ) आवश्यकही असतो. मात्र, असा व्यायाम सरसकट आरोग्यपूर्ण दीर्घ जीवनाची हमी देऊ शकत नाही. खडतर व्यायामापेक्षा खूपच सुसह्य असलेल्या कृती, त्यापेक्षा कित्तेक पटींनी जास्त हमी देऊ शकतात.
"स्वातंत्र्य दिल्यावर तथाकथित भारतीय नेते थोडयाच कालावधीत भारताची वाट लावतील.भारतीय लोकांकडे राज्य करण्याची क्षमताच नाहीय, ते फक्त गुलामच राहू शकतात.... " तत्सम इंग्रजी वल्गनांच्या गदारोळात भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या दिवसात स्वतंत्र भारतचे सक्षम नेतृत्व करू शकेल असा नेता जवाहरलाल नेहरू यांच्या इतका कुणी होता असे मला तरी आजही वाटत नाही. तत्कालीन परिस्थिती मध्ये नेहरू हे सर्वात अधिक योग्य नेतृत्व होते. आज रुजलेल्या आणि प्रगल्भ होऊ घातलेल्या लोकशाही व्यवस्थेतल्या दिवसात त्यांच्या नेतृत्वाचे अनेक अंगानी विश्लेषण होईल वा होते आहे.
सध्या राम आणि रावण यांच्या निमित्ताने निरनिराळे परस्पर विरोधी मुद्दे मांडले जात आहेत. ते ऐकताना सामान्य माणसाचा संभ्रम वाढतो आहे. रावण हा आदिवासींचा राजा होता त्यामुळे तो आमचा राजा आहे असे काही दलित संघटनांचे म्हणणे आहे. त्यामुळे रामाने त्याची हत्या केली हे योग्य केले नाही आणि म्हणूनच दरवर्षी रावण दहन हेही त्यांना पटत नाही. मरणान्तानि वैराणि असं स्वतः राम म्हटले असतील तर दरवर्षी हा वाद उकरून काढून रावणाला का जाळायचं. अफजलखानाच्या वधानंतर महाराजांनी सुद्धा अशीच भूमिका घेतली होती इ. इ.
आम्ही बायका म्हणजे बोलीभाषा, बोलघेवड्या !
चुलीपासून फोनपर्यंत बडबडबड, गप्पागोष्टी....
लिपीबिपीचे बंधन नाही
व्याकरणबिकरण... हे काय असते?
आम्ही बोलतो अनंत बोलीतून ....
कुजबुज जितकी थरथरणारी
तितके भांडण कडकडणारे
कठोरतेचा शीण आम्हाला
मवाळतेचा शाप तसाही
पण बोली आमची जपून ठेवतो....
अर्थाचा पण अनर्थ करू....
खिल्ली तुमची सहज उडवू
निरर्थाला अर्थ देऊ...
पण तुटका संसार नेटका करू....