सामाजिक उपक्रम -२०१८

Primary tabs

निशदे's picture
निशदे in जनातलं, मनातलं
9 Mar 2018 - 1:46 am

सामाजिक उपक्रमाचे हे आपले नववे वर्ष. हा उपक्रम आता मिपाला नवा नाही. मायबोलीकरांच्या साथीने गेली ८ वर्षे स्वयंसेवक हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडत आले आहेत. मिपाकरांनीही गेल्या वर्षी भरभरून साथ दिली. समाजासाठी कार्य करणार्‍या संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे मदत मिळवून देण्यास आपण प्राधान्य देतो. या उपक्रमात दरवर्षी ज्यांना सरकारकडून फारशी मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यत्वे फक्त देणगीदारांवर चालते अशा गरजू संस्थांना प्रामुख्याने वस्तुरुपात मदत करण्यावर आपला भर असतो.
ह्या वर्षी ५ पैकी 2 संस्था ह्या नोंदणी झालेल्या असल्या तरी त्यांना देणगी दिल्यावर अजून ८०जी कर सवलत मिळत नाही. या संस्था ८० जी मिळवायच्या प्रयत्नांत आहेत परंतु ती प्रक्रिया वेळखाऊ आहे व अद्याप पूर्ण झालेली नाही. तसेच काही संस्थांना निधीअभावी ८०जी चे काम पूर्ण करणे सध्या जमू शकलेले नाही. प्रस्थापित संस्थांपेक्षा या संस्था अलीकडच्या आहेत, तळागाळापर्यंत पोचून तिथे मदतीचा हात गरजूंना देत आहेत. त्यांना कॉर्पोरेट फंडिंग नाही किंवा मोठ्या स्वरुपातील देणारया प्राप्त नाहीत. सध्या सोशल मिडियामुळे जग जवळ आले आहे, त्याचे तोटे असतीलही पण चांगले काम सगळ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी ह्याचा सकारात्मक उपयोगही ह्या संस्था करत आहेत. ज्यां देणगीदारांना देणगीवर करसवलत नाही मिळाली तरी चालत असेल त्यांनी ह्या संस्थांचा जरूर विचार करावा. निवडलेल्या संस्थांना गरज असलेल्या गोष्टींची यादी मागवण्यात आली आहे.

गेल्यावेळेप्रमाणेच देणग्या खालील पद्धतीने स्वीकारल्या जातील,
१) ज्यांना देणगी द्यायची आहे त्यांनी स्वयंसेवकांपैकी कोणालाही संपर्क करुन तुम्ही किती देणगी देणार आहात इतकेच कळवावे. यासाठी ३१ मार्च ही मुदत ठेवत आहोत.

२) एप्रिलपासून, किती देणगी मिळत आहे ते पाहून सर्व संस्थांना साधारण समान निधीवाटप करण्यात येईल. त्याचवेळेस त्या निधीतून त्या संस्थेसाठी दिलेल्या यादीतून काय सामान घेता येईल, तेकोठून घेता येईल वगैरे ठरवले जाईल.

३) देणगीदारांचे गट करुन कोणी कोणत्या संस्थेला देणगी पाठवायची, संस्थेच्या अकाउंटची माहिती इत्यादी कळवण्यात येईल. त्यानंतर तुम्ही संस्थेच्या खात्यावर रक्कम जमा करु शकता.संस्थेच्या अधिकृत टॅक्स खात्याची माहिती इथेही लिहिण्यात येईल.

४) देणगीदारांनी देणगी पाठवल्यावर स्वयंसेवकांपैकी कोणालाही त्याबद्दल कळवणे महत्वाचे आहे. त्याप्रमाणे संस्थेला कळवले जाईल.

५) सर्व देणगीदारांनी देणग्या पाठवल्याचे आम्हाला कळवले की प्रत्येक संस्थेकडून खातरजमा केली जाईल.

६) सर्व जुळले की मग वस्तू विकत घेण्यासाठी पाऊल उचलले जाईल.

७) वस्तू खरेदी झाली व संस्थेला पोचली की इथे सांगितले जाईल.

ही पद्धत गुंतागुंतीची वाटेल पण देणगीदारांनी योग्य त्या संस्थेला फक्त योग्यवेळी देणगी पाठवायची आहे. बाकी काम उपक्रमाचे स्वयंसेवक करतील.

काही संस्था अभारतीय चलन पण स्विकारतात. ज्यांना वेगळ्या चलनामधे देणगी द्यायची आहे त्यांनी संपर्क किंवा विपुद्वारे स्वयंसेवकांशी संपर्क साधावा. जे मिपाचे सभासद नाहीत परंतु मदत करण्यासाठी उत्सुक आहेत ते सुनिधीशी lataismusic@yahoo.com या ईमेलवर संपर्क साधू शकतात.

या वर्षीच्या उपक्रमाद्वारे मदत केल्या जाणार्‍या संस्था खालीलप्रमाणे आहेत.

१. संस्थेचे नाव:- सहारा अनाथालय.
संस्थेचा पत्ता:- सहारा अनाथालय परिवार, बालग्राम, गेवराई, बीड.
संस्थेचे कार्यक्षेत्र:-
ऊसतोडणी कामगारांच्या, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या तसेच वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांच्या ८५ मुलामुलींचे पालकत्व, पालन पोषण, वैद्यकीय खर्च, शैक्षणिक खर्च, शिक्षणेतर उपक्रम.
आयकरातील सवलत :- ८०जी.
संपर्क :- संतोष गर्जे, +919763031020
नोंदणी क्रमांक :- Mumbai Public Trust Act 1950-F- 13146 Beed.
वेबसाईट:- http://www.aaifoundation.org/
संस्थेचे प्रकल्प आणि त्याचा अंदाजे खर्च:-
धुलाई यंत्र - Rs. 25000 /-
जेवणाचे टेबल - Rs. 80,000/-
टीन पत्रे ४० (Per Sheet Rs 1750) - Rs. 70,000 /-
जनरेटर - Rs. 60,000/-
सोलर लाइट सिस्टीम - Rs. 70,000/-

२. संस्थेचे नाव:- शबरी सेवा समिती.
संस्थेचा पत्ता:- 'Anand', Dr Phadke hospital, Kotwal Nagar, Karjat (Dist Raigad)
संस्थेचे कार्यक्षेत्र:-
वनवासी क्षेत्रातील बालकांचे कुपोष, बालमृत्यू थांबवणे, आनंददायी शिक्षण, महिला विकास
आयकरातील सवलत :- ८०जी.
संपर्क :- प्रमोद करंदीकर Tel: (02148)-222102
नोंदणी क्रमांक :- F / 26509 (Mumbai).
वेबसाईट:- http://www.shabarisevasamiti.org/english/index.html
संस्थेचे प्रकल्प आणि त्याचा अंदाजे खर्च:-
गरजा नंतर अपडेट करु

३. संस्थेचे नाव:- अमेय पालक संघटना
संस्थेचा पत्ता:- खोणी, डोंबिवली MIDC जवळ
संस्थेचे कार्यक्षेत्र:-
मतिमंदत्व हे अपंगत्व अन्य प्रकारांपेक्षा अगदी वेगळ्या प्रकारचं आहे. अन्य अपंग शिक्षण, प्रशिक्षण व सहाय्य याद्वारे पुष्कळसे स्वावलंबी होऊ शक्तात.' समजण ' हि प्रक्रियाच मतिमंदांच्या बाबतीत होत नाही त्यामुळे पालकांना कायमच यांची काळजी घ्यावी लागते. मतिमंदत्व तीव्र असेल तर त्यांना जगविण्याचीच जबाबदारी पालकांवर येते. एकूणच मतिमंदांचा तहहयात सांभाळ करणे भाग असते व त्यासाठी वसतिगृह उभे करणे आवश्यक होऊन बसते. मतिमंद व्यक्तींचा सांभाळ तहहयात करण्यासाठी पालकांनी एकत्र येउन ' अमेय पालक संघटना ' हि संस्था स्थापन केली. कैं. मेजर ग.कृ. काळे यांच्या प्रेरणेनेच हे काम सुरु झाले. शासनाच्या अनुदानाशिवाय हा उपक्रम उभा आहे कारण सुजाण व स्रह्दय हितचिंतक संस्थेस लाभले आहेत. अव्याहत चालणाऱ्या या कार्यास समाजाच्या पाठबळाची नेहमीच गरज असते.
आयकरातील सवलत :- ८०जी
संपर्क :- अविनाश बर्वे - 022 25334250 , सुनील जाधव - 9820035634 , रंजन जोशी – 9820430594
Email:ameyapalak@gmail.com / info@ameyapalaksanghatana.org
नोंदणी क्रमांक :- Bombay Public Trust Act. Reg.no.F 2955(Thane)
संस्थेचे प्रकल्प आणि त्याचा अंदाजे खर्च:-
रोजच्या गरजा , जसे कि धान्य , औषधे ह्यासाठी कायमच आर्थिक निधी लागतो.
तसेच सध्या संस्था थोडी फार ठेव शिल्ल्क राहील ह्यासाठी सुध्दा प्रयत्नशील आहे जेणेकरून जर अशा कोणी मुलांचे पालक नसतील तर त्यांच्या पुढील देखभालीसाठी तो वापरला जाईल

४. संस्थेचे नाव:- हरिओम शैक्षणिक व सांस्कृतिक मागासवर्गीय सेवाभावी बहुउदेशीय संस्था / मतीमंद निवासी शाळा
संस्थेचा पत्ता:- म्हसला बु || ता, बुलढाणा
संस्थेचे कार्यक्षेत्र:-
अतिदुर्गम खेडेभागत हि संस्था कार्यरत असून या टिकाणी मतीमंद मुलांच्या संगोपानासाठी शाळा उभारण्यात आली असून , येथे सध्या ३० हून अधिक मुलांचा सांभाळ केला जात असून पहिल्या वर्षी २० वर असणारी मुलांची संख्या आता ४० वर गेली आहे. मतीमंद मुले १८ वर्षाची होईपर्यंत त्यांचा संभाळ करणे खूप अवघड असते. मात्र त्यांच्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते.अनेक पालकांना कामाच्या व्यापातून हे शक्य होत नाही.त्यामुळे या संस्थेतून १८ वर्षापर्यंतच्या मुलांच सांभाळ केला जातो. श्री शिवनारायण पोफलकर व त्यांची मुले हे सध्या या संस्थेची देखभाल करत असून , या संस्थेत गोरगरीब आसपासच्या खेडेभागातील तसेच ज्याला कोणीच नाही अशी अनाथ मतीमंद ६ ते १८ वर्षापर्यंतची मुले वास्तव्यास आहेत. तर १० कर्मचारी त्यांचा उत्तमरीत्या सांभाळ करीत आहे.या संस्थेच्या १ एकर पसरलेल्या परिसरामध्ये निवासी वसतिगृह ,स्वयंपाकघर, मैदान,या सारख्या सुविधा उपलब्ध आहेत.
आयकरातील सवलत :- अजूनपर्यंत तरी नाही
संपर्क :- राजेंद्र पोफलकर +917028212821
नोंदणी क्रमांक :- A -५९६.
वेबसाईट:- संस्थेचा Z 24 tasवरील व्हिडीओ या लिंक वर पाहू शकता. https://youtu.be/RVhP3yOnkd4
संस्थेचे प्रकल्प आणि त्याचा अंदाजे खर्च:-
१] शाळेचे व वसतिगृहाचे पक्के बाधकाम करायचे आहे (५ रूमचे )
२] वस्तीगृहातील मुलांना गरम पाण्यासाठी सोलर हिटर (१)
३] वस्तीगृहातील मुलाना झोपण्यासाठी बेड (४०),पलंग(४०) ,मुलांचे कपडे ठेवण्यासाठी कपाटे (२)
४] शाळा खेडे भागात असल्या कारणाने इथे लाईनचा प्रोब्लेम आहे ,त्यासाठी इन्व्हर्टर हवे (२)
५] मुलांना खेळण्यासाठी जोके (२) ,घसरगुंडी (२) इत्यादी
६] नवीन वर्षासाठी मतीमंद मुलांचे शैक्षणिक साहित्य (४० मुलांसाठी)

५. संस्थेचे नाव:- शिव ऋण प्रतिष्ठान
संस्थेचा पत्ता:- जुन्नर
संस्थेचे कार्यक्षेत्र:-
मायबोलीकरांना ह्याच्या कामाची ओळख आधीच शोभा ह्यांनी इथे करून दिली आहे. . अक्षय बोर्हाडे हा मुलगा अत्यंत निरपेक्ष वृत्तीने समाजसेवा करत आहे. वय वर्ष फ़क्त २१/२२. हा मुलगा, आपल्या सख्या, चुलत, मामे, आत्ये भावांबरोबर व काही मित्रांबरोबर, समाजातील निराधार, रस्त्यावर पडलेल्या, आजारी, मनोरुग्ण वगैरे लोकांच्या सेवेसाठी महाराष्ट्रात सगळीकडे जातो. इतक्या बेकार अवस्थेत ती लोकं जगत असतात, वर्षानुवर्ष अंघोळ नाही, स्वच्छता नाही. ज्यांच्या जवळपासही कोणी फ़िरकत नाही. तिथे जाऊन ही मुलं स्वत: त्या लोकांना गरजेप्रमाणे स्वच्छ करून, कपडे, जेवण, देऊन घरी घेऊन येतात व घरचे लोकही त्यांची सेवा करतात. त्याने सांगितले कि जेव्हा अशी निराधार दिसते तेव्हा त्याचवेळी त्या व्यक्तीचा फोटो काढून लगेच त्याला whatsapp वर पाठवले व कॉल करून अथवा video call देऊन कळवले कि ते मित्र त्या गावाला जाऊन त्या व्यक्तीला घेऊन जातात. तुम्हाला फक्त त्या व्यक्ती कुठे आहे तो पत्ता कळवावा लागेल. त्याला असंख्य मेसेजेस येतात त्यामुळे व्यक्ती कुठे आहे ते समजण्यास कॉल करणे आवश्यक असते त्याने सांगितले
आयकरातील सवलत :- अजूनपर्यंत तरी नाही
संपर्क :- अक्षय मोहन बोर्हाडे +917709092527
नोंदणी क्रमांक :- रजि.नं. महा./१६२१/२०१६/पुणे
वेबसाईट:- https://www.facebook.com/akshay.borhade.94043
YouTube वर देखील व्हिडीओ बघु शकाल
संस्थेचे प्रकल्प आणि त्याचा अंदाजे खर्च:-
अ‍ॅम्ब्युलन्स- आजारी किंवा वृद्ध लोकांना एका जागेहून त्याच्या ठिकाणी घेउन जाण्यासाठी त्यांना ह्याची गरज आहे. तसेच अ‍ॅम्बुलन्समुळे तो एकावेळी जास्त लोकांना ने-आण करू शकतो. सध्या त्यांच्याकडे एकच छोटी गाडी आहे ज्यामध्ये एकच माणूस नेता येउ शकते. कधी कधी ह्यांचा प्रवास १०००-१५०० किमी एवढा जास्त असु शकतो. तेव्हा एक मोठी अ‍ॅम्बुलन्स ही ह्यांची गरज आहे
तसेच बाकी प्रवास करणे , औषधोपचार व त्यांना सांभाळणे ह्यासाठीही आर्थिक गरज आहेच.

सामाजिक उपक्रम स्वयंसेवक चमू -
अतरंगी, अरुंधती, निशदे, सुनिधी, कविन, महेंद्र ढवाण, प्राची

मागील काही वर्षी केल्या गेलेल्या सामाजिक उपक्रमांबद्दल खाली वाचता येईल - -
सामाजिक उपक्रम २०१७
सामाजिक उपक्रम २०१६
सामाजिक उपक्रम २०१५
सामाजिक उपक्रम २०१४
सामाजिक उपक्रम २०१३
सामाजिक उपक्रम २०१२
सामाजिक उपक्रम २०११
सामाजिक उपक्रम २०१०

आतापर्यंत खालील संस्थांना सामाजिक उपक्रमाद्वारे वस्तुरुपी मदत केली गेली आहे - -
१. भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग २. शबरी सेवा समिती, ता. कर्जत ३. सुमति बालवन, पुणे ४. अनामप्रेम, अहमदनगर ५. माताबालक उत्कर्ष प्रतिष्ठान, सांगोला - सोलापूर, ६. दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळी, यवतमाळ ७. परिवर्तन संस्था, डोंबिवली ८. सावली सेवा ट्रस्ट, पुणे ९. अनुराधा किल्लेदार प्रशाला सांगली १०. घरकुल परिवार नाशिक ११. सुहित जीवन ट्रस्ट १२. माऊली सेवा प्रतिष्ठान १३. सहारा अनाथालय

मागील काही वर्षातल्या कामाचा आढावा खाली वाचता येईल
सामाजिक उपक्रम २०१७- आढावा
सामाजिक उपक्रम २०१६- आढावा
सामाजिक उपक्रम २०१५- आढावा
सामाजिक उपक्रम २०१४- आढावा

धोरणसमाजविचारसद्भावनामदत

प्रतिक्रिया

अरुंधती's picture

9 Mar 2018 - 4:46 pm | अरुंधती

हा धागा सुरु केल्याबद्दल धन्यवाद निशदे! :)

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Mar 2018 - 10:30 pm | डॉ सुहास म्हात्रे

स्पृहणिय उपक्रम !!!