विचार मंथन
१९९१ च्या आर्थिक सुधारणा आणि रुप्याचे अवमूल्यन याने , अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. प्राव्हेट कंपन्या भारतात येऊ लागल्या, रोजगार वाढू लागले, नोकरपेक्षा वर्ग कडे हळू हळू पैसे येऊ लागला. त्याकाळी मध्यम वर्ग गावाला जाऊन समाधानी असायचा, आता थोडी मोठी स्वप्ने बघू लागला. नवरा बायको दोघेही कमावते होते, मुले उच्चशिक्षण घायला लागली, काही भुर्रकन अमेरिकेत उडून गेली. बाकीची भारतात उच्च शिक्षण घेऊन व्यवस्थापन शिक्षण घेऊन बँक, इन्शुरन्स आणि इंजिनीरिंग क्षेत्रात कामे करू लागली, शिक्षणाचे पर्याय आणि शाखा वाढू लागल्या, मध्यम वर्गा ला चाळीतून मालकीच्या जागेत प्रवेश घेतला, मग छोट्या घरातून मोट्या घरात प्रवेश होऊ लागला.
तरी खरा बदलावं २००५ नंतर सुरु झाला , टोलेजंग इमारती, चकाचक इंटेरिअर्स , हक्काची चार चाकी आणि दुचाकी, परदेशी सहली, जे जे म्हणूं काही जुने होते ते हद्दपार होऊ लागले, मग संस्काराच्या संकल्पना आणि जाणीव बदलू लागल्या, पूर्वी जे काही वर्ज्य होते ते नवे नॉर्मल झाले, जे काही पूर्वी वाईट होते ते सामाजिक दृष्ट्या अँप्रोव्ह झाले. मग सेल फोन आले आणि सर्व चित्र पालटले , माणसे दूर गेली आणि दूर असलेली माणसे फोने मुळे संपर्कात राहिली, पण आत्मीयता गेली आणि फॉर्मॅलिटी राहिली. आदर गेला आणि दिखाऊ आदर राहिला,
पण मग तरीही आपण अजूनही तळ्यात आणि मळ्यात आहोत. ना धड भांडवल शाही घेतली ना धड सर्वांगीण विकास झाला. आर्थिक विषमता अजून खूपच मोठी झाली. थोडा माध्यम वर्ग वाढला पण त्याच्या हि काही समस्या आहेत, त्या निराकारण झाल्या नाहीत. गरिबी थोडी कमी झाली.
मग अश्या परिस्थितीत येथून पुढे जाताना काय करावे , असा प्रश्न पडतो? धोरणे चुकतायत का? कि आपण जुन्या पुराण्या अर्थ निकषांनि स्वतःला गुरफटून घेतले आहे?
मग आपले स्वतःचे व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र आपण घडवू शकत नाही का? का आपल्या कडे विचारवंतांची वानवा आहे का?
कि सामाजिक आणि राजकीय अडचणी आहेत, मग त्याची जबाबदारी कोणाची? लोकशाही पद्धतीत आपण निवडून दिलेल्या नेत्यांची कि मतदान करणाऱ्या लोकांची??
कि आपण अजूनही कोण्या अवतारी पुरुषाची वाट बघणार आहोत, कि कोणी मासिहा आपल्याला यातून सोडवणार आहे?
भारताला आता स्वतःची अशी थेअरी निर्माण करणे गरजेचे आहे.
सुनील भट
प्रतिक्रिया
25 Apr 2019 - 9:31 am | कंजूस
मग आपले स्वतःचे व्यवस्थापन आणि अर्थशास्त्र आपण घडवू शकत नाही का? का आपल्या कडे विचारवंतांची वानवा आहे का?
हो.
सामाजिक आणि राजकीय अडचणी आहेत, मग त्याची जबाबदारी कोणाची? लोकशाही पद्धतीत आपण निवडून दिलेल्या नेत्यांची कि मतदान करणाऱ्या लोकांची??
हो. म्हणजे तशा वातावरणातच आपण मोठे झालो की नाही?